मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोनाचं संकट आहे. पण मंदीर उघडत नसल्याने काहीजण मला माझं हिंदूत्व विचारत असून ते म्हणतात मी सेक्युलर झाला की काय? असा प्रश्न विचारत आहेत. आम्हाला कोणाकडून हिंदूत्व शिकण्याची गरज नसून आमचं हिंदूत्व हे थाळ्या-घंटा बडविणार नसून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेल्या प्रमाणे अतिरेक्यांना मारणारं हिंदूत्व …
Read More »फडणवीस म्हणाले, विश्रांती घ्यावी अशी परमेश्वरांची इच्छा असावी म्हणून कोरोनाची लागण संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचे आणि विलगीकरणात राहण्याचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी देशाच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सत्यनारायण यांनी ईश्वराच्या करणीमुळे देशात कोरोनाची साथ असल्याचे अजब तर्कट मांडले. त्याचधर्तीवर आता भाजपाचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांनीही सतत काम करत राहील्याने आपण विश्रांती घ्यावी ईश्वराची असावी म्हणून कोरोनाची लागण झाल्याचे अजब तर्कट मांडले. त्यामुळे ईश्वरामुळे कोरोनाची लागण …
Read More »दौरा अतिवृष्टीग्रस्ताचा मात्र राजकारण रंगले फडणवीस-मुख्यमंत्री आणि पवार-राज्यपाल-पाटलांचे निम्म्या महाराष्ट्रावर संकट ओढावलं तरी राजकिय नेत्यांच्या टीका टिपण्या सुरूच
मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील पश्चिम महाराष्ट्रापासून ते मराठवाड्यापर्यत अनेक लहानमोठ्या गावात अतिवृष्टीमुळे घरे वाहून गेलीत तर काही ठिकाणी गावांचा संपर्क तुटला तर काही ठिकाणी शेत पिके जमिनीसकट वाहून गेल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे. त्यामुळे पुढील काही काळ शेतकरी आर्थिकदृष्ट्या उभा राहील का असा प्रश्न निर्माण झाला असतानाच या आपद्कालीन …
Read More »फडणवीस, दरेकरांचा दौरा पवारांच्या एका बालेकिल्ल्यातून सुरु होवून दुसऱ्यात संपणार दौऱ्याची सुरुवात बारामतीतून तर शेवट साताऱ्यात
मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात भाजपा आणि महाविकास आघाडी विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा विरूध्द शरद पवार विरूध्द भाजपा नेते देवेंद्र फडणवीस असा सामना रंगला पाह्यला मिळत आहे. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील नेते प्रविण दरेकर हे जोडीने जाणार आहे. मात्र या दौऱ्याची सुरुवात …
Read More »फडणवीस म्हणतायत, मुंबईत प्रादुर्भाव वाढतोय आणि चाचण्या कमी करताय मुंबईत २ टक्क्यांनी वाढले रूग्ण ,राज्यात प्रतिदिन चाचण्या ९२ हजाराहून ७५ हजारांवर
पाटणा: प्रतिनिधी कोरोना नियंत्रणात आणायचा असेल तर चाचण्यांवर लक्ष केंद्रीत करा, असा सातत्याने आग्रह करीत असताना प्रत्यक्षात मात्र राज्यातील ९२ हजार प्रतिदिन चाचण्यांचे प्रमाण आता ७५ हजार चाचण्या प्रतिदिन असे झाले आहे. मुंबईत सुद्धा संसर्गाचे प्रमाण हे २ टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे चाचण्यांवर लक्ष केंद्रीत करण्यासंदर्भात आणखी एक पत्र माजी …
Read More »देवेंद्र फडणवीस बारामतीतील शेतकऱ्यांना भेटून दौऱ्याची करणार सुरुवात सोमवारपासून तीन दिवसांच्या दौऱ्यावर
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकर्याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सोमवारी १९ ऑक्टोबरपासून ३ दिवसांचा दौरा करणार आहेत. १९ ला ते बारामतीपासून आपला दौरा प्रारंभ करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा इत्यादी ठिकाणी दौरा …
Read More »मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित म्हणाले, ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत द्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी
मुंबई : प्रतिनिधी परतीच्या पावसाने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान झाले असून, या नुकसानीची व्याप्ती पाहता ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने शेतकर्यांना थेट मदत देण्यात यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली. गेल्या ३/४ दिवसांत परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: …
Read More »ड्रिम प्रोजेक्ट जलयुक्त शिवारच्या SIT चौकशी आदेशाने फडणवीस अडचणीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जलयुक्त शिवार ही योजना राबविण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबतची आणि त्याच्या ठेक्याची कामे भाजपाच्याच पदाधिकाऱ्यांना-कार्यकर्त्यांना मिळत असल्याच्या तक्रारी सातत्याने करण्यात येत होत्या. यासंदर्भात नुकत्याच सादर झालेल्या कॅगच्या अहवालातही …
Read More »कांजूर मार्गची जागा अद्यापही वादातच; राज्याच्या तिजोरीवर परिणाम होणार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आरोप
मुंबई: प्रतिनिधी नियोजित आरेच्या जंगलातील मेट्रो कारशेड कांजूर मार्गला हस्तांतरीत करण्याचा निर्णय झाल्यानंतर सदरचा निर्णय पुर्णपणे चुकिचा असल्याचा पुन:रूच्चार करत हा कारशेड हलविण्याबाबत महाविकास आघाडी सरकारने स्थापन केलेल्या तज्ञ समितीने कांजूर मार्गची जमिन योग्य नसल्याचा निर्वाळा देत ही जमिन कायद्याच्या कचाट्यात असल्याचा अहवाल सादर केला असून त्यामुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक …
Read More »आरेप्रश्नी मुख्यमंत्री ठाकरेंचे फडणवीसांच्या प्रश्नाला उत्तर तर मुनगंटीवारांना टोला आरे कॉलनीतील कारशेड कांजूर मार्ग येथील सरकारी जमिनीवर होणार
मुंबई: प्रतिनिधी शहरातील जीवसृष्टी कायम रहावी यासाठी मुंबईत असलेल्या आरेच्या जंगलात उभारण्यात येत असलेल्या मेट्रो कारशेडचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मेट्रो कारशेड कांजूर मार्ग येथे होणार असून या कारशेडसाठी तेथील शासकिय जमिन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ही सरकारी शुन्य किंमतीने अर्थात मोफत देण्यात आली असून त्यासंबधीचे …
Read More »
Marathi e-Batmya