मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टच सांगितले, राजकारणात उतरणार…. मराठा समाजाला आरक्षणांचा लढा महत्वाचा

मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारला अल्टीमेटम देत सरकारच्या धोरणाविरोधात उपोषणाचे हत्यार मनोज जरांगे पाटील यांनी उपसले. अखेर जरांगे पाटील यांच्या मागण्यासमोर राज्य सरकारने माघार घेत एका महिन्यात ओबीसी समाजातील कुणबी समुदायाला मराठा आरक्षणाचा लाभ देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा दौरा सुरु केला.

तसेच मनोज जरांगे पाटील यांनी या दौऱ्याच्या निमित्ताने मराठा आरक्षण प्रश्नी जनजागृतीचे काम सुरु केले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्यानिमित्त जेथे ठिकठिकाणी मराठा समाचाकडून उत्स्पूर्दपणे स्वागत करत आहेत. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांचे राजकिय वजन आणि पाठिंबाही वाढताना दिसत आहे.

हे स्वागत होत असताना मनोज जरांगे पाटील यांना आता राजकारणात उतरणार का असा सवाल करण्यात आला. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आपली आगामी राजकिय भूमिका स्पष्ट केली.

यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, राजकारणात जायची इच्छा नाही. मी मराठा समाजाची सेवा करतोय. मला नेता बनायचं नाही. मराठा समाजाला अनेक पिढ्यांपासून आरक्षणाच्या वेदना आहेत. त्यासाठी हा लढा उभा राहिला आहे. त्यामुळे १०० टक्के मराठा आरक्षण मिळणारच.

पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील तो प्रश्नच तुम्ही मला विचारू नका. ते माझ्या डोक्यात नाही. ती आपली वाटच नाही. आपली वाट एकच आहे, मराठा आरक्षण हीच आपली वाट. समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचे मत, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुलेंच्या विचारांची आजच्या काळातही नितांत गरज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त काँग्रेस पक्ष वर्षभर विविध उपक्रम राबविणार; बारामतीतून उमेदवारी अर्ज माघारी घेतला पण पाठिंबा दिलेला नाही;

महात्मा ज्योतीबा फुले यांचे महाराष्ट्रासाठी व देशासाठी मोठे योगदान आहे. सत्यशोधक चळवळ, पुरोगामी चळवळीचा वारसा, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *