चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका, काँग्रेसची… पुन्हा एकदा तीच मानसिकता

काँग्रेसनं अनेकवेळा हिंदूविरोधी भूमिका घेतली होती. आता पुन्हा एकदा त्यांची तीच मानसिकता समोर आली आहे. काँग्रेसनं राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण नाकारून करोडो रामभक्तांचा अवमान केला आहे. त्यामुळे जो न हित के राम का वह न किसी के काम का! हे काँग्रेसनं लक्षात ठेवावं अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, या निमित्ताने काँग्रेसची प्रभू रामचंद्रांच्याविरोधातील मानसिकता पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात काँग्रेसनं प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व नाकारलं होतं. रामायण काल्पनिक असल्याचा दावा केला होता. रामाच्या जन्माचे दाखले मागितले होते. मंदिराचा ७/१२ मागत होते अशी टीका केली.

पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राम मंदिराच्या निर्मितीबाबत अतिशय खालच्या दर्जाची टिप्पणी करत होते.. रामभक्तांची खिल्ली उडवत होते. आता पुन्हा एकदा करोडो भारतीयांच्या स्वप्नातील भव्य राम मंदिर उभारणी होत असताना काँग्रेसच्या पोटात दुखायला लागलं आहे असा खोचक टोलाही लगावला.

यापूर्वी काँग्रेसनं अनेकवेळा हिंदूविरोधी भूमिका घेतली होती. आता पुन्हा एकदा त्यांची तीच मानसिकता समोर आली आहे. काँग्रेसनं राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण नाकारून करोडो रामभक्तांचा अवमान केला आहे. त्यामुळे जो न हित के राम का वह न किसी के काम का! हे काँग्रेसनं लक्षात ठेवावं असा इशाराही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

About Editor

Check Also

ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू करण्यास मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय

ऊस गाळप हंगामाचे सन २०२६-२७ बाबत धोरण निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *