मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या राजकारणातील स्पष्ट भूमिका आणि नेमके मुद्दे मांडणारे नेते म्हणून राज ठाकरे यांच्याकडे पाहिलं जाते. आतापर्यंत राज ठाकरे यांनी राज्याची मातृभाषा मराठी माणूस यासह स्थानिक भूमिपुत्रांचा मुद्दा सातत्याने मांडत आलेले आहेत. मात्र यंदा १५ ऑगस्ट आणि स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात प्रवेश करताना त्यांनी पहिल्यांदाच राज्यातील नागरीकांना देश म्हणून …
Read More »…जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसावा राज ठाकरेंना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा उपरोधिक टोला
मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी कॉंग्रेस शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. त्यांच्या ठरलेल्या धोरणानुसार आम्ही राजकारण करतो. मात्र राज ठाकरे यांना हे माहीत नसावे किंवा जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसावा म्हणून ते अशाप्रकारचे वक्तव्य करत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला. एका …
Read More »राज ठाकरेंचा पंतप्रधानांना सवाल, रेमडेसिविरचे वितरण केंद्राकडे घेण्याचे प्रयोजन काय? अविश्वास दाखविण्याऐवजी राज्यांकडे जबाबदारी सोपविण्याची मागणी
मुंबई: प्रतिनिधी कोरोना साथ रोगाशी लढण्याचे प्रमुख काम राज्यातील स्थानिक रूग्णालये, तेथील वैद्यकिय व्यवस्था राखणारे डॉक्टर, नर्सेस यांच्याकडून होत आहे. त्याचे नियोजन करण्याचा अनुभव त्यांचा जास्त आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर बाधित रूग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिविर औषधाचे वितरण व्यवस्था स्वत:कडे अर्थात केंद्राने घेण्याचे काय प्रयोजन काय? असा सवाल मनसे प्रमुख राज …
Read More »वीज बील माफीप्रश्नी राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट, अदानी पवारांच्या घरी भेटीनंतरच वीज बील माफीवरून सरकारचे घुमजाव
ठाणे : प्रतिनिधी लॉकडाऊनमधील भरमसाठ वाढीव वीजबिल माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहिर केला. नंतर मात्र बिल माफ करणार नसल्याचे जाहिर केले. परंतु ज्यावेळी हा निर्णय जाहिर केला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरी गौतम अदानी हे येवून गेल्याने वीज बील माफ करणार नसल्याचे सरकारने जाहिर केल्याचा गौप्यस्फोट …
Read More »रेल्वेचा अजब कारभार : निवड झालेल्या राज्यातील ५६५ जणांना नोकरीवरच घेईना १ डिसेंबर रोजी सीएसएमटीला आंदोलन करण्याचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी काही महिन्यांपूर्वी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वेत मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात येणार असल्याचे जाहीर करत नोकर भरतीच्या जाहिरातीही प्रकाशित केल्या. मात्र या प्रक्रियेत निवड झालेल्या महाराष्ट्रातील जवळपास ५६५ उमेदवारांना वर्ष होत आले तरी अद्याप नोकरीवर रूजूच करून घेण्यात येत नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असून लवकरात लवकर …
Read More »वीज सवलतीवरून मनसे, भाजपा, वंचित आक्रमक नागरिकांना वीज बिल न भरण्याचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊन काळातील वाढीव वीज बिलात सवलत देण्याची घोषणा करणारे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या सततच्या घोषणेनंतर अचानक यु टर्न घेत वीज बिलात सवलत देता येणार नसल्याचे सांगत नागरिकांनी वीज बिले भरावीत असे आवाहन केले. त्यामुळे भाजपाचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मनसे नेते बाळा नांदगांवकर आणि …
Read More »राज नी शॉन कॉनरी यांना वाहिली अनोख्या पध्दतीने श्रध्दांजली; वाचा त्यांच्याच शब्दात बॉन्ड म्हणजे शॉन कॉनरी
मुंबई : प्रतिनिधी प्रसिध्द चित्रपट अभिनेते तथा हॉलीवूडपटाच्या जेम्स बॉण्ड या चित्रपटाचे पहिले आणि सर्वाधिक बॉण्ड म्हणून व्यक्तीरेखा साकारलेले शॉन कॉनरी यांचे नुकतेच त्यांच्या राहत्या घरी वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. महाराष्ट्रात राजकिय नेता ते चित्रपट रसिक म्हणून परिचित असलेले तथा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या खास शब्दात शॉन …
Read More »वीज बीलप्रश्नी राज भेटले राज्यपालांना, मात्र सल्ला दिला पवारांना भेटण्याचा शरद पवार यांच्या टोल्यानंतर राज्यपालांची सावध पवित्रा
मुंबईः प्रतिनिधी लॉकडाऊन काळापासून राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना वाढीव वीज बील मोठ्या प्रमाणावर येत आहेत. याप्रश्नी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या शिष्टमंडळासोबत आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत निवेदन दिले. त्यावर राज्यपालांनी याप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेण्याचा सल्ला दिल्याची माहिती दस्तुरखुद्द राज ठाकरे यांनीच प्रसारमाध्यमांना दिली. …
Read More »पोलिस यंत्रणेला चकमा देत मनसे कार्यकर्त्यांचा लोकलने प्रवास ठिकठिकाणी सविनय कायदेभंग आंदोलन
मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि उपनगरावासियांची जीवन वाहिनी असलेल्या लोकलने प्रवास करण्यास सर्वांना प्रवास करण्यास राज्य सरकारने बंदी आणली असून फक्त सरकारने परवानगी दिलेल्यांनाच प्रवास करण्याची मुभा दिली. मात्र मुंबईसह उपनगरातील नागरीकांना दैनदिन कामासाठी एक तर एस.टी अथवा खाजगी बसने प्रवास करावा लागतो. त्यामुळे वेळेचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत …
Read More »राज म्हणाले मुख्यमंत्री ठाकरेंना, महसूलासाठी तरी हॉटेल, वाईन शॉप उघडा महिन्याकाठी १२५० कोटी रूपयांचा महसूल न गमाविण्याची पत्राद्वारे विनंती
मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोना लॉकडाऊनमुळे सर्व अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. हॉटेल ही मुंबईकरांसाठी चैनीची गोष्ट नव्हे तर गरज आहे. त्यातच माफक आणि स्वस्त दरात जेवण मिळणारी हॉटेल्स बंद असल्याने नागरिकांचीही गैरसोय होत आहे. यापार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेत धुगधुगी निर्माण करण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त दरात जेवण मिळण्यासाठी हॉटेल्स आणि वाईन शॉप्स सुरु …
Read More »
Marathi e-Batmya