Tag Archives: congress

बाळा नांदगांवकरांच्या ट्विटवर सचिन सावंतांचा खोचक सवाल, अयोध्या दि ट्रॅप चा रचेता कोण? भाजपा खासदार बृजभूषण सरण सिंगवरील मनसेच्या भूमिकेवर केला सवाल

काही महिन्यापूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे उत्तर प्रदेशातील भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. मात्र बृजभूषण सिंग हे पुण्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला हजर राहिले. यावेळी खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंनी त्यांच्या दौऱ्याला विरोध न केल्याबद्दल आभारही मानले. यानंतर मनसे …

Read More »

निवडणूक आयोगाच्या रिमोट व्होटींग मशिन्सवर विरोधकांचा आक्षेप आयोगाने केलेल्या प्रात्यक्षिकेनंतर विरोधी पक्षांचा विरोध

स्थलांतरित मतदारांसाठी तयार केलेल्या दूरस्थ अर्थात रिमोट इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (आरव्हीएम) नमुन्याचे निवडणूक आयोगाने सोमवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर केले. मात्र या प्रात्यक्षिकेनंतर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी या मतदान यंत्रावर आक्षेप घेत या रिमोट व्होटींग यंत्राबाबत आक्षेप नोंदविला. दूरस्थ इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबतचा निवडणूक आयोगाचा प्रस्ताव अर्धवट असून ठोस नसल्यामुळे त्याला विरोध …

Read More »

नाना पटोले म्हणाले, महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला, नागपूरची जागा काँग्रेसला शिवसेनेचा पाठिंबा शुभांगी पाटील यांना

नाशिक मतदारसंघात काँग्रेस नेते सुधीर तांबे आणि त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी परिस्थिती स्पष्ट झाली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातील मविआ उमेदवार शुभांगी पाटील असल्याचं जाहीर करत नाशिकची …

Read More »

संजय राऊतांचे सूचक विधान, प्रत्येकवेळी शिवसेना त्याग करणार नाही, मात्र विस्कळीतपणा… सेना नेत्यांच्या बैठकीनंतर दिली माहिती

विधान परिषद निवडणूकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत नाशिक पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ.सुधीर तांबे यांच्या उमेदवारीवरून विसंवाद असल्याचे दिसून आले. मात्र नाशिकमधील भाजपाच्या माजी नेत्या तथा अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाने घेतली असून नाशिकच्या बदल्यात नागपूर पदवीधर मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याचा …

Read More »

अखेर काँग्रेसने केली तांबेवर कारवाई डॉ. सुधीर तांबे यांना केले निलंबित

विधान परिषद निवडणूकीसाठी पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे नाव पक्षाकडून निश्चित केलेले असतानाही डॉ.सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज न भरता त्यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे काँग्रेसच्या हक्काची जागा सोडावी लागली. यापार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या राजकीय नाट्याची तक्रार प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना …

Read More »

सत्यजीत तांबेच्या उमेदवारीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट, मी आधीच सांगितले होते… बाळासाहेब थोरात यांच्याशी मी आधीच बोललो होतो

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा काँग्रेस पक्षांतर्गत असलेला बेबनाव पुन्हा एकदा समोर आला. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिलेली असूनही त्यांनी ऐनवेळी आपला अर्जच दाखल केला नाही. तर मूळचे काँग्रेसचे नेते असलेले …

Read More »

ठाकरे गटाचा भाजपाच्या माजी कार्यकर्त्या शुभांगी पाटील यांना पाठिंबा? नाशिक शिक्षक मतदारसंघात तांबे नाट्यानंतर ठाकरे गटाचा निर्णय

विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसने अधिकृत उमेदवारी दिलेली असतानाही विद्यमान आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. उलट आपले सुपुत्र सत्यजीत तांबे यांना अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरायला लावला. त्याचबरोबर भाजपाकडे पाठिंबा मागू असे जाहिर वक्तव्य सत्यजीत तांबे यांनी केले. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्यजीत तांबे …

Read More »

MPSC विद्यार्थ्यांचे परीक्षेतील बदलाच्या विरोधात पुणेसह अनेक शहरात आंदोलन एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा

लोकसेवा आयोगाने नुकतीच राजपत्रित अधिकारी वर्ग एक आणि वर्ग दोन साठीच्या मुख्य परीक्षा पद्धतीमध्ये बदल केला. आयोगामार्फत घेतली जाणारी ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या धर्तीवर वर्णनात्मक अर्थात लेखी परीक्षा करण्याचा असून याची अंमलबजावणी याच वर्षापासून म्हणजे २०२३ ला होणाऱ्या मुख्य परीक्षेपासून करण्याचे ठरवले आहे. नवीन पद्धत आत्मसात करण्यास …

Read More »

सत्तेच्या गाजराची पुंगी निकामी झाल्याने महाविकास आघाडीची तिघाडी बिघडली भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

सत्तेची संधी दिसल्यामुळे एकत्र आलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी ही केवळ गाजराची पुंगी होती हे आता स्पष्ट झाले आहे. सत्ता जाताच या आघाडीची बिघाडी झाली असून एकत्र राहिल्यास तीन तिघाडा काम बिघाडा होईल याची त्यांना खात्री असल्यामुळेच विधान परिषदेच्या निवडणुकीत तिघांची तोंडे तीन दिशांना असल्याचे दिसू लागले …

Read More »

राष्ट्रवादीची खोचक टीका, पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट करत केली टीका

पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट करत भाजपावर खोचक टीका केली. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. सुनिल तांबे यांनी स्वतः उमेदवारी अर्ज न भरता आपला मुलगा सत्यजीत तांबे यास अपक्ष …

Read More »