Tag Archives: bjp

भाजपाच्या आरोपांच्या खळखळाटाला मविआकडून थंडपणाने बांध मुख्य सचिवांच्या अहवालाने सुरुवात

मुंबई: विशेष प्रतिनिधी अँटालिया प्रकरणात मनसुख हिरेन यांचा मृत्यूदेह आढळून आल्यापासून राज्यातील राजकिय वातावरण सातत्याने तापत राहिले असून कधी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे तर कधी परमबीर सिंग यांचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि आता पोलिस दलाच्या बदल्यांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अहवालावरून सातत्याने महाराष्ट्र कधी नव्हे …

Read More »

फडणवीसांचा पलटवार, तो अहवाल कुंटेंनी नव्हे आव्हाड, मलिकांनी लिहिला गुन्हा घडण्याच्या शक्यतेचाही फोन टॅपिंगच्या कायद्यात समावेश

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काल जो अहवाल दिला, तो त्यांनी तयारच केलेला नाही. मी त्यांना ओळखतो, ते सरळमार्गी आहेत. हा अहवाल कदाचित जितेंद्र आव्हाड किंवा नवाब मलिक यांनी तयार केला असावा आणि त्यावर मुख्य सचिवांनी स्वाक्षरी केली असावी, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते …

Read More »

वेतन वाढ करा, आमदारांच्या स्वीय सहायकांचे विधानसभेच्या उपाध्यक्षांना साकडे मागणीची दखल घेत उपाध्यक्ष नरहरी झिरवळांनी पाठविली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे शिफारस

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील आमदारांच्या गाडीवरील ड्रायव्हर अर्थात वाहन चालकांच्या मानधनात वाढ केल्यानंतर आता स्वीय सहायकांनीही आपल्या वेतन वाढ करण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या केल्या. या मागणीसाठी सर्व आमदारांच्या स्वीय सहायकांनी थेट विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना भेटून यासंदर्भातील मागण्यांचे निवेदन दिले. गेल्या काही महिन्यात महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली असून …

Read More »

आम्ही राज्यपालांना भेटणार मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडीतील नेते भेटणार असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने विरोधकांकडून आरोप करण्यात येत असून महाराष्ट्राची बदनामी करून गोंधळाचे वातावरण निर्माण केले जात आहे. यापार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना वेळ देण्याबाबतची विचारणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. मात्र आज राज्यपाल मुंबईबाहेर आहेत. मात्र ते जर संध्याकाळी परत आले तर त्यांची आज संध्याकाळी भेट …

Read More »

फडणवीसांनाच हप्ताखोरीचा अनुभव पाच वर्षात आरएसएसला किती वाटा दिला?- नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी वसुली कशी करतात? वसुलीतील वाटा किती असतो? आणि त्याचे वाटप कसे केले जाते? याचा दांडगा अनुभव विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना असून ते त्यांचा अनुभव कथन करत आहेत. पाच वर्ष सत्तेत असताना मंत्रालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सर्व विभागात कसे घुसवले होते, ते किती वसुली करत होते व …

Read More »

राजकियदृष्ट्या काही करता येईना म्हणून फडणवीसांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरले परमवीरसिंग यांचे आरोप स्वतःला वाचवण्यासाठी आणि सरकारची बदनामी करण्यासाठी-नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी आमदार फोडता येत नाही म्हणून आता अधिकार्‍यांना हाताशी घेऊन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे स्वतः करत आहेत असा आरोप करतानाच फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिलेली माहिती चूकीच्या पध्दतीने ठेवत महाराष्ट्राची दिशाभूल करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री …

Read More »

पोलिसांतील बदल्या, पदोन्नतीबाबत फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट दूरध्वनी संवादासह सर्व कागदपत्रे केंद्रीय गृहसचिवांना देणार

मुंबईः प्रतिनिधी पोलिस दलातील बदल्या आणि पदोन्नतीसंदर्भातील रॅकेटचा २५ ऑगस्ट २०२० रोजीच पर्दाफाश झालेला असतानाही दोषींवर कारवाई न करता हा अहवाल देणार्‍या अधिकार्‍यांनाच बाजुला करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत यासंबंधीचा तत्कालिन गुप्तवार्ता प्रमुख, पोलिस महासंचालक आणि गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यातील पत्रव्यवहारच आज उघड करीत महाविकास …

Read More »

राज्यपालांनी अहवाल त्वरीत राष्ट्रपतींकडे पाठवावा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने राज्याच्या गृहमंत्र्यावर केलेल्या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे, सन्मानाचे धिंडवडे निघाले आहेत. या सर्व घटनांचा अहवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून मागवावा व त्याची सत्यता तपासून तो राष्ट्रपतींकडे पाठवावा, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते …

Read More »

“मग हे देशमुख कोण?” फडणवीसांचा पवारांना सवाल फडणवीसांच्या प्रश्नावर देशमुखांचा खुलासा

मुंबईः प्रतिनिधी परमबीर सिंग यांच्या आरोपातील तथ्य खोडून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत गृहमंत्री देशमुखांची बाजू मांडत असतानाच मुंबईतून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांनीच १५ फेब्रुवारी २०२१ रोजी पत्रकार परिषदेचे केलेले ट्विट रिट्विट करत थेट मग हे कोण असा सवाल पवारांना …

Read More »

गुजरातमध्ये तर अधिकाऱ्यांनी शाह आणि मोदींच्या विरोधात तक्रार केली होती भाजपाच्या षडयंत्राला व गोदी मीडियाच्या दबावाला सरकारने बळी पडू नयेः सचिन सावंत

मुंबई: प्रतिनिधी या देशामध्ये प्रशासकीय अधिका-यांनी राजकीय नेतृत्वाला पत्र लिहिण्याची ही काही पहिलीच वेळ आहे का? गुजरातचे माजी डीआयजी डी. जी. वंजारा यांनी पत्र लिहून गुजरातचे तत्कालीन गृहराज्यमंत्री व देशाचे विद्यमान गृहमंत्री यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करून अमित शाह हे पोलीस दलाचा गैरवापर करून दुस-यांसाठी खड्डे खोदत आहेत. असे म्हटले होते त्यावेळी …

Read More »