आभार सभेत सुनिल तटकरे यांची ग्वाही. ‘आपला माणूस’ निवडून दिलात तो… रोहयात ५० खाटांचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार ;१५ दिवसात कामाला सुरुवात करु

राजकीय संक्रमण काळात ‘आपला माणूस’ निवडून दिलात तो ‘आपला माणूस’ म्हणून यापुढेही कधीच समाजकारणाचा वसा सोडणार नाही असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी रोहा येथील आभार सभेत दिला.

पुढो बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, रोहेकरांचे ऋण व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस आहे. समर्पित भावनेने या भागासाठी त्याग केला आहे. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून ज्यापध्दतीने झपाटल्यासारखे काम केले, त्यामुळे रोहेकरांनी मताधिक्य दिले. त्यामुळे आयुष्य असेपर्यंत हे ऋण मी कधी विसरु शकत नाही अशा शब्दात कृतज्ञता व्यक्त केली.

पुढे बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, या तालुक्याने माझ्या पाठीमागे मोठी शक्ती उभी केली आहे. निवडणूकीत परस्परांच्या विरोधात राजकीय लढाई लढत असताना पूर्वग्रहदूषित काही काम माझ्या हातून घडले नाही. देशात ज्या काही कमी जागा आल्या त्याला कारण संविधान बदलाबाबत होणारा अपप्रचार होता. अल्पसंख्याक समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात आली. निवडणुकीत मत मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, परंतु ज्यावेळी जातीचे राजकारण पवारसाहेबांच्या उपस्थित इथे झाले याचे मनस्वी दु:ख झाले. गेली ४० वर्ष राजकारणात कार्यरत असताना सर्वधर्मसमभाव विचार घेऊन काम करताना कुठेही कुठल्या समाजाला दुरावा निर्माण करण्याचे काम झाले नाही असा खुलासाही यावेळी केला.

सुनिल तटकरे पुढे बोलताना म्हणाले की, या निवडणुकीत शेकाप हा किंगमेकर आहे असे चित्र निर्माण करण्यात आले होते. एक्झिट पोलमध्येही आम्ही मागे आहे असे दाखवण्यात आले. मात्र रोहेकर आणि जिल्हयातील जनतेने हे किंगमेकर नाहीत हे मला विजयी करुन दाखवून दिले. या रायगड जिल्ह्यातील महायुतीच्या सहाच्या सहा जागा निवडून आणायच्या आहेत आणि त्या स्पष्टपणे मिळवू असा आत्मविश्वासही यावेळी व्यक्त केला.

यावेळी सुनिल तटकरे यांनी पत्नीचा उल्लेख करणे आज आवश्यक आहे कारण ती यावेळी जी काही माझ्यासाठी फिरली… मी तिला माऊली घरात आमच्यासाठी करते आणि इकडे पण का? मात्र तिने तिची जिद्द सोडली नाही आणि ती फिरली.. तिचे कौतुक करावे तितके कमीच आहे असेही आवर्जून सांगितले

तसेच यावेळी बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, ५० खाटांचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल अदानी समूहासोबत चर्चा करुन १५ दिवसात काम सुरू होईल आणि वर्षभरात कार्यान्वित होईल आणि दुसरं सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलही सुरू करण्याचा माझा मानस आहे. सर्वात उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा रोहयात उभा राहणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारकही पूर्ण होणार आहे अशी माहितीही यावेळी दिली.

सुनिल तटकरे पुढे बोलताना म्हणाले की, ४० वर्ष जी काही अविरत मेहनत घेतली त्याचे फळ रायगड जिल्ह्याने मला अभूतपूर्व यश मिळवून दिले आहे. इथल्या सुजाण आणि सुज्ञ नागरिकांनी मला साथ दिली आहे. त्याबद्दल सुनिल तटकरे यांनी त्यांचे आभार मानले.

या मतदारसंघात जातीपातीचे राजकारण सुरू असताना विकासाच्या मुद्यावर इथल्या जनतेने निवडणूक ताब्यात घेत हक्काचा प्रतिनिधी निवडून दिला आहे. राज्य सरकारचे सहकार्य मिळणार आहेच शिवाय केंद्राचेही आपला खासदार असल्याने निर्विवाद सहकार्य मिळणार आहे असा विश्वास बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी रोहेकरांना दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार अनिकेत तटकरे यांनी केले. या आभार सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील आणि महायुतीचे नेते आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

About Editor

Check Also

मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ४५ हजार घरांच्या हाऊसिंग टाऊनशिपला मंजूरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पोलीसांसाठी शासकीय निवासस्थाने गृहनिर्माण प्रकल्पाला मंजूरी

मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *