काँग्रेसच्या सात हजार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसाठी टिळक भवनमध्ये प्रशिक्षण शिबीर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शन करणार

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत राज्यातील विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्त करण्यात आलेली आहे. या अभियानातून काँग्रेसने ७ हजार पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. या ७ हजार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे दिनांक २६ मे ते २९ मे दरम्यान विभागनिहाय प्रशिक्षण शिबिर होणार आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विषयातील तज्ञ यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.

महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष संघटना बळकट करण्यासाठी संघटन सृजन अभियानाच्या माध्यमातून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने प्रत्येक जिल्ह्यासाठी निरिक्षक नियुक्त केले होते, त्यांच्यासोबत प्रदेश काँग्रेसने दोन निरिक्षकांची नियुक्ती केली होती. या निरिक्षकांनी प्रत्येक जिल्हा, तालुक्यात जाऊन इच्छुकांकडून अर्ज मागवले व नंतर त्यांच्या मुलाखती घेऊन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेतून आघाडी, संघटना, विभाग व सेल यांचे पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडली. नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांसाठी हे प्रशिक्षण शिबिर घेण्यात येत आहे, अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील यांनी दिली.

 

About Editor

Check Also

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ शेवटची तीन महिन्यांची मुदतवाढ

२०२६-२७ या शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आरक्षित प्रवर्गातून प्रवेश निश्चित झालेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *