भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. मॉकड्रिल, ब्लॅकआऊट इत्यादी सर्वच बाबतीत समग्र आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विविध दिशानिर्देश दिले. प्रभारी मुख्य सचिव राजेशकुमार, राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस …
Read More »घाटकोपर होर्डिंग अपघात प्रकरणाचा अहवाल मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर दिलीप भोसले समितीकडून अहवाल सादर
घाटकोपर परिसरात होर्डिंग्ज पडण्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुंबई न्यायमूर्ती दिलीप भोसले समितीने बुधवार, ७ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपला अहवाल सादर केला. मुख्यमंत्री कार्यालयाच्या निवेदनानुसार, पुढील कारवाईसाठी हा अहवाल आता सीलबंद लिफाफ्यात गृह विभागाकडे सादर करण्यात आला आहे. अहवालातील मजकुरात घटनेच्या तपासातील निष्कर्ष तसेच भविष्यात …
Read More »देशातील पहिले महिलांकडून संचालित ‘ईट राईट स्ट्रीट फूड हब’ मुंबईत सुरू अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते उद्घाटन
प्राप्त संधी आणि प्रशिक्षण यांच्या आधारे तळागाळातील सक्षमीत महिला स्वयं सहायता गटातील महिला देशातील अन्न सुरक्षा मानकांना परिभाषित करू शकतात, याचे माहिम सीफूड प्लाझा हे एक उत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्र ईट राईट स्ट्रीट फूड हब या परिवर्तनशील उपक्रमात महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करत असल्याचा अभिमान आहे, अशा शब्दात अन्न व औषध …
Read More »ओटीटी क्रांती ; वैयक्तिकरण, तंत्रज्ञान आणि कथांवर स्ट्रीमिंगचे भविष्य नेटफ्लिक्स, सोनी, जिओ हॉटस्टारचे वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञांचे मत
ओटीटी विश्वात तंत्रज्ञान, वैयक्तिकरण आणि सर्जनशीलता यांचा संगम आता प्रेक्षकांच्या सवयी आणि पसंती बदलतो आहे, असे मत वेव्हज परिषदेत सहभागी झालेल्या आघाडीच्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद – २०२५ मध्ये ‘ओटीटी रिव्होल्युशन: हाऊ एआय, पर्सनलिझेशन अँड इंट्रॅक्टिवे कंटेंट अ …
Read More »बृहन्मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे दोन कोटी कागदपत्रे ऑनलाईन मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माहितीपत्रिकेचे अनावरण
बृहन्मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) विविध आदेश, ना हरकत प्रमाणपत्रे आदी सुमारे २ कोटी ३२ लाख कागदपत्रे स्कॅनिंग करून डिजिटल स्वरूपात ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहेत. यासंबंधी माहिती देणाऱ्या माहिती पत्रिकेचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. प्राधिकरणाची विविध कागदपत्रे एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्याने ‘एसआरए’ने केलेल्या या कामाबद्दल …
Read More »मुंबईतील सर्वच रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही यंत्रणेमार्फत देखरेख मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत १३९ रेल्वे स्टेशनवर बसविणार सीसीटीव्ही
जम्मू काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक ठिकाणांवरील सुरक्षा अधिक मजबूत करण्यात येत आहे. मुंबईकर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे स्थानक आणि परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून प्रभावी देखरेख करण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई आयुक्तालयातर्फे देण्यात आली आहे. मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयांतर्गत १३९ रेल्वे स्टेशन्स आहेत. दिवसभरामध्ये लोकल …
Read More »मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या घरांची निर्मिती वितरण धोरणात सुधारणा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबईतील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या बांधकामामुळे बाधित होणाऱ्यांसाठी जास्तीत जास्त सदनिकांचे उपलब्ध व्हाव्यात यासाठीच्या आणि त्यांच्या वितरणाच्या सुधारित धोरणास आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयाच्या अनुषंगाने गृहनिर्माण विभागाच्या यापुर्वीच्या १९ ऑगस्ट २०२४ च्या शासन निर्णयात सुधारणा व स्पष्टीकरणाचा समावेश करण्यात येणार …
Read More »उच्च न्यायालयाचे मत, अन्यथा सरोगसीचे व्यावसायिकीकरण होईल सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची सुचना
याचिकाकर्त्या महिलेला तिसऱ्या मुलासाठी सरोगसीची परवानगी दिल्यास त्याचे व्यापक परिणाम होतील, तसेच सरोगसीचे व्यावसायिकीकरण होईल, असे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने याचिकाकर्ता महिलेला कोणताही अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. उच्च न्यायालयाच्या न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने असे मत नोंदविले की, घटस्फोटित ३६ वर्षीय महिलेला सरोगसीची परवानगी दिल्याने …
Read More »उच्च न्यायालयाचे आदेश, जैन मंदिराच्या उर्वरित बांधकामावर कारवााई नको महापालिकेच्या कारवाईला उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती
विर्लेपार्ल्यातील जैन मंदिराचे उर्वरित बांधकामावर पाडकाम कारवाई करू नये, असे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच मुंबई महानगरपालिकेला दिले. श्री १००८ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टने महानगरपालिकेच्या कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ट्रस्टने महानगरपालिकेच्या कारवाई विरोधात उच्च न्यायालयात दोन अपील दाखल केली असून न्या. गौरी गोडसे यांच्या एकलपीठापुढे त्यावर नुकतीच सुनावणी झाली. …
Read More »हिंसाचार प्रकरणी घर पाडणाऱ्या नागपूर महापालिकेची मुंबई उच्च न्यायालयात बिनशर्त माफी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल मागितली बिनशर्त माफी
अलिकडच्या जातीय हिंसाचार प्रकरणातील आरोपींच्या घरांचे कथित बेकायदेशीर भाग पाडणे आणि इमारती पाडण्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल नागपूर महानगरपालिकेने (एनएमसी) मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाकडे “बिनशर्त माफी” मागितली. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नितीन सांबरे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर एनएमसीने आपले प्रतिज्ञापत्र दाखल केले, ज्यामध्ये असे म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या …
Read More »
Marathi e-Batmya