Tag Archives: eknath shinde

अजित पवार म्हणाले, मराठा आरक्षण प्रश्नी सर्वपक्षिय बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली बैठक

जालना येथील आंतरवाली सराटे येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण प्रश्नी उपोषणाचे आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या या उपोषणाच्या आंदोलनाचा आज १४ वा दिवस असून आजपासून मनोज जरांगे पाटील यांनी वैद्यकीय उपचार आणि पाणीही त्यागले आहे. त्यातच राज्य सरकारने दोन वेळा सुधारणा केलेल्या राज्य सरकारचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी …

Read More »

जयंत पाटील यांची टीका, सरकारला शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसता येणार नाही शेतकरी आत्महत्या मुक्त राज्य करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा मात्र आत्महत्यांनी गाठला उच्चांक

राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या संख्येवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यास सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी या सरकारच्या माथ्यावर लागलेला शेतकरी आत्महत्येचा हा ‘कलंक’ सरकारला पुसता येणार नाही असा हल्लाबोल त्यांनी सरकारवर केला आहे. एका बातमीचा आधार …

Read More »

उद्धव ठाकरे यांची टीका, शिवसेनेची स्थापना कमळाबाईला पालखीत… भाजपा आणि शिंदे गटावर केली सडकून टीका

शिवसेनेतील फुटीर गटाकडून आणि भाजपाकडून सातत्याने ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शिवसेनेची काँग्रेस केल्याचा आरोप सातत्याने करण्यात येतो. त्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, २५ वर्षे ज्यांच्यासोबत राहिलो त्यांनी आतापर्यंत आमची दोस्तीच पाहिली. मात्र आता आमच्या मशालीची धगही सोसा असा गर्भित इशारा भाजपाला देत २५ …

Read More »

भाजपा झाली चिंतीत, ४० टक्क्याच्या रिपोर्ट कार्ड वाल्यांना घरचा रस्ता अजित पवार यांच्या येण्याने भाजपाची गोची वाढली, तर एकनाथ शिंदेंना तुमचं तुम्हीच बघा म्हणण्याच्या तयारीत

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे २०२४ च्या निवडणूकीतही आपणच पंतप्रधान पदी परत येणार असल्याची घोषणा विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भाषण करताना केली. तसेच लोकसभा निवडणूकीत जागा वाढविण्यासाठी लहान-मोठ्या प्रादेशिक पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर फुट पाडण्याचे कामही सुरु करण्यात आले. परंतु आता हेच फुट पाडणे भाजपाच्या …

Read More »

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता

गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ टक्क्यांवरुन ३८ टक्के करण्याच्या प्रस्तावावर आज मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय देण्यात येते. त्यामुळे महागाई भत्त्यामध्ये ४ टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारवर ९ …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांची स्पष्टोक्ती, राज्य सरकारच्या निर्णयाचा उपयोग नाही वंशावळीच्या उल्लेखाने व्यक्त केली नाराजी

मागील नऊ-१० दिवसांपासून मराठा आरक्षण प्रश्नी जालन्यातील अंबड ताालुक्यातील आंतरवली गावात उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले. तसेच या आश्वासनानंतर शासन निर्णयही आज राज्य सरकारकडून जारी करण्यात आला. मात्र शासन निर्णय पाहताच आंदोलक मनोज जरांगे पाटील …

Read More »

निजाम काळातील मराठा कुणबीच्या नोंदी तपासण्यासाठी निवृत्त न्यायाधिशांची समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

जालना येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलनाची दखल शासनाने गांभिर्याने दखल घेतली आहे. आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणी नुसार मराठवाड्यातील मराठा समाजाच्या पुर्वजांच्या निजामकाळातील महसूली नोंदी तपासून त्याप्रमाणे मराठा समाजाला कुणबी असे प्रमाणपत्र देण्यात येईल. सचिव महसूल यांची या पुर्वीच नियुक्त समितीच्या मदतीने निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्य …

Read More »

पीक विमा अग्रिम, पिण्याचे पाणी, चाऱ्याची व्यवस्था याविषयी मुख्यमंत्र्यांचे निर्देश कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर काटेकोर नियोजन करावे

राज्यात आतापर्यंत सरासरीच्या ८१.०७ टक्के पाऊस झाला असून कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ते नियोजन काटेकोरपणे करण्यात यावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. राज्यात १ ते ६ सप्टेंबर दरम्यान केवळ २४०५ म्हणजे सरासरी १३.६० टक्के पाऊस पडला आहे. २५७९ पैकी ४४६ महसुली भागात …

Read More »

सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करणार आहे. हे कर्ज अटी आणि शर्तींच्या अधीन राहून उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या योजनेच्या अनुषंगाने सहकारी साखर कारखान्यांना त्यांच्या फेस व्हॅल्युनुसार कर्ज व तारणाचे प्रमाण …

Read More »

राज्यात सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प, या गोष्टी सुरु होणार २४ तास कॉल सेंटर कार्यरत राहणार

सायबर गुन्ह्यांविरुद्ध तातडीने उपाययोजना करण्यासाठी राज्यात ८३७ कोटी रुपयांचा सायबर सुरक्षा प्रकल्प राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या प्रकल्पामुळे नागरिकांना आता एका फोनवरून आठवडाभर २४ तास कार्यरत कॉल सेंटरवर तक्रार नोंदवता येणार आहे. अत्याधुनिक सायबर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तक्रारीचा तपास केला जाईल, …

Read More »