शिवसेना (UBT) चे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येमागे कोणती शक्ती आहे ते चौकशीतून समोर आले पाहिजे परंतु पोलिसांचा आतापर्यंतचा तपास पाहता कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न होत आहे, असे स्पष्ट दिसत आहे. सध्याची एसआयटी ही केवळ धूळफेक असून ठाण्याबाहेरील आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करावी व हत्येचा संपूर्ण तपास उच्च न्यायालयाच्या …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, अंडरवर्ल्डच्या धमक्या व हल्यांमुळे बॉलिवूड प्रचंड दहशतीखाली, बॉलिवूड मुंबईबाहेर हलवण्याचे षडयंत्र साबरमतीच्या जेलमध्ये बसून गुंड चित्रपटसृष्टीला नियंत्रित करत असतील तर पोलीस यंत्रणा व भाजपा सरकार काय करते?
मुंबईची शान असणारे बॉलिवूड आणि चित्रपटसृष्टी आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबई सोडून इतर राज्यांत किंवा देशाबाहेर स्थलांतर करण्याच्या विचारात आहे, ही महाराष्ट्रासाठी मोठी सांस्कृतिक आणि आर्थिक हानी आहे. गुजरातमधील साबरमतीच्या तुरुंगात बसून गुंड जर थेट चित्रपटसृष्टीला नियंत्रित करत असतील, तर पोलीस यंत्रणा व भाजपा महायुती सरकार नेमके …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, कुख्यात माफिया लॉरेन्स बिश्नोई सरकारचा जावई लागतो काय? मनोज जरांगेंनी केलेल्या ५०० कोटींच्या आरोपांची ED चौकशी करा; ऑडीओमध्ये ज्यांची नावे आहेत त्यांना अटक करा
कुख्यात माफिया लॉरेन्स बिश्नोई गुजरातमधील साबरमती जेलमध्ये बसून मुंबईत धुडगूस घालतो. लोकप्रतिनिधी, बॉलिवूडमधील कलाकारांना धमक्या देतो, गोळीबार करतो, हत्या करतो. भाजपा महायुती सरकारने बिश्नोई गँगला महाराष्ट्रात खुली परवानगी दिली आहे का? लॉरेन्स बिन्शोई सरकारचा जावई लागतो काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात हिम्मत असेल तर साबरमतीच्या जेलमधून बिश्नोईच्या मुसक्या आवळून मुंबईच्या …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, हल्ले करणाऱ्या गँगस्टर लाँरेन्स बिश्नोईची आजपर्यंत चौकशी का नाही? बिश्नोई भाजपाचा कोण लागतो? सरकारच्या आशिर्वादाशिवाय अहमदाबादच्या जेलमधून बिश्नोई गँग चालवू शकत नाही; पोकळ घोषणा नको, हिम्मत असेल तर बिश्नोईच्या मुसक्या आवळून मुंबईत आणा.
चित्रपट अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळ्या झाडल्याने राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा पोरखेळ पुन्हा उघड झाला आहे. मुंबई शहरात खुलेआम एका अभिनेत्यावर गोळीबार होत असेल तर पोलीस यंत्रणा काय झोपा काढते काय? लॉरेन्स बिश्नोई गँगने हा हल्ल्याचे सांगितले जात आहे पण हा गँगस्टर गुजरातच्या जेलमध्ये बंद आहे, तेथून तो कारवाया करत असेल …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, दुष्काळाने होरपळलेल्या बळीराजाच्या वेदना व दुःख भाजपा महायुतीला कळलेच नाही, ५ हजारात दिवाळी कशी होणार ? शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसता येत नसतील तर निदान त्यांच्या दुःखाची थट्टा तरी करू नका
राज्यातील शेतकरी अस्मानी संकटाने पुरता हवालदिल झाला आहे. पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम हातातून गेला आहे, दसरा दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. दिवाळीचा सण कसा करायचा हा यक्षप्रश्न शेतकऱ्यासमोर उभा ठाकला आहे, मायबाप सरकार मदतीला धावून येईल अशी अपेक्षा असताना सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. प्रचंड महागाई असताना ५ …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, एसआयआर (SIR) रद्द करा, निवडणूक आयोगावर जनतेचा अविश्वास नवयुवकांचा नाव नोंदणीस थंड प्रतिसाद, असंतोष पाहता पुन्हा नव्याने अर्ज- ६ भरण्याची मुभा देण्यात आली
निवडणूक आयोगाने सुरु केलेली एसआयआर मोहिम सुरुवातीपासूनच अत्यंत गुंतागुंतीची व वेळकाढूपणाची ठरली आहे. आयोगाच्या कामाच्या पद्धतीवरून मतदारांनी या मोहिमेकडेच पाठ फिरवली आहे.महाराष्ट्रातील जनतेने सुद्धा निवडणूक आयोगावर अविश्वास दाखविला असून नवयुवकांनी नाव नोंदणीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे मतदार यादी पुनरिक्षण (SIR) ची प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, ज्ञानेशकुमारांना अटक करा, वोटचोर रंगा बिल्लाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही लोकशाही व संविधान बचाओ आंदोलनात प्रभारी व प्रदेशाध्यक्षांसह राज्यातील सर्व नेते दिल्लीच्या रस्त्यावर
काँग्रेस व इंडिया आघाडीने वोट चोरीचा मुद्दा मांडत देशभर आंदोलन सुरु केले आहे. ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे, लोकशाहीच्या मार्गाने सुरु असलेला हा लढा मोडीत काढण्याचा चंग हुकूमशहाने बांधला आहे म्हणूनच राजधानी दिल्लीला लष्करी छावणी बनवले असून ३० हजारांच्यावर पोलीसांचा फौजफाटा आहे. दिल्लीला येणाऱ्या २५० रेल्वे बंद करण्यात आल्या आहेत …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, सरकारने दुष्काळ जाहीर केला पण मदतीचा पत्ता नाही, दसऱ्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात १ लाख रुपये जमा करा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सर्वे, पंचनामे, केंद्रीय पथकाचे नाटक कशाला, कुंभमेळ्यासाठीचे ३६ हजार कोटी, शक्तीपीठचे ८० हजार कोटींचा निधी शेतकऱ्यांसाठी वापरा
राज्यातील बहुतांश भागात दुष्काळाची दाहकता मोठ्या प्रमाणाच जाणवत असून शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारने पाहणी दौरे केले, दुष्काळ जाहीर केला पण मदतीचा अजून थांगपत्ता नाही. सर्वे, पंचनामे, केंद्रीय पथकाचे पाहणी दौरे ही नाटकं बंद करून सरकारने तातडीने हेक्टरी १ लाख थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दसऱ्याच्या आधी जमा करावेत, सरसकट कर्जमाफी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, ज्ञानेशकुमारांची हकालपट्टी करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा मोदी व शाहांनी देशाची माफी मागावी, निवडणूक आयोगातील व्होटचोरी व भ्रष्ट कारभाराविरोधात काँग्रेसचे राज्यभर ‘लोकशाहीचा काळा दिवस’ आंदोलन
भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी संगनमत करून निवडणूक आयोगाच्या मदतीने व्होटचोरी केली आहे. या व्होटचोरीतूनच मोदी सरकार सत्तेत आले आहे, ही व्होटचोरी उघड झाली असून मोदी-शाह व भाजपाला मदत करणारे भ्रष्ट निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमारची हकालपट्टी करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी व्होटचोरी करून भाजपाला निवडणूका जिंकून देण्यात मदत केली आहे हे आता स्पष्ट झाले आहे. देशभरात व्होटचोर ज्ञानेशकुमार आणि त्याचे आका मोदी शाह यांच्याविरोधात देशभरात प्रचंड संताप आहे. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपले उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड मधील कार्यक्रम रद्द केले …
Read More »
Marathi e-Batmya