नरेंद्र मोदींची वृत्ती ही दारुड्याची आहे. दारुड्या दारू प्यायला मिळाली नाही तर काय करतो ? सोनं नानं विकतो, घरदार विकतो. मोदी सुद्धा आता तेच करत आहेत. त्यांनी एअर इंडिया विकली, आता तेल कंपन्या आणि स्थानिक कारखाने विकणार असे म्हणत आहे, अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश …
Read More »प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा
परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांनी त्यांच्या जर्मनी दौऱ्यासाठी राजकीय मंजुरी घेतली नाही. साप्ताहिक पत्रकार परिषदेला संबोधित करताना, MEA चे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, “उक्त खासदाराच्या जर्मनीच्या प्रवासासंदर्भात MEA कडून कोणतीही राजकीय मंजुरी मागितली गेली नाही किंवा जारी केली …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, सहा हजार कोटी पंतप्रधान कार्यालयाकडून वसूल
साडे सहा हजार कोटी रुपये पंतप्रधान कार्यालयाने वसूल केले आहेत. मी स्वतःचे काहीच बोलत नाही. त्यांनी मला अटक करावी, असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उस्मानाबाद येथे दिले. ते वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आयोजित उस्मानाबाद येथील जाहिर सभेत बोलत होते. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, १९८० पासून …
Read More »सेक्स स्कँडल आरोपी प्रज्वल रेवन्ना मोदीशहांच्या नाकाखालून परदेशी पळाला
भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले. रेवन्नाने ब्लॅकमेल करुन महिलांवर अत्याचार केले व त्यांचे व्हिडिओही बनवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नराधमासाठी मते मागितली तर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी याचा उल्लेख श्री. रेवन्ना असा केला. प्रज्वल रेवन्नाने केलेले गुन्हे अत्यंत …
Read More »नाना पटोले यांचा इशारा,….तर संविधान व आरक्षणही संपवणार
काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले व स्वातंत्र्यानंतर ६०-६५ वर्षात देशात विविध क्षेत्रात विकासाची कामे केली. विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य, शिक्षण, जलसंपदा सह सर्वच क्षेत्रात प्रगती केली. काँग्रेसने ६० वर्षात जे उभे केले ते सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकून टाकले. देश विकून देश चालवला आणि २०५ लाख कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर …
Read More »पंतप्रधान मोदी यांचे टीकास्त्र, शेतकऱ्यांना फसविणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्याची वेळ
दुष्काळग्रस्त माढ्यात पाणी पोहोचवितो अशी शपथ घेऊन पंधऱा वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने शेतकऱ्यांची फसवणूक केली, पाण्यासाठी वणवण करायला लावले, त्याचा हिशेब करून त्याची शिक्षा त्या नेत्याला देण्याची वेळ आली आहे, असे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी शरद पवार यांच्यावर माळशिरस, धाराशिव, लातूर येथे झालेल्या सभांतून जोरदार हल्ला …
Read More »नाना पटोले यांची टीका, नरेंद्र मोदीच खरा भटकता आत्मा, १० वर्ष केवळ जगभर भटंकती…
काँग्रेसच्या जाहिरनाम्यात धर्माचा उल्लेख कुठेही केलेला नसतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने काँग्रेसबद्दल अपप्रचार करत आहेत. काँग्रेस मंगळसूत्र व स्त्रीधन हिसकावून घेऊन मुस्लीमांना देणार अशी विधाने पंतप्रधानांना शोभत नाहीत. सातत्याने खोटे बोलत महाराष्ट्रभर फिरणारे नरेंद्र मोदीच खरे भटकते आत्मा आहेत. मोदींनी कोणती पदवी घेतली हे माहित नाही पण त्यांना जाहिरनामा वाचता …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका भटकती आत्मा…शरद पवार म्हणाले, ते खरंय
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराबरोबरच, बारामती आणि शिरूर मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील विरोधकांवर टीका करताना काही नेत्यांचे नाव न घेता काही भटकती आत्मा असल्याची टीका केली. तसेच या भटकती आत्मा असलेल्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले …
Read More »काँग्रेसचे मराठवाड्यात येत असलेल्या पंतप्रधान मोदी यांना प्रश्न
लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीतील सहभागी राजकिय पक्षांच्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार सभा घेत आहेत. काल २९ एप्रिल रोजी २०२९ रोजी माढा, कराड, सोलापूर येथील तीन लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी जाहिर सभा घेतल्या. त्यानंतर आज मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद आदी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र …
Read More »एचडी कुमारस्वामी यांची माहिती, जनता दलातून प्रज्वल रेवन्ना याची हकालपट्टी
जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांची हकालपट्टी करण्यात येणार असल्याची जनता दलाचे प्रमुख एचडी कुमारस्वामी यांनी आज काही वृत्तवाहिन्यांशी बोलताना सांगितले. प्रज्वल रेवन्ना यांच्यावर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहेत, उद्या (३० एप्रिल) सकाळी १० वाजता कर्नाटकातील हुबली येथे होणाऱ्या JD(S) कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णयावर त्यावर …
Read More »
Marathi e-Batmya