मतदार याद्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ आहेत हे काँग्रेस पक्षाने सर्वात आधी पुराव्यासह दाखवून दिले आहे. पण निवडणूक आयोग त्याची गंभीरपणे दखल घेत नाही. झोपलेल्या या निवडणूक आयोगाला जागे करण्यासाठी सर्व पक्षांनी १ नोव्हेंबरला भव्य मोर्चाचे आयोजन केले असून या मोर्चात काँग्रेस पक्ष सहभागी होणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …
Read More »हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही फसवेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते व पदाधिकाऱ्यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश
अतिवृष्टी व महापूरामुळे झालेल्या नुकसानीपोटी महायुती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सरकारने जाहीर केलेले ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज हे फसवे आहे त्याचप्रमाणे आज मंत्रिमंडळ बैठकीत ११ हजार कोटी रुपयांच्या वितरणाला दिलेली मान्यताही फसवीच आहे. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत असून हेक्टरी सरसकच ५० हजार रुपये दिले पाहिजे याचा …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेली टीका राजधर्माला शोभत नाही फलटणची घटना राजकारणाचा विषय नाही तर महिला सुरक्षेची म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी ज्या संवेदना व्यक्त केल्या आहेत, तेवढ्या सर्वांच्या मनात असल्या पाहिजेत. राहुल गांधी यांनी व्यक्त केलेल्या भावना योग्यच आहेत. हा राजकारणाचा विषय नसून महिला सुरक्षेचा विषय आहे, त्याअनुषंगाने राहुल गांधी यांचे ट्विट मार्गदर्शक म्हणून पहावे असे प्रतिपादन करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, राज्यातील मित्रपक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी पक्ष वाचवण्यासाठी
भारतीय जनता पक्ष ही चेटकीण असून दुसऱ्यांचे पक्ष खाण्याचा रोग या पक्षाला जडला आहे. आधी त्यांनी विरोधी पक्ष खाल्ले आता मित्रपक्षांना खायला निघाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मित्रपक्षांना स्वबळावर लढायला लावून भाजपा शिंदेसेना व अजित पवारांच्या पक्षाचा काटा काढणार हे लक्षात आल्यानेच माझा पक्ष व मला वाचवा, अशी मनधरणी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, महिला डॉक्टरच्या आत्महत्येने गृह विभागाच्या अब्रुची लक्तरे वेशीवर गृहखाते झेपत नसेल तर राजीनामा द्या
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरला पोलिसांच्या अनन्वीत छळाला कंटाळून आत्महत्या कारावी लागली ही घटना पोलीस विभागाला लाज आणणारी आहे. गृहविभागावर फडणवीस यांचे नियंत्रण नाही, फलटणची घटना गृहविभागाच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगणारी आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जनाची नाही तर मनाची तरी वाटावी आणि तात्काळ गृहमंत्रीपदाचा राजीनामा देऊन …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचे दिवाळीचे ३ दिवस सातपुडा पर्वतरांगातील आदिवासींसोबत स्वतः जेवण बनवले, आदिवासींसोबतच मुक्काम, कपड्यांचे वाटप व आरोग्य कॅम्पचे आयोजन
दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा, असे या सणाचे वर्णन केले जात असले तरी आजही समाजातील लाखो लोक या सण, उत्सवापासून वंचित आहेत. आपण दिवाळीचा आनंद आपल्या कुटुंब व मित्रपरिवारासह साजरा करतो पण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासाठी दिवाळी म्हणजे केवळ सण नसून माणसांमधील नाळ अधिक घट्ट …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, मतांची चोरी करून मोदी पंतप्रधान तर फडणवीस मुख्यमंत्री झाले मतचोरीचे सर्व पुरावे देऊनही निवडणूक आयोग गप्प, आयोगाविरोधात मोर्चा निघत असेल तर काँग्रेसचे समर्थनच
देशात व महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे आलेले सरकार हे मतचोरी करून आलेले आहे. मतचोरी करूनच नरेंद्र मोदी पंतप्रधान तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत म्हणूनच निवडणूक आयोगाची पाठराखण भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस करत आहेत, असा ह्ल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. यासंदर्भात बोलताना काँग्रेस …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, तक्रार करण्यासारखे काही घडलेले नाही इंडिया आघाडीत मनसेचा अद्याप प्रस्ताव नसल्याने भाष्य करण्याचा प्रश्न नाही
निवडणूक प्रक्रियेतील गडबड घोटाळा हा सध्याचा महत्वाचा प्रश्न असून त्या अनुशंगाने निवडणूक आयोगाकडे गेलेल्या शिष्टमंडळात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सहभागी होते. मतदारयाद्यातील घोळ, मतचोरी हे विषय महत्वाचे आहेत. काँग्रेस पक्ष सातत्याने या मुद्दयाचा पाठपुरावा करत आहे, निवडणूक आयोगाच्या एकूण कारभारासंदर्भात काही गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत, यासाठी हे शिष्टमंडळ गेले …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, मुंबईतील भूखंडांची श्वेतपत्रिका काढा मुंबईतील भूखंड लाडक्या शेठला कवडीमोल दराने देण्याचा भाजपा महायुती सरकारचा सपाटा, सर्वसामन्यांच्या घरांकडे मात्र दुर्लक्ष
मुंबईसह महाराष्ट्रातील घरांच्या किमती सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. काँग्रेस सरकारने सुरु केलेली परवडणारी घरे योजना अत्यंत उपयुक्त असून ही योजना व्यापक प्रमाणात राबविली पाहिजे. गिरण्यांच्या जमिनीवर ३३/३३/३३ फार्म्युल्यातील ३३ टक्के सार्वजनिक उपक्रमावरील भूखंड उद्योगपतींच्या घशात घातले जात आहेत, हा प्रकार थांबवून या भूखंडावर परवडणारी घरे योजना राबवावी यासाठी काँग्रेस पक्षाने …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, नुकसानग्रस्त महाराष्ट्रासाठी पंतप्रधान मोदींनी विशेष पॅकेज द्यावे महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का? ढासळलेली कायदा सुव्यवस्था पाहता पूर्ण वेळ गृहमंत्र्यांची गरज
मे महिन्यापासून राज्यात अतिवृष्टीने थैमान घातल्याने खरिप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मायबाप सरकार बळीराजाला भरीव मदत देईल अशी आशा असताना राज्य सरकारने जाहीर केलेले पॅकेज हे फसवे निघाले. हे पॅकेज शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणारे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर आले पण शेतकऱ्यांसाठी एका …
Read More »
Marathi e-Batmya