मुंबईः प्रतिनिधी
जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आणि ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींना मानधन मिळते. मात्र ग्रामपंचायतींच्या उपसरपंचाना मिळत नव्हते. या उपसरपंचानाही आता मानधन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याने आता सरपंचाबरोबरच उपसरपंचानाही मानधन मिळणार आहे. तसेच सरपंचाच्या मानधनातही वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्यात २७ हजार ८५४ ग्रामपंचायती असून त्या ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचाना मानधन मिळणार आहे. उपसरपंच असलेल्या व्यक्तीला तेथील लोकसंख्येच्या प्रमाणात १००० रूपये, १५०० रूपये आणि २००० हजार रूपये प्रति महिना मानधन मिळणार आहे. तर सरपंचानाही लोकसंख्येच्या प्रमाणात वाढीव स्वरूपात ३ हजार रूपये, ४ हजार रूपये आणि ५ हजार रूपये प्रतिमहिना मानधन मिळणार आहे. तसेच ही वाढ १ जुलै २०१९ रोजी पासून मिळणार आहे.
Marathi e-Batmya