विधान परिषद निवडणूकीसाठी पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे नाव पक्षाकडून निश्चित केलेले असतानाही डॉ.सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज न भरता त्यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे काँग्रेसच्या हक्काची जागा सोडावी लागली. यापार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या राजकीय नाट्याची तक्रार प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना …
Read More »सत्यजीत तांबेच्या उमेदवारीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट, मी आधीच सांगितले होते… बाळासाहेब थोरात यांच्याशी मी आधीच बोललो होतो
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा काँग्रेस पक्षांतर्गत असलेला बेबनाव पुन्हा एकदा समोर आला. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिलेली असूनही त्यांनी ऐनवेळी आपला अर्जच दाखल केला नाही. तर मूळचे काँग्रेसचे नेते असलेले …
Read More »ठाकरे गटाचा भाजपाच्या माजी कार्यकर्त्या शुभांगी पाटील यांना पाठिंबा? नाशिक शिक्षक मतदारसंघात तांबे नाट्यानंतर ठाकरे गटाचा निर्णय
विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसने अधिकृत उमेदवारी दिलेली असतानाही विद्यमान आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. उलट आपले सुपुत्र सत्यजीत तांबे यांना अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरायला लावला. त्याचबरोबर भाजपाकडे पाठिंबा मागू असे जाहिर वक्तव्य सत्यजीत तांबे यांनी केले. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्यजीत तांबे …
Read More »MPSC विद्यार्थ्यांचे परीक्षेतील बदलाच्या विरोधात पुणेसह अनेक शहरात आंदोलन एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
लोकसेवा आयोगाने नुकतीच राजपत्रित अधिकारी वर्ग एक आणि वर्ग दोन साठीच्या मुख्य परीक्षा पद्धतीमध्ये बदल केला. आयोगामार्फत घेतली जाणारी ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या धर्तीवर वर्णनात्मक अर्थात लेखी परीक्षा करण्याचा असून याची अंमलबजावणी याच वर्षापासून म्हणजे २०२३ ला होणाऱ्या मुख्य परीक्षेपासून करण्याचे ठरवले आहे. नवीन पद्धत आत्मसात करण्यास …
Read More »सत्तेच्या गाजराची पुंगी निकामी झाल्याने महाविकास आघाडीची तिघाडी बिघडली भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका
सत्तेची संधी दिसल्यामुळे एकत्र आलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी ही केवळ गाजराची पुंगी होती हे आता स्पष्ट झाले आहे. सत्ता जाताच या आघाडीची बिघाडी झाली असून एकत्र राहिल्यास तीन तिघाडा काम बिघाडा होईल याची त्यांना खात्री असल्यामुळेच विधान परिषदेच्या निवडणुकीत तिघांची तोंडे तीन दिशांना असल्याचे दिसू लागले …
Read More »राष्ट्रवादीची खोचक टीका, पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट करत केली टीका
पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट करत भाजपावर खोचक टीका केली. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. सुनिल तांबे यांनी स्वतः उमेदवारी अर्ज न भरता आपला मुलगा सत्यजीत तांबे यास अपक्ष …
Read More »नाना पटोले म्हणाले, ते अपक्ष आहेत त्यांचे त्यांनी ठरवावं मात्र माहिती घेतल्यावरच बोलेन नाशिकमधील डॉ सुधीर तांबे यांच्या उमेदवारी अर्ज न भरण्यामागचं राजकारण
नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेसला देण्यात आल्यानंतर, काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना या जागेसाठी उमेदवारी घोषित केली होती. कारण, सुधीर तांबे हे काँग्रेसकडून तीनवेळा या मतदारसंघातून निवडून आले होते. काँग्रेसकडून सुधीर तांबे यांच्याच नावाने एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र, ऐनवेळी सुधीर तांबे यांनी आपली उमेदवारी मागे घेत …
Read More »सत्यजीत तांबे यांनी सांगितले कारण, का भरला अपक्ष उमेदवारी अर्ज राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण
महाविकास आघाडीकडून नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा काँग्रेसला देण्यात आली. यानंतर काँग्रेसने उमेदवार म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा केली. यानंतरही सुधीर तांबेंनी आपला अर्ज दाखल केला नाही. दुसरीकडे सत्यजीत तांबेंनी याच मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. यानंतर पत्रकारांनी ‘काँग्रेसने एवढा विश्वास ठेवला …
Read More »काँग्रेसने नाव केलं फायलन बापाच अन अर्ज भरला पोरानेः अलिकडची तिसरी घटना नाशिकमधील शिक्षक मतदारसंघातून सुधीर तांबेचे नाव पुढे पण अर्ज भरला सत्यजित तांबेने
विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत कोणत्या पक्षाने कोणती जागा लढवायची यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले. काँग्रेसकडून शेवटी आज दुपारी नाशिकमधील जागेसाठी सुधीर तांबे यांच्या नावाला मंजूरी दिली. मात्र प्रत्यक्षात सुधीर तांबे …
Read More »जयंत पाटील म्हणाले, या पाच जागा महाविकास आघाडी एकदिलाने लढविणार महाविकास आघाडीची बैठक पार पडली; पाचही जागांवर एकमत...
विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूकीची कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणूकीसाठी भाजपा आणि शिंदे गटाकडून कोकण आणि नागपूर शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारही जाहीर केले. यापार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आज दुपारी बैठक झाली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, …
Read More »
Marathi e-Batmya