भोंदूबाबा अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिराला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने २०१८ साली १.५ कोटी रुपयांचा निधी दिला होता. फडणवीसांच्या कार्यालयात त्यावेळी कार्यरत असणारे व आता म्हाडाचे अधिकारी मिलिंद बोरीकर यांचेही या बाबाशी अत्यंत जवळकीचे संबंध आहेत, अशी माहिती मिळत आहे. अशोक खरात प्रकरणात सरकारने प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री आणि दोन …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, भोंदूबाबाची माहिती दिवाळीमध्येच मुख्यमंत्र्यांकडे होती; तर सहा महिने झोपा काढल्या काय? मंत्री पोलिसांकडून मार खातात हे अत्यंत गंभीर; साताऱ्यातील प्रकरणाने वोटचोरीवर पुन्हा शिक्कामोर्तब
दिवाळीच्या आसपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची माहिती मिळाली होती. ऑक्टोबर, नोव्हेंबरपासूनच खरातचे गैरव्यवहार चव्हाट्यावर आले, गृहविभाग पुरावेही गोळा करत होते, मग मुख्यमंत्री सहा महिने झोपा काढत होते का?, असा संतप्त सवाल उपस्थित करून खरात प्रकरणाने जी विकृत चर्चा सुरु आहे ती महाराष्ट्रासाठी चांगली नाही. एसआयटीला अधिकची कुमक द्या, टास्क फोर्स लावा आणि …
Read More »एपस्टिन फाईल प्रकरणी काँग्रेस-‘वंचित’चा रा. स्व. संघाच्या नागपूरच्या मुख्यालयावर मोर्चा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात धडक मोर्चा
एपस्टिन फाईलमध्ये आलेला नरेंद्र मोदींच्या नावाचा उल्लेख व अमेरिकेशी तडजोड करणारे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावर कायम का ठेवले? याचा जाब विचारण्यासाठी सोमवारी २३ मार्च रोजी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी व समविचारी पक्षांचा संयुक्त मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. नागपुरातील संविधान चौक ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयापर्यंत हा धडक मोर्चा काढण्यात …
Read More »तुषार गांधी यांचे आवाहन, रा. स्व. संघाच्या विचाराला महाडच्या ऐतिहासिक भूमितच गाडून टाका छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॅा. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना जातीच्या चौकटीत बंद करू नका: उल्का महाजन
मनुवादी व्यवस्थेने जसे अनेक घटकांवर नियंत्रण ठेवले होते तसेच पाण्यावरही नियंत्रण ठेवून समाजातील एका घटकाला पाण्यापासून वंचित ठेवले होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ साली महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून ऐतिहासिक क्रांती केली. या ऐतिहासिक क्रांतीने जातीयवादी, स्पृश्य अस्पृश्य व्यवस्थेला मूठमाती देत समता, बंधुता व सामाजिक न्यायाचा संदेश …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची आशा, अमेरिका इस्त्राईल इराण युद्ध संपून शांतता निर्माण व्हावी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली इराणचे कॅान्सुल जनरल सईद रझा मोसायब मोतलाघ यांची भेट
अमेरिका इस्त्राईल इराण यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा जगभर परिणाम होत आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतातही गॅस व इंधन तुटवडा जाणवू लागला आहे. हे युद्ध लवकर संपून आशियात शांतता निर्माण व्हावी, अशी सदिच्छा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज इराणच्या कॉन्सुलेटला भेट …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा स्पष्टोक्ती, काँग्रेस मुक्ता कदम आणि डॉ दीपक पवार यांच्या पाठिशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे ट्वीट
भाजपा आणि रा.स्व.संघाच्या यंत्रणेला धक्का पोहोचू लागला की सत्तेच्या माध्यमातून त्यांचे हस्तक बनलेल्या प्रशासनाकरवी अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी करून बोलणाऱ्यांचा आवाज ते दाबू पाहतात. आपल्या या महाराष्ट्राच्या मातीला लढाऊ बाणा वारसा हक्काने लाभलाय. याच स्वाभिमानी महाराष्ट्राच्या भूमीतील स्वतंत्र पत्रकार म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या मुक्ता कदम व मराठी भाषा केंद्राचे अध्यक्ष व …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, एलपीजी दरवाढ तात्काळ रद्द करा, गॅस धोरण संसदेत जाहीर करा १५०० रुपये देण्याचा ढोल पिटणाऱ्या सत्तेतील सावत्र भावांकडून गॅस महाग करून लाडक्या बहिणींची लूट.
एलपीजी गॅस ६० रुपयांनी महाग करून भाजपा सरकारने सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खोल दरीत लोटले आहे. केंद्रातील भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ही दरवाढ झालेली आहे. युद्धाचे कारण पुढे करून जनतेची लूट करण्याऐवजी सरकारने ही दरवाढ तात्काळ रद्द करावी तसेच एलपीजी गॅस संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व घटकांशी चर्चा करून संसदेत …
Read More »काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये गुरुवार पासून कार्यशाळा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांच्यासह ज्येष्ठ नेते व तज्ञ मार्गदर्शन करणार.
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र विभागातील सर्व उमेदवारांसाठी दोन दिवसांच्या निवासी प्रशिक्षण कार्यशाळा त्र्यंबकेश्वर येथे आयोजित केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या या लोकप्रतिनिधी प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन उद्या गुरुवारी १२ मार्च रोजी श्रीचंद्र गार्डन लॉन्स येथे होणार असून १३ मार्चला कार्यशाळेची …
Read More »प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत संदीप शेळकेंचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश.. फडणविसांच्या पोटातील ओठावर आले; ‘गेट वेल सून, फडणवीस’
बुलढाणा जिल्ह्यातील धडाडीचे नेते संदीप शेळके यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी संदीप शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून जिल्ह्यात काँग्रेस पक्ष …
Read More »काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचा आरएसएस मुख्यालयावर मोर्चा अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप
देशाच्या सार्वभौमत्व आणि आर्थिक स्वायत्ततेशी तडजोड केल्याचा आरोप करत काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीने नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मुख्यालयासमोर मोठे आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर १० मार्च रोजी मुंबईतील फोर्ट परिसरातील ठाकरसी हाऊस येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत २३ मार्च रोजी नागपूर येथे …
Read More »
Marathi e-Batmya