Tag Archives: bjp

भाजपाच्या सोमैय्यांनी जाहिर माफी मागावी अन्यथा…शिवसेना आमदाराचा इशारा आमदार रविंद्र वायकरांनी पाठवली मानहानीची नोटीस

मुंबई : प्रतिनिधी कोकणातील अन्वय नाईक यांची कोर्लाई येथील मालमत्ता खरेदीप्रकरणी व महाकाली येथील जागेच्या संदर्भात खोटे आणि बिनबुडाचे आरोप करुन जनमानसात आपली, कुटुंबांची व पक्षाची प्रतिमा मलिन करत असल्याप्रकरणी जोगेश्‍वरीचे आमदार रविंद्र वायकर यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांना मानहानीची नोटीस पाठवित नोटीसीनुसार सोमैय्या यांनी वरील दोन्ही प्रकरणी जाहिर …

Read More »

पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा खा. डेलकरांचे प्राण वाचवू शकले असते महाराष्ट्र विकास आघाडी सरकार डेलकरांचा हरेन पांड्या होऊ देणार नाही-सचिन सावंत

मुंबई : प्रतिनिधी दादरा, नगर हवेलीचे सातवेळा निवडून आलेले लोकप्रिय खासदार मोहनभाई डेलकर यांना भाजपा नेते आणि केंद्रीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या छळामुळे आत्महत्या करावी लागणे ही भारतीय लोकशाहीसाठी शोकांतिका आहे. आत्महत्या करण्यापूर्वी देशातील सर्व ताकदवर व संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींचा दरवाजा डेलकर यांनी मदतीची आर्त याचना करून ठोठावला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

चंद्रकांत पाटील यांच्या अडचणीत पुन्हा वाढ न्यायालयाने बजावली कोल्हापूर पोलिसांना नोटीस

पुणे: प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथील पोलिस ठाण्यात नोंदविलेल्या गुन्ह्याची माहिती आणि उत्पन्नाचे स्त्रोत लपविल्याप्रकरणी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने कोल्हापूर पोलिसांना नुकतीच नोटीस बजावल्याची माहिती डॉ. अभिषेक हरिदास यांनी दिली. यासंदर्भात डॉ.हरिदास यांनी याचिका दाखल केली. यापूर्वी पुण्याच्या कोर्टात डॉ. हरिदास यांनी याप्रकरणी याचिका …

Read More »

नो लॉकडाऊन, ओन्ली रिस्ट्रिक्शन्स कोरोनावर नियंत्रणासाठी धोरणात्मक निर्णय घ्या-भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील यांची मागणी

पुणेः प्रतिनिधी कोरोनावर नियंत्रणासाठी धोरणात्मक निर्णयाची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यात कुठेही लॉकडाऊन करणार नाही असे जाहीर करुन, जिल्ह्यांसाठी धोरणात्मक नियमावली आखावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. आज सकाळी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांची चंद्रकांत पाटील यांनी भेट घेऊन पुण्यातील प्रश्नांसंदर्भात चर्चा केली. यानंतर ते माध्यमांशी …

Read More »

विधिमंडळाचे पुढील पावसाळी अधिवेशन पाच जुलैपासून अधिवेशनात ६ विधेयके मंजूर

मुंबई : प्रतिनिधी विधिमंडळाचे पुढील पावसाळी अधिवेशन सोमवार ५ जुलै २०२१ पासून सुरू होणार असून तशी शिफारस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कळविण्यात आल्याची माहिती विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी विधानसभेत सांगितले. अर्थसंकल्पाद्वारे राज्यातील १३ कोटी जनतेला दिलासा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्याच्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी असला …

Read More »

अंबानींच्या घरावरील हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणून भाजपाचेच षडयंत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरावर हेलिपॅड आहे पण त्याच्या वापरास परवानगी मिळत नाही तसेच शेतकरी आंदोलनामुळे मुकेश अंबानीच्या कंपन्यांचे शेअर्स बाजारात घसरत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यातून सहानुभूती मिळावी आणि सुरक्षेचे कारण पुढे करून हेलिपॅडलाही परवानगी मिळावी यासाठी भारतीय जनता पक्षानेच स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण घडवून आणले …

Read More »

तुम्ही १५ लाख देण्याची घोषणा केली पण दिले का? राज्यात दारू महागणार अर्थमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती

मुंबईः प्रतिनिधी अर्थसंकल्पावरील चर्चेत काहीजणांनी तिन्ही पक्षांचे जाहिरनामे वाचून दाखविले. आता तुम्हीही निवडणूकीच्या काळात प्रत्येकाच्या घरात १५ लाख रूपये देण्याची घोषणा केलीत. परंतु प्रत्यक्षात तुम्ही दिले का? असा उपरोधिक सवाल भाजपाच्या सदस्यांना करत आमच ही तिन्ही पक्षांचे सरकार असल्याने प्रत्येकाने जाहिर केलेल्या योजनांमध्ये काटछाट होवून किमान कार्यक्रम राबविला जाणार असल्याचे …

Read More »

भाजपा सरकारच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या चौकशीसाठी समिती वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील घटनारी वृक्षसंख्येवर मात करण्यासाठी आणि वृक्ष लागवड होवून पर्यावरण संतुलन रहावे यासाठी तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या विशेष मोहिमेची घोषणा केली. मात्र या योजनेची चौकशी करण्यासाठी १६ आमदारांच्या विधिमंडळ समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत …

Read More »

माझी चौकशी करा ! फडणवीसांचे सरकारला खुले आव्हान दोनवेळा पुन्हा सभागृहाचे कामकाज तहकूब

मुंबईः प्रतिनिधी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी हिरेन यांच्या पत्नीने दिलेल्या जबाबावरून वरिष्ठ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना निलंबित करण्याच्या मुद्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तसेच चौकशी करण्याचे सरकारला आव्हान दिले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारची चांगलीच पंचाईत झाल्याने अखेर गोंधळातच पुढील कामकाज घेण्याची पाळी महाविकास …

Read More »

हिरेन आणि डेलकर आत्महत्येवरून सेना-भाजपामध्ये रंगला सामना विधानसभेचे कामकाज तहकूब

मुंबई : विशेष प्रतिनिधी ॲटालिया इमारतीच्या जवळ आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीच्या मालक मनसुख हिरेन आणि दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावरून शिवसेना आणि भाजपाचे सदस्य पहिल्यांदाच आमने-सामने आले. त्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने विधानसभेचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले. प्रश्नोत्तराच्या तासानंतर विरोधी पक्षनेते …

Read More »