अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती वितरित करण्यासाठी आवश्यक अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न असून, वाढत्या महागाईचा विचार करून शिष्यवृत्ती वाढविण्याबाबतही सकारात्मक विचार केला जाईल, अशी माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य अबु आझमी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवाळ बोलत होते.या …
Read More »नरहरी झिरवाळ यांची माहिती, हाफकीन प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देणार हाफकीन जीव-औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती
हाफकीन जीव-औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत सांगितले. विधान परिषद सदस्य भाई जगताप यांनी हाफकीन महामंडळाच्या प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना ते बोलत होते. …
Read More »नरहरी झिरवाळ यांची माहिती, हाफकीनच्या खाजगीकरणाचा कोणताही विचार नाही हाफकीन संस्थेच्या बळकटीकरणासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधितांची बैठक
हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाच्या बळकटीकरणासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधितांची लवकरच बैठक घेण्यात येणार असून, महामंडळाच्या विकासासाठी आवश्यक निर्णय घेतले जातील. तसेच हाफकिनचे खाजगीकरण करण्याचा शासनाचा कोणताही विचार नसल्याची स्पष्ट ग्वाही अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत दिली. विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य ज्योती गायकवाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला …
Read More »नरहरी झिरवाळ यांचा इशारा, शाळांच्या ५०० मीटर परिसरात अपायकारक पेयांची विक्री करणाऱ्यावर कारवाई अपायकारक अन्नपदार्थ व कॅफिनयुक्त पेयांची विक्री करणाऱ्यांवरही कारवाई
शाळांच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या आरोग्यास अपायकारक ठरणारे अन्नपदार्थ; तसेच कॅफिनयुक्त पेयांची विक्री आढळून आल्यास संबंधितांवर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत दिली. स्टिंग एनर्जी ड्रिंकच्या सेवनामुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत सदस्य विक्रम पाचपुते यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवाळ बोलत होते. …
Read More »नरहरी झिरवळ यांची माहिती, जेजुरीचा ‘भंडारा’ आता कायद्याच्या चौकटीत भाविकांच्या आरोग्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा निर्णय
जेजुरी गडकोटातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेला आणि भंडाऱ्यासाठी प्रसिद्ध असलेला ‘हळद भंडारा’ आता कायदेशीर चौकटीत येणार आहे. अन्न व औषध प्रशासन लवकरच जेजुरीतील भंडाऱ्यासाठी विशेष धोरण निश्चित करणार आहे, जे पारदर्शकता आणि शुद्धतेला प्राधान्य देईल. भाविकांच्या आरोग्यासाठी या संदर्भात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी निर्देश दिले. जेजुरी गडकोटावर भंडारा …
Read More »नरहरी झिरवाळ यांचे आदेश, हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’ वापराचा उल्लेख बंधनकारक महाराष्ट्रापाठोपाठ केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा व नियामक प्राधिकरणाकडूनही सूचना
पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन नियमांनुसार, प्रत्येक हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रेते आणि रेस्टॉरंटला त्यांच्या मेन्युकार्ड, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर याबाबत स्पष्ट माहिती द्यावी लागेल. जर पदार्थात नैसर्गिक पनीर, चीजऐवजी ‘चीज ॲनालॉग’ वापरले असेल, तर त्याचा उल्लेख करणे आता कायदेशीररित्या बंधनकारक करण्यात आले आहे. …
Read More »मंत्री नरहरी झिरवाळ यांचा उद्या रात्रीपर्यंत राजीनामा ? व्हिडिओचे सत्य समोर आल्यानंतरच निर्णय घेणार: मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
राज्यातील महायुती सरकार मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमुळे अडचणीत येत असून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भोंदूबाबा अशोक खरातमुळे अडचणीत आलेला असतानाच पुन्हा दुसऱ्यांदा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुती सरकार पुन्हा एकदा अडचणीत आले आहे. काही दिवसांपूर्वी नरहरी झिरवाळ …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, चाकणकर व झिरवाळांच्या प्रकरणानंतरही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गप्प का? महायुती सरकार अवैध व अनैतिक धंद्यांची बजबजपुरी, खरात प्रकरण व मंत्री झिरवाळांच्या VDO ने सरकारच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली
भोंदूबाबा अशोक खरातच्या अनैतिक दरबारात हजेरी लावणाऱ्या महायुती सरकारमधील डझनभर मंत्र्यांच्या अश्लिल व अश्लाघ्य कारनाम्याने महाराष्ट्राची पुरती नाच्चकी झालेली असताना राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह VDO सोशल मीडियावर व्हायरल होणे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण आहे. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन नरहरी …
Read More »नरहरी झिरवाळ यांची माहिती, अन्नपदार्थामध्ये भेसळ करणाऱ्यांविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई विधान परिषदेत एका प्रश्नाला दिली माहिती
राज्यातील अन्नसुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी तपासणी मोहिमा अधिक व्यापक करण्यात येतील. अन्न पदार्थामध्ये भेसळ करणाऱ्यांविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. सदस्य डॉ. मनिषा कायंदे यांनी याविषयी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य भाई जगताप, ॲड. …
Read More »नरहरी झिरवाळ यांची माहिती, ‘ब्लिंकइट’द्वारे कालबाह्य अन्न वितरण प्रकरणात कंपनीवर कारवाई विधानसभेत भीमराव तापकीर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना माहिती
पुणे शहरात ब्लिंकइट या ऑनलाईन अन्न वितरण सेवेच्या माध्यमातून कालबाह्य खाद्य पदार्थांचे वितरण होत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर विभागाने चौकशी केली असता प्रारंभी कोणताही ठोस पुरावा सापडला नव्हता. मात्र लेखापरीक्षण अहवाल आणि संबंधित कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतर काही दिवसांपूर्वी ‘ब्लिंकइट’च्या माध्यमातून कालबाह्य अन्न वितरित झाल्याचे स्पष्ट झाले. कंपनीवर …
Read More »
Marathi e-Batmya