भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राज्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने आदिवासी समाजापर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासह आरोग्य, शिक्षण, पोषण, स्वच्छता आणि जनजागृतीविषयक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी बांधवांनी या उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन …
Read More »टाटाची जमिन वैदिक मंत्रोच्चारासाठी देवेंद्र फडणवीसांनी दिली, मात्र उच्च न्यायलयाने जमिन अधिग्रहणच रद्द ठरवले जमिनची मालकी उच्च न्यायालयाने पुन्हा टाटा कंपनीकडेच ठेवली
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांना पत्र लिहून, पुण्यातील ‘टाटा पॉवर’च्या जमिनीचा काही भाग “वैदिक पंडितांना मंत्रोच्चार करण्यासाठी” उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर आठ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. दरम्यान, गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारचा २०२५ मधील तो निर्णय रद्द केला, ज्याद्वारे कंपनीची ८४ हेक्टर …
Read More »एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, शेतकरी केंद्रबिंदू मानून दुष्काळग्रस्तांना सर्व सवलतींसह अग्रीम मदत देणार शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही
दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीच्या सणातही चिंता दिसू नये, यासाठी सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना लागू होणाऱ्या सर्व सवलतींचा लाभ देण्यासोबतच पाच हजार रुपयांची अग्रीम मदत दिवाळीपूर्वी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पुण्यातील खराडी …
Read More »सुनेत्रा अजित पवार यांचे आवाहन, सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून यंदाचा गणेशोत्सव सुरक्षित…शिस्तबद्ध साजरा करूया उपमुख्यमंत्र्यांकडून पुण्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा
पुणे शहरातील गणेशोत्सवाला देशभरातून नागरिक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता, वीजपुरवठा आणि गर्दी व्यवस्थापनाची यंत्रणा अधिक सक्षमपणे कार्यरत ठेवावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज बैठक पार पडली. यावेळी …
Read More »सागा येथे अडकलेले महाराष्ट्रातील ३७ भाविक काठमांडूकडे सुखरूप रवाना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारामुळे भाविकांची सुटका
कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधील सागा येथे अडकलेले महाराष्ट्रातील ३७ भाविक आज सकाळी ६ वाजता न्यालम चेक पोस्टमार्गे काठमांडूकडे रवाना झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या हस्तक्षेपानंतर भाविकांच्या परतीचा हा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील हे ३७ भाविक कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेले …
Read More »राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंच्या पुण्यात २२ ऑगस्टला राहुल गांधी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद ‘छात्रों की गुंज’ पक्षाचा नाही तर सर्वांसाठी खुला कार्यक्रम
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न हाती घेऊन छात्रों की गुंज हे देशव्यापी अभियान सुरु केले आहे. राजस्थानमधील कोटा मधून या अभियानाला सुरुवात करण्यात आली व डेहराडून व प्रयागराज नंतर चौथा कार्यक्रम महाराष्ट्रात होत आहे. राजमाता जिजाऊ यांनी ज्या पुणे शहरातून शिवाजी महाराज यांना स्वराज्याचे बाळकडू पाजले, क्रांतीज्योती सावित्रीमाई …
Read More »बीडी कामगारांच्या थकीत किमान वेतनाची अंमलबजावणी सुरू कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या प्रयत्नांना यश
किमान वेतन अधिनियम, १९४८ अंतर्गत पहिल्या अनुसूचीतील तंबाखू (बिडी निर्माणसह) वस्तुनिर्माणातील अनुसूचित उद्योगातील बिडी कामगारांच्या प्रलंबित किमान वेतन दराचा प्रश्न अखेर पूर्णपणे मार्गी लागला आहे. राज्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि पुढाकारामुळे बीडी कामगारांच्या किमान वेतनाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने शासनाने बिडी कामगारांच्या सुधारित …
Read More »नरसापूर प्रकरणी भीमराव कांबळेस ५५ दिवसात न्यायालयाने दिली फाशीची शिक्षा सर्वात कमी कालावधीत न्यायालयाने दिला निकाल
काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील नसरापूर गावात ३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पुण्यातील एका विशेष न्यायालयाने ६५ वर्षीय व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावली. परिस्थितीजन्य पुरावे आणि सरकारी पक्षाचा ‘गुन्ह्याच्या वेळी आरोपी आणि पीडिता यांना शेवटचे एकत्र पाहिले गेले होते’ (last seen together) या सिद्धांताच्या आधारे आरोपीला दोषी ठरवून, गुन्हा …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, पुणे विषारी दारूकांड प्रकरणात कठोर कारवाई पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रकरणी दिले आदेश
पुणे विषारी दारू कांड ही एक प्रकारे केलेली हत्याच आहे. त्यामुळे या घटनेत अतिशय कठोर कलमे लावण्यात येत असून या प्रकरणाची सर्व पाळेमुळे खणून काढण्यात येतील. तसेच ही इकोसिस्टिम नष्ट करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. पुणे विषारी दारूकांडात सुमारे १३ जणांना आतापर्यंत आपले प्राण गमवावे …
Read More »पुणे-पिंपरी चिंचवड विषारी दारू दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू: मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता हडपसर येथे मोठा साठा जप्त, बॅरल भरून विषारी दारूचे स्टॉक
पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात संशयित विषारी दारूमुळे मृत्यूंचे सत्र सुरूच असून मृतांचा आकडा वाढत असल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. आनंदवन, काटेवस्ती, संजयनगर, आझाद चौक आणि जय महाराष्ट्र चौक परिसरात या घटनेने भीती, संताप आणि शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे. या दुर्घटनेतील सर्वाधिक हृदयद्रावक घटना फुगेवाडी येथे घडली. विजय राठोड …
Read More »
Marathi e-Batmya