Tag Archives: maratha reservation

मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करुन घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा होकार मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नांना मिळाले बळ

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने होकार दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने याबाबत केलेल्या प्रयत्नांना मिळालेले हे यश आहे. राज्य शासनाने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी घेण्यास सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड यांनी होकार दिला आहे. …

Read More »

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी फडणवीसांना समजून सांगा, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा १०० एकरच वावर विकत घेतलं नाही तर भाड्याने घेतलंय, सदावर्ते तुमचाच कार्यकर्ता

आंतरावली सराटे येथील जाहिर सभेसाठी आम्ही १०० एकराचं वावर घेतल्याचं समजताच काही जण आमच्यावर मराठा समाजानेच निवडूण दिलेल्यांकडून आमच्यावर आरोप करायला लागले की, इतका पैसा आला कोठून यांना १० कोटी मिळाले. निवडून दिलेल्या आमदाराने मराठा समाजाचा पैसा खाल्यानेच त्यांना तिकडचं बेसण खाऊन यावं लागलं असा उपरोधिक टोला मनोज जरांगे पाटील …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांनी केल्या मराठा आरक्षणासह या प्रमुख मागण्या १० दिवसात आरक्षण द्या

माझी या मराठ्याच्या मुलाची राज्य आणि केंद्र सरकारला एकच शेवटची विनंती असून तुम्हाला दिलेले एक महिन्याची मुदत संपत आली आहे. फक्त १० दिवस आता शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी जी काही समिती नेमली आहे तिचे काम थांबवा आणि सर्व मराठ्यांना कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देऊन आरक्षण जाहिर करा अन्यथा २२ …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टच सांगितले, राजकारणात उतरणार…. मराठा समाजाला आरक्षणांचा लढा महत्वाचा

मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारला अल्टीमेटम देत सरकारच्या धोरणाविरोधात उपोषणाचे हत्यार मनोज जरांगे पाटील यांनी उपसले. अखेर जरांगे पाटील यांच्या मागण्यासमोर राज्य सरकारने माघार घेत एका महिन्यात ओबीसी समाजातील कुणबी समुदायाला मराठा आरक्षणाचा लाभ देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा दौरा सुरु केला. …

Read More »

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ओबीसी समाजाची बैठक इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

इतर मागास समाजाच्या अर्थात ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे. इतर मागास समाजाचे महामंडळ, सारथी, बार्टी, महाज्योती, टीआरटीआय या संस्थांना निधी वाटपात सुसुत्रता आणतानाच सर्व समाज घटकांना समप्रमाणात न्याय देण्यात येईल, केंद्र शासनाच्या विश्वकर्मा योजनेची सांगड घालत राज्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी करून बारा …

Read More »

राज ठाकरे म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणात मुख्यमंत्री शिंदेंनी तोडगा काढला ते … पूर्ण न होणारी आश्वासन दिली नसतील अशी आशा

मनोज जरांगे पाटील ह्यांचं मराठा आरक्षणासाठी गेले १७ दिवस जे उपोषण सुरु होतं ते त्यांनी मागे घेतलं, ही समाधानाची बाब. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी मध्यस्थी करून तोडगा काढला हे बरं झालं. पण हे उपोषण सोडवताना सरकारकडून कोणतीही पूर्ण न होऊ शकणारी आश्वासनं दिली गेलेली नाहीत, अशी मी आशा करतो असे …

Read More »

सत्तेत असताना मराठा समाजाला आरक्षण देण्याची उद्धव ठाकरेंची इच्छा नव्हती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची टीका

अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासाठी काहीही न करणारे उद्धव ठाकरे सध्या आरक्षण विषयावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पातळी सोडून टीका करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला आपण स्वतः त्याच भाषेत उत्तर देऊ, असे केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी गुरूवारी सांगितले. भाजपा प्रदेश कार्यालयात …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, मनोज जरांगेंचे उपोषण सोडण्यास देवेंद्र फडणवीस का गेले नाहीत? एकनाथ शिंदेंनी जरांगेंना दिलेल्या शब्दाला फडणवीसांचा पाठिंबा आहे का?

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरावली सराटी गावात उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांनी १७ व्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दावर विश्वास ठेवून उपोषण सोडले हे चांगले झाले. मुख्यमंत्री स्वतः गेले म्हणजे सरकार जरांगे यांना भेटले असाच त्याचा अर्थ होतो पण तिघाडी सरकारमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांची मागणी, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी उपोषणस्थळी यावे महिनाभरात आरक्षण द्या

मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी गावात मनोज जरांगे पाटील गेल्या १५ दिवसांपासून उपोषण आंदोलन करीत आहेत. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. दरम्यान या बैठकीच्या ठराव प्रत आज माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि मंत्री संदिपान भुमरे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे …

Read More »

अखेर मराठा आंदोलकांवरील लाठीमार प्रकरणी पोलिस अधिकारी निलंबितः शासन निर्णय जारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी राजीनाम्याऐवजी अधिकाऱ्यांचे निलंबन

जालना येथील आंतरावली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सध्या सुरु असलेल्या मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलन करण्यात येत होते. मात्र त्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीमार केल्या करा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारने केली होती. त्यानुसार जालनाच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांना अखेर आज निलंबति केल्याचा शासन निर्णय राज्य सरकारने आज …

Read More »