Tag Archives: shivsena

जयंत पाटील म्हणाले, आम्ही बोलूच, पण ती माहिती जरा पुढे येवू द्या बंडखोर आमदारांना दिलेल्या सोयी-सुविधांवरून जयंत पाटील यांचा भाजपावर अप्रत्यक्ष निशाणा

शिवसेनेतील बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील एका गटाने पहिल्यांदा सुरत आणि नंतर गुवाहाटी येथे गेले आणि तेथून बंडाचा झेंडा रोवला. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, या सर्वामागे कोण आहे याबद्दल आम्ही बोलूच पण त्या आमदारांना कोणी विमान सेवा पुरविली, त्यांची पंचताराकींत हॉटेलमध्ये …

Read More »

नाना पटोले म्हणाले, या सगळ्या षडयंत्रामागे भारतीय जनता पार्टी आमचा पाठिंबा महाविकास आघाडीलाच

शिवसेनेत झालेल्या बंडाळीमुळे राज्यातील महाविकास आघाडी अल्पमतात आल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्या समर्थनासाठी गुवाहाटीला जात आहेत. त्यामुळे सांसदीय राजकारणात लागणारे एकतृतीयांश संख्या एकनाथ शिंदे हे पूर्ण करताना दिसत आहेत. तर शिवसेनेकडून ही बंडाळी क्षमविण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह अनेकांकडून …

Read More »

बंडखोर आमदारांबाबत संजय राऊत यांचे आवाहन, तुम्ही येण्याची हिंमत… महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडू पण परत या

शिवसेनेतील नंबर दोनचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांकडून समेटासाठी आणि बंडाळी क्षमविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह इतर सेना आमदारांना २४ तासात मुंबईला परतण्याचे आवाहन केले. तसेच महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास …

Read More »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा संवाद झाल्यावर भाजपाची पहिली प्रतिक्रिया… शिवसेनेतील घडामोडींशी भाजपाचा संबध नाही

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकाविल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यासंदर्भात ऑनलाईन पध्दतीने राज्यातील जनतेशी आणि शिवसैनिकांशी संवाद साधत भाष्य केले. त्यावर भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया आली असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रसार माध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, हे …

Read More »

परतलेले शिवसेना आमदार म्हणाले, आज तुम्ही गेलात उद्या संपून जाल गेलेल्यांना परत येण्याची केली विनंती

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचे निशाण रोवल्यानंतर शिवसेनामधील अनेक आमदार आणि अपक्ष आमदारांनी एकनाथ शिंदे यांची पाठीमागे गेले. मात्र या आमदारांमधील एक आमदार आणि सूरत येथील रूग्णालयात अॅडमिट करण्यात आलेले आमदार नितीन देशमुख हे एकनाथ शिंदे यांच्या गटातून परत माघारी फिरले असून ते …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘हे’ निर्णय घेत मुख्यमंत्र्यांनी केले हे आवाहन वाढत्या कोविड संसर्गामुळे काळजी घेण्याची गरज -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात अस्थिर वातावरणात असतानाही राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीला काही मंत्री हजर होते. तर काही मंत्री गैरहजर होते. मात्र तरीही आज झालेल्या मंत्रिमंडळ बेठकीत बरेच निर्णय घेण्यात आले. ते खालीलप्रमाणे. वाढत्या कोविड संसर्गामुळे काळजी घेण्याची गरज -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत असून सध्या …

Read More »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, फक्त एकदा समोर येवून सांगा…; वाचा नेमके काय म्हणाले दुसरा मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार असेल तर मला आनंदच लगेच खुर्ची सोडतो

मागील काही दिवसांपासून शिवसेनेतील दुसऱ्या नंबरचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकाविल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून आणि शिवसेनेकडून हे बंड संपुष्टात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र काही केल्या बंड संपुष्टात येण्याची कोणतीही चिन्हे दिसेनात. अखेर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ऑनलाईन पध्दतीने शिवसैनिक आणि महाराष्ट्रातील …

Read More »

एकनाथ शिंदे म्हणाले, आता मुख्यमंत्री ठाकरेंनी ठरवायचे… आमच्याकडे संख्याबळ जास्त

शिवसेनेतील बंडाळीचा आज दुसरा दिवस असून कालच्या तुलनेत आज उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या कायदेशीर हक्कावरून लढाईला सुरुवात झालेली दिसून येत आहे. शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे अल्पमतात आले आहे. त्यातच आज गुवाहटी येथे प्रसारमाध्यमाशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट भूमिका मांडत एकप्रकारे मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे. एकनाथ …

Read More »

शिवसेनेचे प्रतोद प्रभू यांचा आमदारांना इशारा, तर एकनाथ शिंदे यांच्याकडून उचलबांगडी शिंदे गटाकडून शिवसेनेचा नवा प्रतोद भरत गोगावले

शिवसेनेच्या विरोधात बंडाळी केल्यानंतर एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात आता खऱ्या अर्थाने संसदीय लढाई सुरु झाल्याचे दिसत आहे. एकाबाजूला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशान्वये शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी सर्व आमदारांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक आयोजित केल्याचे आदेश जारी करत अन्यथा कारवाईचा इशारा दिला. तर दुसऱ्याबाजूला एकनाथ …

Read More »

एकनाथ शिंदे बंडाळी; ठाकरे सरकारने घेतला यु टर्न मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले माझा संपर्क सुरु आहे

राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेनेतील दोन नंबरचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंडाळी केली. या बंडाळीचा आज दुसरा दिवस असून राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या म्हणण्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकार आणि विधानसभा …

Read More »