राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थानापन्न झाले. परंतु या दोन्ही नेत्यांचा शपथविधी होवून एक महिना पूर्ण झाला तरी अद्याप राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. यापार्श्वभूमीवर बंडखोर शिंदे समर्थक आमदार अब्दुल सत्तार यांना विचारले असता ते म्हणाले, न्यायालयाच्या निकालासाठी आम्ही थांबलो होतो. मात्र आता …
Read More »शिवसेनेच्या व्हिपवर शरद पवार म्हणाले, बंडखोरांना व्हिप पाळावाच लागेल अन्यथा… विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदी अद्यापही नरहरी झिरवळ
विधानसभेच्या उपाध्यक्षपदी आणि अध्यक्ष पदाचे अधिकार असलेले अजूनही नरहरी झिरवळ आहेत. कायद्याने त्यांना अधिकार असल्याने, त्यांची भूमिका महत्त्वाची असेल. महाविकास आघाडी म्हणून घटक पक्षांची आम्ही बैठक घेऊन, एकत्रित अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाणार आहोत. पक्ष म्हणून विधानसभेतील व्हिप आणि संघटनात्मक काम या दोन्ही वेगळ्या बाबी आहेत. त्यामुळे गटनेत्याने दिलेला व्हीप आमदारांना …
Read More »उध्दव ठाकरे यांनी स्पष्टच सांगितले, माझ्या विरोधात मतदान करणाऱ्यांना बघायचाय काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबरील बैठकीत केली भूमिका स्पष्ट
राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सुरु केलेल्या कारवाईप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. तसेच त्यासंदर्भातील सुनावणी अद्याप प्रलंबित असतानाच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज अचानक महाविकास आघाडी सरकारला आपले बहुमत सिध्द करण्याचे आदेश दिले. त्यामुळे निर्माण झालेल्या पेच प्रसंगावर शिवसेना, …
Read More »शिवसेना आक्रमक तर एकनाथ शिंदे गटाला हादरा विधानसभेकडून १६ जणांना नोटीस
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या नेतृत्वाखालील १६ बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेने दाखल केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या १६ आमदारांना आपात्र का ठरविण्यात येवू नये अशा आशयाची नोटीस आज गुवाहाटीस्थित आमदारांना बजावली. तसेच एकनाथ शिंदे यांच्या गटातील दोन आमदारांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या …
Read More »९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरूवात भव्यदिव्य ग्रंथदिंडीचे नाशिककरांकडून उत्साहात स्वागत
मराठी ई-बातम्या टीम कुसुमाग्रज नगरीत रंगणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची सुरूवात भव्य ग्रंथदिंडीने करण्यात आली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ, उपाध्यक्ष तथा कृषीमंत्री दादाजी भुसे व मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांच्या हस्ते दिंडींचे पूजन करण्यात आले. कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथून सुरू झालेल्या दिंडीचे नाशिककरांनी …
Read More »चळवळ नाहीशी करणाऱ्या प्रवृत्तींना नाहीसे केले पाहिजे सहकार क्षेत्रासमोरील आव्हाने समजून घेण्यासाठी सहकार परिषदेचे आयोजन करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई: प्रतिनिधी संपूर्ण देशाला सहकाराचा मार्ग दाखवणाऱ्या महाराष्ट्रातील सहकार चळवळीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असला तरी, राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा घेऊन महाराष्ट्रात रुजलेली सर्वसामान्य माणसाच्या हिताची ही चळवळ मोडून काढणे कुणालाही शक्य होणार नाही असे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकविसाव्या शतकातील सहकार क्षेत्रासमोरील आव्हाने समजून घेणे, या क्षेत्रातील उणिवा …
Read More »भाजपाच्या प्रतिविधानसभेवर विधानसभा करणार कारवाई उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची घोषणा
मुंबईः विशेष प्रतिनिधी ओबीसी प्रश्नी गोंधळ झाल्यानंतर विधानसभेच्या कामकाजावर भाजपाने बहिष्कार टाकला. त्यानंतर आज सकाळी भाजपा सदस्यांनी सभागृहाच्या कामकाजात सहभागी न होता विधानभवनाच्या पायऱ्यावर प्रति विधानसभा भरवून कामकाज करण्यास सुरुवात केली. मात्र या कृत्यावर विधानसभेत चर्चा होवून सदरप्रकरणी कारवाई केली जाणार असल्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी जाहीर केले. सकाळी …
Read More »वेतन वाढ करा, आमदारांच्या स्वीय सहायकांचे विधानसभेच्या उपाध्यक्षांना साकडे मागणीची दखल घेत उपाध्यक्ष नरहरी झिरवळांनी पाठविली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे शिफारस
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील आमदारांच्या गाडीवरील ड्रायव्हर अर्थात वाहन चालकांच्या मानधनात वाढ केल्यानंतर आता स्वीय सहायकांनीही आपल्या वेतन वाढ करण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या केल्या. या मागणीसाठी सर्व आमदारांच्या स्वीय सहायकांनी थेट विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना भेटून यासंदर्भातील मागण्यांचे निवेदन दिले. गेल्या काही महिन्यात महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली असून …
Read More »विधिमंडळाचे पुढील पावसाळी अधिवेशन पाच जुलैपासून अधिवेशनात ६ विधेयके मंजूर
मुंबई : प्रतिनिधी विधिमंडळाचे पुढील पावसाळी अधिवेशन सोमवार ५ जुलै २०२१ पासून सुरू होणार असून तशी शिफारस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कळविण्यात आल्याची माहिती विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी विधानसभेत सांगितले. अर्थसंकल्पाद्वारे राज्यातील १३ कोटी जनतेला दिलासा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्याच्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी असला …
Read More »विरोधी पक्षनेते फडणवीसांच्या कोपरखळीने सभागृहात उडाला हास्यकल्लोळ फास्टॅग कोणाला लावायचा आमदारांना कि गाडीला?
मुंबईः विशेष प्रतिनिधी भाजपाचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तसे गंभीर स्वरूपाचे नेते म्हणून राज्याला परिचित आहेत. मात्र एखादा प्रसंग घडला किंवा कोणी त्यांची टोपी उडविली तर त्यास हसून दाद ही देतात. परंतु कधी स्वतः कोणाची खिल्ली किंवा टोपी उडविण्याच्या फंदात पडत नाहीत. मात्र आज त्यांनी केलेल्या …
Read More »
Marathi e-Batmya