विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनामा समिती स्थापन केली असून अध्यक्षपदी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची तर निमंत्रक म्हणून पक्षाचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांची निवड प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केली आहे. या जाहीरनामा समितीमधील सदस्य खालीलप्रमाणे : कृषीमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी …
Read More »पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पहिल्यांदाच भगवानगडावर येत एकत्र म्हणाले, आम्ही पाठिशी जरी राजकीय मतभेद असले तरी वेगळा दसरा मेळावा आयोजित करण्याचा विचार केला नाही
मागील काही वर्षात पंकजा मुंडे आणि त्यांचे चुलत बंधू तथा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात एकमेकांपासून खूप दर गेले. मात्र मध्यंतरी भाजपा नेत्या पंकजा मुंडे या विधान परिषदेवर निवडूण गेल्याने ही कटूता कमी होण्यास मदत झाली. त्यानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे स्थानिक पातळीवर पुन्हा …
Read More »अजित पवार यांची स्पष्टोक्ती, प्रचाराचे दौरे सुरु करणार असल्याने श्री सिध्दीविनायकाचे दर्शन महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी आणि येत्या काही दिवसात महाराष्ट्रात प्रचाराचे झंझावाती दौरे सुरु करणार असल्याने त्याची सुरुवात म्हणून आज माझ्या सर्व मंत्री आमदार आणि पदाधिकाऱ्यांसमवेत श्री सिध्दीविनायकाचे दर्शन घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. सोमवारी पक्षाच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर आज …
Read More »आभार सभेत सुनिल तटकरे यांची ग्वाही. ‘आपला माणूस’ निवडून दिलात तो… रोहयात ५० खाटांचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार ;१५ दिवसात कामाला सुरुवात करु
राजकीय संक्रमण काळात ‘आपला माणूस’ निवडून दिलात तो ‘आपला माणूस’ म्हणून यापुढेही कधीच समाजकारणाचा वसा सोडणार नाही असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी रोहा येथील आभार सभेत दिला. पुढो बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, रोहेकरांचे ऋण व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस आहे. समर्पित …
Read More »अजित पवार यांचे आदेश, सर्व पायाभूत विकासप्रकल्पांची कामे वेळेत गतीने मार्गी लावा राज्यातील विकासप्रकल्पांचा सविस्तर आढावा
राज्याचा दीर्घकालीन विकास डोळ्यासमोर ठेऊन विविध विभागांच्या मार्फत विकासकामे सुरु आहेत. नागरिकांच्या दृष्टिने महत्वाच्या असणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. नागरिकांना विकासकामांचा प्रत्यक्ष लाभ होण्यासाठी राज्यात सुरु असलेली, प्रगतीत असलेली आणि प्रस्तावित विकासकामे नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत गतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात झालेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या …
Read More »सुनिल तटकरे यांचा आरोप, एक नॅरेटीव्ह सेट करायचा प्रयत्न सुरु सहाभूतीची लाट असेल असू शकेल
अजित पवार यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्यात आम्हाला अपयश आलं मी कबुल करतो, निवडणूकांच्या काळात जसजशी मतदानाची तारीख जवळ येते तसतशी सहानभूतीचं वातावरण निर्माण केलं जातं. ते सहानभूतीला उत्तर देण्यात कमी पडलो अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिली. पुढे बोलताना …
Read More »छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती, …महायुतीला ठेच लागली फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेतील सर्व घटकांना आगामी निवडणुकीत संधी द्यावी
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला ठेच लागली आहे, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. यापुढील काळात आपल्या रस्त्यातील दगड धोंडे बाजूला सारून पुन्हा ठेच लागणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. या निवडणुकीत जो समाज आपल्यापासून दुरावला गेला आहे त्याच्यामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी फुले, शाहू आंबेडकरांचे विचार आपल्याला कृतीतून दाखवावे …
Read More »धनंजय मुंडे यांचे आवाहन, सामाजिक सलोखा आणि सौहार्द जपायची जबाबदारी प्रत्येकाची निवडणुकीत जय-पराजय होत असतात; सोशल मीडियावर वातावरण दूषित करू नये
बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणूक अत्यंत वेगळ्या वळणावर व अनेक मुद्द्यांनी गाजून पार पडली. अतिशय वेगळ्या वातावरणात झालेल्या या निवडणुकीत झालेला पराजय आम्ही मोकळ्या मनाने स्वीकारला; विजयी उमेदवाराचे अभिनंदन सुद्धा केले. मात्र अजूनही सोशल मीडियावर जातीवाचक व विविध नेत्यांची अवहेलना करणाऱ्या पोस्ट केल्या जात असून याद्वारे सामाजिक सलोखा बिघडून आपसातील द्वेष …
Read More »अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या ३ जागा जिंकल्या विधानसभेत भाजपाबरोबर तिसऱ्यांदा सत्तेत
लोकसभा निवडणूकीसोबतच अरुणाचल प्रदेशातील २०२४ च्या विधानसभा निवडणूकीसाठी मतदान पार पडले. यावेळी पहिल्यांदाच भाजपाने उभ्या केलेल्या १० उमेदवारांच्या विरोधात विरोधा कोणीच निवडणूकीसाठी अर्ज भरला नव्हता. त्यामुळे निवडणूकीची प्रक्रिया सुरु असतानाच भाजपाच्या १० जागा बिनविरोध निवडणूक आल्या. त्यानंतर ५० जागांसाठी झालेल्या निवडणूकीत अजित पवार गटाच्या अर्थात पक्षाच्या ३ जागा जिंकत अरूणाचल …
Read More »छगन भुजबळ यांचा इशारा, मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात सहभाग होऊ देणार नाही आगामी विधासभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सन्मानपूर्वक जागा मिळाल्याच पाहिजेत
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची असून राज्य सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे राज्यातील शालेय शिक्षणांमध्ये मनुस्मृतीचा समावेश हा कदापी सहन करणार नाही. जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत आहे तोपर्यंत मनुस्मृती ही शाळांमध्ये शिकवू देणार नाही असे इशारा राज्याचे मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ …
Read More »
Marathi e-Batmya