Tag Archives: mangalprabhat lodha

काँग्रेसच्या आंदोलनावेळी भेट नाकारणाऱ्या मंगलप्रभात लोढा यांचा अखेर १ कोटी रूपयांचा निधी रोहिंग्या बांग्लादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

मागील आठवड्यात मालवणी येथील मुंबई महानगरपालिकेची शाळा खाजगी व्यक्तीच्या खिशात घालण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेस आमदार अस्लम शेख आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी करत आंदोलन केले. तसेच पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना भेटून याप्रश्नी जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काँग्रेसच्या आंदोलकांना भेट …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला, लोढा व अदानींच्या मुंबईतील इमारतीमध्येच आदर्श कबुतरखाना उभारा अधिका-यांच्या पोस्टिंगवरून सरकारमध्ये गँगवार, एकाच पदावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून दोन वेगवेगळ्या अधिका-यांची नियुक्ती

मुंबईच्या दादर येथील कबुतरखान्यावरून वाद सुरु असून यात राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा हिरीरीने भाग घेताना दिसत आहेत. मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबईत खूप मोठ्या प्रमाणात जमिनी व मोठ्या इमारतीही आहेत. तसेच सरकारने अदानीला मुंबईतील ३३ टक्के जमीन दिलेली आहे. लोढा व अदानी यांनी त्यांच्या जागेतच एक आदर्श कबूतरखाना उभारून करुणेचा नवा …

Read More »

मंगलप्रभात लोढा यांचे आदेश, गणेशोत्सवात रात्री लोकल आणि मेट्रो सुरु ठेवा जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार

महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात साजरा होणारा गणेशोत्सव जगप्रसिद्ध असून रात्री उशिरापर्यंत गणेशभक्त दर्शनासाठी येत असतात अशा वेळी गणेशभक्तांसाठी लोकल आणि मेट्रो सुरु ठेवण्यासंदर्भात रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. महापालिकेच्या ग्रांट रोड येथील डी विभाग …

Read More »

मंत्री म्हणाले होते, लव्ह जिहाद प्रकरणाची माहिती ऐकिव, पण सरकार आणतेय कायदा लव्ह जिहाद कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी समितीची स्थापना

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश राज्यांप्रमाणे मुंबईसह राज्यात, भाजपाच्या दाव्यानुसार हिंदू-मुस्लिम धर्मियातील लव्ह बर्ड्संना अटकाव करण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपा प्रणित  महायुती सरकारही लव्ह जिहादचा कायदा आणण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे राज्यात लव्ह जिहाद प्रकरणाची एक लाख तक्रारी असल्याची ऐकिव माहिती असल्याचा खुलासा तत्कालीन महिला व बालविकास मंत्र्यांनी अधिवेशन काळात विधानसभा सभागृहात केला …

Read More »

मुंबई समुद्र किनारी रस्त्याची उत्तर वाहिनीचे लोकार्पणः काय आहेत या प्रकल्पाची वैशिष्टै सोमवारपासून मुंबईकरांच्या सेवेत, किनारी रस्त्यामुळे वेळ आणि इंधनाची बचत तर प्रदूषणापासून मुक्ती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाले. किनारी रस्त्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत तसेच इंधनामध्ये मोठी बचत होणार असून प्रदूषणापासून मुक्ती मिळण्यामध्ये हा मार्ग महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, ‘स्टार्टअप्स’साठीचे नवीन धोरण देशातील सर्वाधिक आधुनिक सिडबी (SIDBI) कडून स्टार्टअप्ससाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद

काळाची गरज ओळखून स्टार्टअप्स धोरणाचा नवीन मसुदा तयार केला आहे. उद्योजकांना सूचनांसाठी हा मसुदा उपलब्ध करून देण्यात आला असून हे देशातील आधुनिक धोरण ठरणार आहे. या माध्यमातून राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच सिडबी (स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया) कडून स्टार्टअप्ससाठी दोनशे कोटी रुपयांची तर प्रत्येक प्रादेशिक …

Read More »

श्रद्धा वालकर घटनेची मुंबईत पुनरावृत्ती! निजामने केली पुनमची निघृण हत्या

मानखुर्द येथील साठेनगर परिसरात राहणाऱ्या पूनम क्षीरसागर नामक मातंग समाजातील तरुणीचा मृतदेह तुकडे करून एका सुटकेसमध्ये भरून निर्जनस्थळी ठेऊन देण्यात आला होता. निजाम नामक टॅक्सी ड्रायव्हर तिला १८ एप्रिलला पळवून घेऊन गेला आणि कल्याणमध्ये तिची हत्या केली. दोन दिवसांपूर्वी ही घटना उघडकीस आली. स्थानिकांमध्ये या घटनेविरुद्ध आक्रोश असून त्यासंदर्भात स्थानिकांनी …

Read More »

कोस्टल रोडच्या परिसरात जागतिक दर्जाचे पार्क उभे करणार

धर्मवीर संभाजी महाराज मुंबई सागरी रस्ता म्हणजेच मुंबई कोस्टल रोडच्या परिसरात ३२० एकर जागतिक दर्जाचे पार्क उभे केले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. सागरी किनारा रस्त्यासह मुख्यमंत्री शिंदे यांनी वरळी, दादर परिसरातील सिमेंट रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. पावसाळ्यापूर्वी ही सर्व कामे वेळेत पूर्ण व्हावीत, असे निर्देशही …

Read More »

अजित पवार यांची घोषणा, बारामती राज्यात पहिल्या क्रमांकावर आणणार

मराठवाडा, विदर्भातील महारोजगार मेळाव्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील मेळाव्याचे आयोजन अहमदनगर नंतर बारामती येथे करण्यात आले. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित होते. तर स्थानिक खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे आवर्जून उपस्थित होते. यावेळी अजित पवार बोलताना म्हणाले की, मागील अनेक …

Read More »

मुंबई उपनगरात महासंस्कृती महोत्सवांतर्गत बौद्ध महोत्सव आणि शबरी महोत्सवाचे आयोजन

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत काळात ‘महासंस्कृती महोत्सव २०२४’ अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम राज्यभर आयोजित करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून, ‘मुंबई उपनगर जिल्ह्यात बौद्ध महोत्सव आणि शबरी महोत्सवाचे’आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज मंत्रालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना …

Read More »