Tag Archives: Public works department

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १५० दिवसांच्या ई- गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट विभागांचा गौरव कामात पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हतेच्या त्रिसूत्रीवर विभागांनी काम करावे

राज्यातील नागरिकांना सर्व शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ एकाच माध्यमातून मिळण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्राचे ध्येय साध्य करताना प्रशासकीय कामात पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हता या त्रिसुत्रीच्या आधारावर सर्व विभागांनी काम करावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री अतिथिगृह येथे ‘१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा’ कार्यक्रमांतर्गत निवडलेली उत्कृष्ट कार्यालये व सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत …

Read More »

शिवेंद्रराजे भोसले यांची माहिती, मुंबई-गोवा महामार्गाचे काम नव्या एजन्सीला दिले विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या दरम्यान दिली माहिती

मुंबई–गोवा महामार्गावरील प्रलंबित कामांना गती देण्यात आली असून माणगाव व इंदापूर बायपासची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. माणगाव व इंदापूर बायपास वगळता उर्वरित मुंबई–गोवा महामार्ग (एनएच-66) मे महिन्यापर्यंत पूर्णत्वाला जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे या सदस्यांनी यासंदर्भातील …

Read More »

ई-गव्हर्नन्स सुधारणा मूल्यमापनात सार्वजनिक बांधकाम विभाग अव्वल गुणवत्ता परिषदेकडून ‘सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग’ म्हणून गौरव

भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) यांच्यावतीने राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या कार्यालयीन मूल्यमापनात महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या मूल्यमापनात महाराष्ट्रातील ५७ मंत्रालयीन विभागांपैकी सार्वजनिक बांधकाम विभागाने १८६.७५ गुण मिळवत ‘सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग’ म्हणून प्रथम क्रमांकाचे मानांकन प्राप्त केले …

Read More »

शिवेंद्रसिंह भोसले यांची माहिती, तळेगाव ते शिक्रापूर महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी ५९.७५ कोटीस मान्यता अपघात कमी होऊन वाहतुकीस मोठा दिलासा

तळेगाव –चाकण–शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ डी (माजी राज्य महामार्ग ५५) कि.मी. ०/०० ते कि.मी. ५४/०० या मार्गाच्या दुरुस्ती व रुंदीकरणासाठी एकूण ₹५९.७५ कोटी निधीस मान्यता देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी दिली आहे. तसेच या निर्णयामुळे तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल, अपघातांचा धोका टळेल तसेच औद्योगिक वाहतुकीला …

Read More »

खड्ड्याची तक्रार आता थेट राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडे ऑनलाईन करा खड्ड्यांच्या तक्रारीसाठी आता खड्डे तक्रार निवारण प्रणाली

पावसाळ्यानंतर रस्त्यांमध्ये खड्डे पडतात. असे खड्डे जलद दुरुस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे तक्रार निवारण प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे नागरिकांना आता खड्डयांबाबतची तक्रार ऑनलाईन करता येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाचे संगणकीकारण करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन माहिती प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यासोबतच खड्ड्यासाठी तक्रार प्रणाली विकसित केली आहे. नागरिक …

Read More »