Tag Archives: assembly speaker

राष्ट्रवादीचे मोठे पाऊल, अजित पवार आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांच्या विरोधात तक्रार दाखल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी

राज्यात राजकीय उलथापालथ झाली असून अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड पुकारले आहे. त्यामुळे शिवसेनेप्रमाणे आता राष्ट्रवादीतही दोन गट निर्माण झाले आहेत. अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट राष्ट्रवादीत पडले असून पवारांनी आता बंडखोर आमदारांविरोधात बडगा उगारला आहे. अजित पवारांसह नऊ आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादी …

Read More »

अतुल लोंढे यांचा सल्ला; अध्यक्षांनी क्रांतीकारी नाही, तर संविधानाला धरून निर्णय घ्यावा राज्यात एक वर्षापासून शिंदे-फडणवीसांचे असंवैधानिक व बेकायदेशीर सरकार

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊन महिना झाला तरी अद्याप आमदार अपात्रतेच्या निर्णयावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिलेला नाही. विधानसभा अध्यक्ष ऍड राहुल नार्वेकर यांचे क्रांतीकारी निर्णय घेण्याचे विधान त्यांचा कल लक्षात आणून देतो. विधानसभा अध्यक्ष पूर्वग्रहदूषीत असणे लोकशाहीसाठी योग्य नाही. विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेचा निर्णय क्रांतीकारी नाही तर संविधानातील …

Read More »

राहुल नार्वेकर यांची स्पष्टोक्ती, …दोन महिन्यात निर्णय कसा घेणार? भरत गोगावले यांची नियुक्ती पक्षानेच केली होती

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील शिवसेना फुटीवर आणि सत्तासंघर्ष प्रकरणी अंतिम निकाल देताना अनेक महत्वाचे निर्णय दिले. त्यामध्ये शिंदे गटाच्या भरत गोगावले यांची प्रतोद पदी करण्यात आलेली नियुक्ती अवैध ठरविली. तर १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विहित कालावधीत घ्यावा असे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले. यानंतर ठाकरे गटाकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या दाव्यावर विधानसभा …

Read More »

लंडनहून परतताच राहुल नार्वेकर म्हणाले, बाहेर केलेल्या भाष्यावर मी टिप्पणी… सर्वप्रथम पार्टी कुणाची हे ठरवावे लागले त्यानंतरच पुढील निर्णय

शिवसेना फुटीवर आणि राज्यातील सत्तासंघर्षाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निर्णय दिला. न्यायालयाने शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिला. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून १५ दिवस, २० दिवसात तर काहींनी २ महिन्यात निर्णय घेण्याची मागणी केली. यावर सध्याचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर हे लंडन दौऱ्यावर …

Read More »

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे प्रत्युत्तर, म्हणून अध्यक्षाची निवडणूक अवैध… जोपर्यंत आमदार अपात्र ठरविला जात नाही तोपर्यंत

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्तासंघर्षावर दिलेल्या निकालानंतर राजकीय दावे-प्रतिदाव्यांना उधाण आलं आहे. राज्यपालांची कृती बेकायदेशीर ठरवणे, नबम रेबियाच्या तरतुदी लागू होणार की नाही यासाठी मोठ्या खंडपीठाकडे प्रकरण पाठवणे, उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करता येणार नाही हे स्पष्ट करणे यासह आमदारांच्या अपात्रतेच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यावर न्यायालयाने निकाल दिला आहे. शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेवर …

Read More »

उध्दव ठाकरे यांनी दिला इशारा, विधानसभा अध्यक्षांनी उलट-सुलट केलं तर… पोपट मेला असल्याचे जाहिर करण्याचे काम विधानसभाध्यक्षांकडे

सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर दिलेल्या निकालाचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे सत्ताधारी पक्षांकडून त्यांच्या बाजूने हा निकाल लागल्याचं म्हटलं जात आहे. दुसरीकडे ठाकरे गटाकडूनही हा निकाल त्यांच्या बाजूने लागल्याचं सांगितलं जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) शिंदे गटाच्या आमदारांच्या …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, होय मी नैतिकतेला धरून दिला राजीनामा, मग आता तुम्ही… सर्वोच्च न्यायालयाने सरकारच घटनाबाह्य ठरविले असताना मिंधे गटाने आणि फडणवीसांनी राजीनामा द्यावा

राज्यात शिवसेनेतील बंडाळी आणि त्यानंतर निर्माण झालेला सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने सध्याचे शिंदे-फडणवीस सरकार घटनाबाह्य असल्याचा निकाल देत जर उध्दव ठाकरे यांनी जर राजीनामा दिला नसता तर घडाळ्याचे काटे आम्ही उलटे फिरवले असते असे स्पष्ट मत व्यक्त केले. या निर्णयानंतर शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उध्दव ठाकरे यांनी मातोश्री या आपल्या निवासस्थानी …

Read More »

सर्वोच्च न्यायालयः …तर घडाळ्याचे काटे उलटे फिरवले असते… सध्याचे सरकार बेकायदेशीर राज्यपालांचे निर्णय बेकायदेशीर, प्रतोद नियुक्तीचा अधिकार राजकिय पक्षाचा

महाराष्ट्रातील जनतेने निवडूण दिलेले महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकण्यासाठी राज्यपालांनी एका विशिष्ट पक्षाच्या बाजूने कल दाखवित त्या पक्षाला सत्ता स्थापन करण्यासाठी एकप्रकारे मदत केली अशा कडक शब्दात सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढत राज्यापालांनी राज्य घटनेच्या बाहेर जाऊन वर्तन केले जे अपेक्षितच नव्हते. तसेच प्रतोद अर्थात व्हीप नियुक्तीचा अधिकार हा राजकिय पक्षाचा …

Read More »

राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या आमदारांवर होणार कारवाई विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले संकेत

केंब्रिज विद्यापीठात स्वा.सावरकर यांच्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या आमदारांनी काल राहुल गांधी यांच्या वक्तव्यप्रकरणी आंदोलन करताना गांधी यांचा फोटो असलेल्या बॅनरवर जोडे मारो आंदोलन केले. त्यातच सूरत न्यायालयाने दिलेल्या निकालाची तात्काळ दखल घेत राहुल गांधी यांची वायनाडची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय …

Read More »

राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन, विरोधकांच्या आक्रमकतेनंतर अध्यक्षांनीच सत्ताधाऱ्यांना भरला दम राहुल गांधी विरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे कामकाज दोनवेळा स्थगित

अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु असताना आज सकाळीच २०१९ साली निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी गुजरातमधील सूरत न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली. मात्र विधिमंडळाचे कामकाज सुरु होण्याआधीच सत्ताधारी पक्षातील भाजपा-शिंदे गटाचे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जमा होत लंडनमधील सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यप्रकरणी जोडे मारो आंदोलन सुरु केले. या घटनेचे …

Read More »