Tag Archives: shivaji maharaj

राज ठाकरे म्हणाले, नको ते वाद करत बसायचे एवढचं सध्या सुरूय

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या शिवाजी महाराजांच्या अवमानकारक वक्तव्यावरून भाजपाचे खासदार तथा छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट सोळावे वंशच उदयनराजे भोसले यांनी रायगडावर शिवसन्मानार्थ कार्यक्रम करत जर कोणी शिवाजी महाराजांचा अवमान केला तर असा सज्जड इशारा दिला. त्याच २४ तासांचा अवधी उलटत नाही तोच त्याच्यांच पक्षाचे विधान परिषदेतील आमदार प्रसाद …

Read More »

संजय राऊत म्हणाले, शिवरायांच्या जन्माबाबत या उपटसुंभ लोकांना माहित आहे का?

कोकण महोत्सवात भाषण करताना भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाल्याचे वक्तव्य केल्याचा एक व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसकडून जारी करण्यात आला. त्यावरून भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्यावर सर्वचस्तरातून टीकेची झोड उठण्यास सुरुवात झाली. लाड यांच्या या वक्तव्यावरून ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ट्विट करत चांगलाच …

Read More »

भाजपा आमदाराच्या त्या वक्तव्यावर संभाजीराजे संतापले, जमत नसेल तर फडणवीसांनी…

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी त्यानंतर भाजपाचे केंद्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर आता भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शिवाजी महाराजांच्या जन्म ठिकाणाबाबत भलतेच वक्तव्य केले. त्यामुळे राजकिय वर्तुळात त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली. लाड यांनी केलेल्या विधानावर छत्रपती संभाजी राजे …

Read More »

उदयनराजे यांच्या त्या वक्तव्यावर उध्दव ठाकरे म्हणाले, उदयनराजेंच धन्यवाद..

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. उदयनराजे यांच्या नेतृत्वात आज (३ नोव्हेंबर) किल्ले रायगड येथे निर्धार शिवसन्मानाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. तेव्हा बोलताना ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांइतकेच त्यांच्या वक्तव्यावर शांत बसणारे दोषी आहेत,’ असा हल्लाबोल उदयनराजेंनी केला. उदयनराजेंच्या …

Read More »

उदयनराजे भोसले म्हणाले, राज्यपालांची हकालपट्टी का झाली नाही याचे उत्तर भाजपाने द्यावे

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केल्यानंतर भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी आज किल्ले रायगडावर उदयनराजे यांनी निर्धार शिवसन्मानाचा या कार्यक्रमास उपस्थिती लावली. त्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना …

Read More »

उदयनराजे संतापले, माझ्यामुळे जर भाजपची अडचण होत असेल तर..

भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावर चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी आता भाजपाला देखील इशारा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होत असेल तर मी कदापी स्वस्थ बसणार नाही असा संताप व्यक्त करीत माझ्यामुळे जर भाजपाची अडचण होत असेल तर मी कारवाईला देखील घाबरत नाही असे …

Read More »

नाना पटोलेंचे आव्हान, शिवाजी महाराजांबद्दल स्वाभिमान असेल तर सत्ताधाऱ्यांनी…

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत, परंतु या दैवताचा भारतीय जनता पक्ष वारंवार अपमान करत असून यातून भाजपाचा खरा चेहरा उघड झाला आहे. राज्यापाल कोश्यारी, भाजपाचा प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांच्यानंतर आता राज्यातील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही महाराजांबद्दल गरळ ओकली आहे. सत्तेत असलेल्या आमदार व खासदार यांना छत्रपती शिवाजी …

Read More »

मंगलप्रभात लोढांचा खुलासा, मी तर तुलना केली…

शिवतप्रताप दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही मंत्री प्रतापगडावर गेले होते. या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात भाषण करताना भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या एका विधानाने आता आणखी एक नवा वाद उफाळण्याची चिन्हं दिसत आहेत. राज्यपाल कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते त्रिवेदींनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर …

Read More »

लोढांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, उचलली जीभ लावली टाळ्याला

काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी केल्यानंतर जो वाद निर्माण झाला. त्याची राळ खाली बसत नाही, तोच भाजपाचे राज्यातील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याच्या घटनेची तुलना थेट शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून …

Read More »

गद्दारीचा किडा, मंगलप्रभात लोढा…;

गद्दारीचा किडा मंगलप्रभात लोढा… पन्नास खोके एकदम ओके… छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अशा घोषणा देत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात त्यांच्याच मलबार हिल विधानसभा मतदारसंघात जोरदार आंदोलन करण्यात आले. भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेची तुलना एकनाथ शिंदे यांच्या गद्दारीशी केल्याने …

Read More »