Tag Archives: cm fadnavis

आधी नेत्यांना नाही तर त्यांच्या मुलांना पक्षात घेतलं नेते आपोआप आले मुख्यमंत्री फडणवीस यांचा पवारांच्या वक्तव्यावर खुलासा

मुंबईः प्रतिनिधी आम्ही युतीमध्ये निवडणूक लढवू, पुन्हा युतीचंच सरकार येणार, आता फक्त बहुमताचा विक्रम मोडीत काढायचा आहे. धाक किंवा प्रलोभनं दाखवून भाजपमध्ये प्रवेश दिलेले नाहीत असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावत आम्ही आधी राधाकृष्ण विखेंना भाजपमध्ये घेतलं नाही, आधी सुजय विखेंना घेतलं, तसंच आधी वैभव पिचडांना घेतल्याने …

Read More »

अखेर राजे, पिचड, नाईक आणि कोळंबकर भाजपात मुख्यमंत्री फडणवीस, अध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश

मुंबई : प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेवून स्वतःचे राजकिय भवितव्य टिकविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड, संदीप नाईक आणि काँग्रेसचे कालिदास कोळंबकर या माजी आमदारांसह राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह नवी मुंबईतील काही नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गरवारे क्लब येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि …

Read More »

संचालकाविनाच सांस्कृतिक संचालनालयाचे कामकाज चालणार चार महिने झाले तरी संचालक मिळेना

मुंबई : प्रतिनिधी संस्कृतीचे वैभव असणाऱ्या सुसंस्कृत महाराष्ट्रातील सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे “संचालक” पद किमान चार महिने तरी रिक्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा अनेक योजनांचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे. सध्या संचालक पदाचा पदभार सह संचालक यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ऑक्टोबर २०१८ रोजी श्रीमती स्वाती काळे ह्या सांस्कृतिक …

Read More »

महाजनादेश यात्रा काढणाऱ्यांनो आधी पाच वर्षाचा हिशोब द्या जनतेला फसविल्याचा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षात काहीही काम केले नसल्यामुळेच यात्रा काढून न केलेल्या कामाची दवंडी पिटण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. या सरकारने राज्यातील जनतेची दिशाभूल करुन केवळ फसवणूकच केली आहे. या फसवणुकीचा हिशोब त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर टीका …

Read More »

“सुपर ३०” हिंदी चित्रपट राज्यात टँक्स फ्री राज्य वस्तू व सेवाकरात सवलत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी बिहारमधील प्रसिद्ध गणितज्ज्ञ आनंदकुमार यांच्या कार्यावर आधारित “सुपर ३०” या हिंदी चित्रपटाला राज्य वस्तू व सेवाकरातून (एसजीएसटी) सवलत देण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. आनंदकुमार यांनी “रामानुजन स्कुल ऑफ मॅथेमेटिक्स्”च्या माध्यमातून बिहारमधील सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील हुशार विद्यार्थ्यांना जे.ई.ई. व तत्सम स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन केले. …

Read More »

आता उपसरपंचानाही मिळणार प्रतिमहिना मानधन राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आणि ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींना मानधन मिळते. मात्र ग्रामपंचायतींच्या उपसरपंचाना मिळत नव्हते. या उपसरपंचानाही आता मानधन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याने आता सरपंचाबरोबरच उपसरपंचानाही मानधन मिळणार आहे. तसेच सरपंचाच्या मानधनातही वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात २७ हजार …

Read More »

अनुसूचित जमातीसाठीच्या योजनांच्या धर्तीवर धनगर समाजासाठीही नव्या १३ योजना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्याची मंत्री डॉ. संजय कुटे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी सारथीच्या धर्तीवर ‘महाज्योती’ महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार असून ज्योतीदूत, जलदूत, व सावित्रीदूत असे तीन महत्वाचे पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. धनगर समाज बांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबवून अनुसूचित जमातीसाठी सुरु असलेल्या योजनांच्या धर्तीवर एकूण १३ योजना सुरु करणार असल्याचे कामगार, इमाव, …

Read More »

राखी पोर्णिमेला मुख्यमंत्री फडणवीस स्विकारणार २१ लाख राख्या भाजपा प्रदेश महिला मोर्चाचा उपक्रम

मुंबईः प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यभरातील महिलांकडून २१ लाख राख्या देण्यात येणार असून आगामी रक्षाबंधनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चातर्फे या अभिनव उपक्रमाचे आयोजन केल्याची माहिती महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष ॲड. माधवी नाईक यांनी मुंबईत दिली. भाजपा प्रदेश कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी …

Read More »

गहूंजे बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींच्या फाशीला विलंब कोणामुळे ? दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाईची विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी पुण्यातील गहूंजे येथील बलात्कार व हत्या प्रकरणातील दोन दोषींना सुनावलेल्या फाशीची अंमलबजावणी करण्यात अक्षम्य दिरंगाई केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाला फाशी रद्द करुन जन्मठेप द्यावी लागणे, हे राज्य सरकारचे मोठे अपयश आहे. फाशीच्या अंमलबजावणीस दोन वर्ष घालवणारे प्रशासन झोपा काढत होते का? असा संतप्त सवाल करत सरकारने तात्काळ चौकशी …

Read More »

पुणे विद्यापिठाच्या वसतीगृहात विचार स्वातंत्र्याची गळचेपी माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांना सरकारविरोधी चळवळींमध्ये सहभागी होण्यास निर्बंध घातल्याने विचार स्वातंत्र्याची गळचेपी होणार असून, ही सरकारचीच दडपशाही असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला. पुणे विद्यापिठाने २६ जुलै २०१९ रोजी काढलेल्या परिपत्रकात सदरहू प्रतिबंध लादण्यात आले आहेत. यासंदर्भात तीव्र आक्षेप नोंदवताना अशोक चव्हाण म्हणाले …

Read More »