मुंबई : प्रतिनिधी राज्यातील खाजगी पतसंस्थांनी नागरीकांकडून ठेवी स्विकारल्या. मात्र त्यातील अनेक पतसंस्था या आर्थिक डबघाईला आलेल्या आहेत किंवा त्या दिवाळखोरीमुळे बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे ठेवीदारांच्या आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला असल्याने अशा बंद पडलेल्या किंवा डबघाईला आलेल्या पतसंस्थाची मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत करण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री …
Read More »वेळ पडल्यास मंत्रीपद सोडेन.. नाणारप्रकरणी उद्योगमंत्र्यांचा इशारा
मुंबई: प्रतिनिधी वेळ पडली तर मंत्रीपद सोडेन. पण, नाणार प्रकल्पाच्या विषयावर आपण कोकणातील माणसाच्या पाठीशी राहू, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. मात्र, नाणारचा प्रकल्प करावा की नाही याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही त्यांनी सांगितले. हुस्नबानू खलिफे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर …
Read More »औरंगाबादच्या कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता जमिन उपलब्ध करून देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदित्य ठाकरे यांना आश्वासन
मुंबई : प्रतिनिधी औरंगाबादेतील कचरा डेपोचा प्रश्नाला गंभीर वळण लागलेले असल्याने त्याचे परिणाम राजकिय क्षेत्रात दिसू लागले. मात्र या कचरा डेपोसाठी पर्यायी जमिन देण्यासंदर्भात शिवसेनेचे युवा नेते आदीत्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही कचरा प्रक्रियेसाठी तातडीने जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच कचऱ्याच्या प्रश्नामुळे …
Read More »…आणि पृथ्वीराज चव्हाण संतापले हक्कभंग आणण्याचा मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा
मुंबई : प्रतिनिधी अरबी समुद्रातील नियोजित स्मारकावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करण्यात आलेली नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका निवेदनाद्वारे विधानसभेत करताच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे भलतेच संतापले आणि म्हणाले की, पुतळ्याची उंची कमी केल्याचे पत्र दाखवू का ? नाही तर तुमच्या विरोधात हक्कभंग आणेन असा …
Read More »धर्मा पाटील आणि गिरासेच्या नुकसान भरपाईत दलाली करणाऱ्यांची चौकशी निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत चौकशीची ऊर्जामंत्री बावनकुळेंची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांना जमिन अधिग्रहणाच्या बदल्यात मिळालेली नुकसान भरपाई आणि गिरासेला मिळालेली भरपाई यांच्या फरक आहे. तो कशामुळे झाला याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच दिले असून त्यानुसार यात दलाली करणाऱ्यांची निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे …
Read More »मंत्री चेंबरमध्ये बसून अंडी उबवतात का? अजित पवार यांचा मंत्र्यांना उपरोधिक टोला
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महत्वाची चर्चा सुरु असताना विधानसभेत एकही मंत्री उपस्थित नाही. याचा अर्थ सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नी गंभीर नसल्याचे दिसून येत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी करत सभागृहात बसायचे सोडून मंत्री आपल्या चेंबरमध्ये बसून काय अंडी उबवतात का? असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला. …
Read More »अखेर गरीबांना रेशनवर मिळणारी साखर बंद केंद्रानेच गरीबांची साखर नाकारल्याचा अन्न व नागरी पुरवठा मंत्री बापट यांचा खुलासा
मुंबई : बी.निलेश ‘सबका साथ सबका विकास’ चा नारा देत विकासाच्या घोषणा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने रेशन दुकानावर मिळणारी गरीबांची साखर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र राज्य सरकारने रेशनवर द्रारीद्रय रेषेखालील लोकांना पुन्हा साखर मिळावी यासाठी प्रस्ताव पाठवला पण तोही फेटाळून लावल्याचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा …
Read More »वित्त विभागाने पैसे न दिल्याने बालकांना आणि महिलांना पोषण आहार नाही महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती : विरोधकांचा सभात्याग
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अंगणवाडीतील बालकांना आणि गर्भवती महिलांना पोषण आहार दिला जातो. मात्र राज्याच्या वित्त विभागाने पुरेसे पैसे दिले नसल्याने मागील काही दिवसांपासून पोषण आहार बंद करण्यात आल्याची धक्कादायक माहिती महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. परंतु आता पुरवणी मागण्यांमध्ये ४०० कोटी रूपये मागण्यात आले. मात्र …
Read More »वीज चोरीच्या आदेशाबाबत औरंगाबाद पोलिस अनभिज्ञ गृहविभागाच्या आदेशाबाबत पोलिस आयुक्त आणि पोलिस अधिक्षकांना माहितीच नाही
औरंगाबाद : प्रतिनिधी वीज चोरी संदर्भात प्रथम खबरी अहवाल देण्याकरता औरंगाबाद जिल्ह्यातील ५पोलिस ठाण्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये शहरातील सिडको आणि छावणी तर ग्रामीण भागातील चिकलठाणा, गंगापूर आणि सिल्लोड या तालुक्यांचा समावेश आहे. हे आदेश गृृह विभागाने २८ फेब्रूवारीला जारी केले आहेत. याबाबत पोलिस आयुक्त यशस्वी यादव आणि पोलिस …
Read More »कर्जमाफीच्या लाभार्थींची यादी सभागृहात ठेवणार महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही
मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारने आतापर्यंत ३७ लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असून शक्य झाले तर या सर्व शेतकऱ्यांची यादी सभागृहाच्या पटलावर ठेवली जाईल, अशी ग्वाही सभागृहाचे नेते व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल त्यांचे अभिनंदन करणाऱ्या प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते. २००८-०९ मध्ये …
Read More »
Marathi e-Batmya