Tag Archives: congress

जरांगे पाटील यांच्या तब्येतीवरून उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने केली ही मागणी उद्धव ठाकरे यांचे टीकास्त्र, जरांगे पाटील यांचे प्राण वाचविण्याची भूमिका दिसत नाही

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. विशेष म्हणजे हे आंदोलन सुरु केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पाणी आणि औषधे न घेता आमरण उपोषण सुरु केले असून आज उपोषण आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबत नाहीत ? कृषी विद्यापीठ, संशोधन संस्था, सरकारी यंत्रणेवर जबाबदारी निश्चित करा

राज्यातील कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था, सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यात किती यशस्वी ठरल्या याचे मूल्यमापन सरकारने करावे. कृषी विद्यापीठ, संशोधन संस्था, सरकारी यंत्रणेवर याबाबतची जबाबदारी निश्चित करावी. त्याचबरोबर बळीराजाच्या हितासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून रॉयल्टी, अनामत रक्कम घेऊ नये, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे. विजय …

Read More »

पीक विमा योजनेवरून नाना पटोले यांची टीका, तर मोदींच्या मित्रांच्या फायद्यासाठी फडणवीस व भाजपा जनतेच्या मनातूनच डिलीट झाले, त्यांना पुन्हा संधी नाही

राज्यातील भाजपा सरकार शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा योजना सुरु केल्याचा ढोल बडवत आहे पण ते खरे नाही. राज्य सरकार शेतकऱ्यांचा हप्ता विमा कंपन्यांना देते. केंद्र व राज्य सरकार जो पैसा विमा कंपन्यांना देतात तो जनतेचाच पैसा असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी सरकारने हजारो कोटी रुपये भरले आहेत. आज राज्यात दुष्काळी …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, शेतकरी आणि आरक्षणाचा प्रश्न भाजपामुळेच चिघळला… शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काँग्रेस पक्ष प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करेल

भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्याकडे शेतमाल आला की बाजारात किंमती पाडून शेतकऱ्यांना भाव मिळू दिला जात नाही. कांदा, सोयाबीन, धान, कापूस, डाळ कोणत्याच पिकाला भाव मिळत नाही. भाजपाच्या शेतीविरोधी धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. भाजपा सरकारमुळे शेतकऱ्यांवर वाईट दिवस आले आहेत. आता या सरकारचे काऊंट डाऊन …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयाचे गौडबंगाल कोट्यवधी रूपयांच्या देयकाचा शासन निर्णय गायब होतोच कसा

कोविड काळातील दैनंदिन वापराच्या वस्तुंच्या प्रलंबित देयकाचा शासन निर्णय राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने संकेतस्थळावरून अचानक गायब केला. कोट्यवधी रूपयांच्या देयकाचा शासन निर्णय अचानक गायब केल्याने संशय बळावला आहे. विहित कार्यपद्धतीचा अवलंब न करता, शासन निर्णय गायब होतोच कसा? या शासन निर्णयाचे गौडबंगाल काय? असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, वंचितच्या शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत प्रवेश

काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज राज्यातील विविध भागातील राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, मनसे या पक्षातून शेकडो कार्यकर्त्यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या उपस्थितीत काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, हिरे उद्योगासह उर्वरित उद्योग गुजरातला नेण्यासाठी मोदी महाराष्ट्रात मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या वकील सदावर्तेचा बोलविता धनी कोण?

महाराष्ट्रातील मोठे उद्योग राज्यातून पळवून गुजरातला नेण्याचे ‘उद्योग’ मागील दीड वर्षांपासून सातत्याने सुरु आहेत. वेदांता-फॉक्सकॉनसह अनेक उद्योग गुजरातला देऊन शिंदे-फडणवीस-पवार हे महाराष्ट्राला अधोगतीकडे घेऊन जात आहेत. मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यात विद्यमान भाजपा सरकार कसलीही कमतरता भासू देत नाही. आता मुंबईतील मोठ्या हिरे उद्योगासह इतर उर्वरित उद्योगही सुरतला घेऊन …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, आरक्षणाचे गाजर दाखवित मराठा, ओबीसी, धनगरांना फसवले एकनाथ शिंदेंची खुर्ची राहील की नाही याची खात्री नाही, त्यांच्या शब्दाला किंमत नाही, ते काय आरक्षण देणार?

भारतीय जनता पक्षाने २०१४ मध्ये सत्तेत येण्याआधी मराठा, आदिवासी, धनगर, हलबा व ओबीसी समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवले. १० वर्ष सत्ता भोगली पण ते हे आश्वासन पाळू शकले नाहीत. आरक्षणाचे प्रश्न तीव्र होत चालले आहेत आणि समाजा-समाजात भांडणे लावण्याचे काम भाजपाने सुरु केले आहे त्याचा हा सर्व परिणाम आहे. आज या …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी, निकषांच्या खेळात शेतकऱ्यांना भरडू नका;निकषांचे सावट दूर करा राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा

राज्यात बहुतांशी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. टंचाईच्या तीव्र झळा शेतकऱ्यांना, सर्वसामान्य जनतेला सोसाव्या लागत आहेत. अशी परिस्थिती असताना फक्त ४० ते ४२ तालुक्यावर दुष्काळाचे सावट असल्याचे सरकारकडून भासवले जात आहे. सरकारने निकषाच्या खेळात शेतकऱ्यांना भरडू नये. अन्यायकारक निकष बदलून राज्यावरील दुष्काळाचे, निकषांचे …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी भाजपा सरकारला १० वर्ष का लागावी ? आरक्षणप्रश्नी सरकारने भूमिका स्पष्ट करुन मराठा व ओबीसी समाजाची दिशाभूल थांबवावी

राज्यात सध्या आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा व ओबीसी समाज एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. ट्रिपल इंजिन सरकारची आरक्षणप्रश्नी स्पष्ट भूमिका नसल्याने हा गुंता वाढत चालला आहे. समाजा-समाजात संशय वाढत चालला आहे. राज्य सरकारमध्येच आरक्षण प्रश्नावरून एकवाक्यता नाही. सरकारमधील मंत्री बोलतात एक तर दुसरीकडे जाहिरात देऊन वेगळाच संदेश देत आहेत, ही गोंधळाची परिस्थिती …

Read More »