पुणे महानगर प्रदेश (पीएमआर) हे तंत्रज्ञान, उत्पादन, शिक्षण आणि हरित गतिशीलतेमध्ये आघाडीवर आहे. यामुळे पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हब उभारणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. पुण्याला ग्रोथ हब बनविण्यासंदर्भात नियोजनाचा आराखडा यशदा करणार असून यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण निधीची तरतूद करेल, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, संघ भाजपाने वाढवलेल्या विषवल्लीला आता सुरज शुक्ला सारखी फळे हा केवळ महात्मा गांधींच्या पुतळ्यावरचा हल्ला नाही तर भारताच्या आत्म्यावर घाव घालण्याचा प्रकार
पुणे रेल्वे स्थानकातील महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने केलेला हल्ला हा फक्त पुतळ्यावरील नाही, तर हा भारत देशाच्या आत्म्यावरील हल्ला आहे. हल्ला करणारा सुरज शुक्ला हा एक ‘माथेफिरू’ म्हणून दाखवण्याचा प्रयत्न होईल. पण तो संघ आणि भाजप आणि भाजपाने द्वेषाचे खतपाणी घालून वाढवलेल्या विषवल्लीला आलेले फळ आहे. या विषवल्लीचा धोका संपूर्ण …
Read More »अमित शाह यांना खुष करण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा जय गुजरातचा नारा कार्यक्रमाला भाजपाचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित नारा दिला
राज्यात एका बाजूला मराठी-हिंदी भाषेचा वाद पेटलेला असतानाच आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर अर्थात पुण्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत जय गुजरातचा नारा दिला. विशेष म्हणजे जय महाराष्ट्र आणि जय हिंदचा नारा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माईक सोडून गेले होते. मात्र पुन्हा लक्षात येताच माईकवर पुन्हा येत एकनाथ …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टोक्ती, भक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी समाज वारकरी भक्तीयोग कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली अपेक्षा
योग ही आमची परंपरा, संस्कृती, आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. ही चिकित्सा पद्धती आहे. भक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी, स्वस्थ समाजाची निर्मिती व्हावी, असा प्रयत्न सर्व मिळून करूया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी आणि श्री …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, इंद्रायणी नदीवरील पूल प्रकरणी मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा दुर्घटना झाल्यावरच भाजपा युती सरकारला जाग, धोकादायक पुल खुला का ठेवला?
पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील पुल कोसळून झालेले मृत्यू हे सरकारच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत. कुंडमळा येथे पावसाळ्यात शेकडो पर्यटक येतात याची माहित असताना तो धोकादायक पुल खुला का ठेवला? असा प्रश्न विचारून हे सरकारने घेतलेले बळी आहेत, जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ …
Read More »पुण्यात इंद्रायणी नदीवरील कुंडमळ्यात पूल कोसळला, दोघांचा मृत्यू काही लोक वाहून गेले, मृत्यू पावलेल्यांना पाच लाखांची मदत
मागील काही दिवसांपासून पुण्यात सुरु असलेली पावसाची संततधार आजही कायम रविवारीही कायम होती. रविवारच्या या दुपारच्या मुसळधार पावसात पुण्यातील इंद्रायणी नदीवरील जुना पूल अर्थात कुंडमळ्यात पूल कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आणि ३२ जण जखमी झाले, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पूल कोसळून इंद्रायणी नदीत पडला आणि …
Read More »पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा ओमीक्रॉनचे जेएन, एक्सएफजी व जीएफ ७-९ हे उपप्रकार आढळले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवन येथे आयोजित बैठकीत पुणे विभागातील कोविड-19 साथीच्या अनुषंगाने आढावा घेतला. लक्षणे सौम्य असली तरी वृद्ध तसेच सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक असून आरोग्य विभाग, महानगरपालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. या बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. …
Read More »पुण्यात अजित पवार यांची ताकद मोठी की शरद पवार यांची शक्ती प्रदर्शनात दिसणार वर्धापन दिन मेळाव्यांतून दोन्ही राष्ट्रवादीचे उद्या पुण्यात शक्तीप्रदर्शन
राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून यंदा आपला २६ वा वर्धापन दिन पुण्यात साजरा केला जाणार आहे. या वर्धापन दिन कार्यक्रमाची दोन्ही राष्ट्रवादींकडून स्वतंत्रपणे तयारी करण्यात आली आहे. आगामी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात होत असलेल्या या वर्धापन दिनास विशेष महत्व आले आहे. …
Read More »अजित पवार यांच्याकडून बारामती, इंदापूर, पुणेसह अन्य जिल्ह्यांतील परिस्थितीचा घेतला आढावा मान्सूनच्या मुसळधार पाऊसाची अनेक जिल्ह्यात हजेरी
मान्सून मुंबईसह महाराष्ट्रात दाखल झाला असून हवामान खात्याने मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उद्या रेड अलर्ट आहे. पालघरसाठी यलो अलर्ट आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या घाट परिसरात …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन 'पुणे अर्बन डायलॉग आव्हाने आणि उपाय' कार्यक्रमाचे
आज महाराष्ट्राची ५० टक्के लोकसंख्या ५०० शहरात आणि उर्वरित लोकसंख्या ४० हजार गावात राहते आहे. शहरांचा चेहरा आपण बदलू शकल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन देऊ शकतो. यासाठी ‘पुणे अर्बन डायलॉग’ सारखे मंथन आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यशदा, बर्वे चॅरिटेबल ट्रस्ट, इंटरनॅशनल सेंटर आणि पुणे …
Read More »
Marathi e-Batmya