Tag Archives: ncp

काँग्रेस म्हणते, आता मुख्यमंत्र्यांनीच अधिकृत घोषणा करावी मोफत लसीकरणावरून श्रेयवादाची लढाई अयोग्य: बाळासाहेब थोरात

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील जनतेचे कोरोनापासून संरक्षण करण्याच्यादृष्टीकोनातून मोफत लस देण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांनी जाहिर यांनी करताच शिवसेना नेते तथा मंत्री आदित्य ठाकरे यांनी यांनी यासंदर्भात राज्य सरकारकडून योग्य तो निर्णय जाहिर करणार असल्याचे ट्विट करत अंतिम निर्णय झाले नसल्याचे स्पष्ट केले. तर मोफत लस …

Read More »

“त्या” आरोपांबाबत भाजपा उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सीबीआयप्रकरणी इशारा

पुणे : प्रतिनिधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चालू असली तरीही ही चौकशी म्हणजे भारतीय जनता पार्टीकडून यंत्रणेचा दुरुपयोग असल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा आरोप म्हणजे उच्च न्यायालयाचा अवमान असून भाजपा त्याच्या विरोधात अवमान याचिका दाखल करेल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पिंपरी …

Read More »

महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय: १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस राज्याच्या तिजोरीतून कार्यक्रम हाती घेणार ;चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक टेंडर काढणार-नवाब मलिक

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार असून त्यासाठी स्वस्त दरात व चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक टेंडर काढण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीतून कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. केंद्र सरकारने १ …

Read More »

सीबीआयच्या धाडीवर संजय राऊत म्हणाले दया, कुछ तो गडबड है ! अनिल देशमुखांवर गुन्हे दाखल केल्याप्रकरणी प्रतिक्रिया

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल करत त्यांच्या निवासस्थानासह इतरांच्याही निवासस्थानी सीबीआयने छापेमारी सुरु केली. त्यामुळे सीबीआयच्या धाडी एफआयआर वगैरे अतिरेक आहे.  हा सर्व प्रकार तर्कसंगत दिसत नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी व्यक्त करत दया, कुछ तो गडबड है अशी बोलकी प्रतिक्रिया त्यांनी …

Read More »

सीबीआयच्या धाडी म्हणजे राजकिय नेत्यांच्या बदनामीसाठीच धाडसत्राचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध-जयंत पाटील

मुंबई: प्रतिनिधी न्यायालयाकडून चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत असल्याचा आरोप करतानाच या प्रकाराचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या …

Read More »

आक्रमक महाविकास आघाडीने एफडीए आयुक्त काळेंची केली बदली राज्य सरकारकडून तडकाफडकी निर्णय

मुंबई: प्रतिनिधी राज्यात रेमडेसिवीर औषधांच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून विशेषत: एफडीएच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत होते. मात्र ब्रुक फार्माच्या कथित औषध साठ्यावरून भाजपा विरूध्द महाविकास आघाडी असा सामना रंगलेला असतानाच महाविकास आघाडी सरकारने थेट एफडीएचे आयुक्त अभिमन्यु काळे यांची तडकाफडकी बदली करत सेल्स टॅक्सचे आयुक्त परिमल सिंग यांना त्या …

Read More »

भाजपावाल्यांनाच रेमडेसीवीर कसे मिळते? आगामी काळात भाजपच्या कारनाम्यांचा भांडाफोड करणार असल्याचे नवाब मलिक यांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी राज्यासह देशात कोरोनाबाधित रूग्णांसाठी रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा जाणवत असताना गुजरातमध्ये भाजपा कार्यालयात आणि जळगांवातील भाजपाच्या माजी आमदाराकडून रेमडेसिवीर औषधांचे मोफत वाटप, त्याचा काळाबाजार आणि साठेबाजी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना ब्रुक फार्मा कंपनीकडूनही रेमडेसिवीरचा साठा उलब्ध होणार असल्याचे सांगितले. रूग्णांसाठी रेमडेसीवीर औषधे उपलब्ध …

Read More »

चंद्रकांत पाटील यांचा खा. राऊतांना सल्ला तर मलिक यांची राज्यपालांकडे तक्रार रेमडेसिवीरवरून राजकारण थांबविण्याचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी खोटा आरोप करून केंद्र सरकारबद्दल असंतोष निर्माण केल्याबद्दल आणि अफवा पसरविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली. केंद्र सरकारने महाराष्ट्राला होणारा …

Read More »

राज्याच्या गृहमंत्र्यांचा फडणवीस आणि भाजपाला इशारा पोलिसांवरील दबाव सहन करणार नाही- मंत्री वळसे-पाटील

मुंबई: प्रतिनिधी राज्यात सध्या रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा असताना या औषधांचा मोठा साठा मुंबईत येणार असल्याची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्माच्या मालकाला ताब्यात घेतले. याची माहिती मिळताच देवेंद्र फडणवीस विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यासोबत काल रात्री पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी त्यांनी कारवाईवरुन पोलिसांना जाब देखील …

Read More »

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा नवाब मलिक यांना इशारा बालीश आरोप बंद करा, कोरोनाच्या संकटाकडे लक्ष द्या

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य माणसाला उपचारासाठी तडफडावे लागत असताना सत्ताधारी शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने आता तरी सामान्य माणसाच्या मदतीला धावावे आणि सातत्याने केंद्र सरकारवर बालीश आरोप करणे बंद करावे, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी मंत्री नवाब …

Read More »