परतलेले शिवसेना आमदार म्हणाले, आज तुम्ही गेलात उद्या संपून जाल गेलेल्यांना परत येण्याची केली विनंती

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचे निशाण रोवल्यानंतर शिवसेनामधील अनेक आमदार आणि अपक्ष आमदारांनी एकनाथ शिंदे यांची पाठीमागे गेले. मात्र या आमदारांमधील एक आमदार आणि सूरत येथील रूग्णालयात अॅडमिट करण्यात आलेले आमदार नितीन देशमुख हे एकनाथ शिंदे यांच्या गटातून परत माघारी फिरले असून ते नागपूरात पोहोचले. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना परत मागे फिरण्याची विनंती करत आज तुम्ही गेलात उद्या संपुन जात असा इशाराही नितीन देशमुख यांनी बंडखोर आमदारांना दिला.

या सर्व घडामोडीच्या मागे नाव एकनाथ शिंदे यांचे असले तरी यामागे भाजपा आहे. नितीन देशमुख म्हणून मला लोकांनी मत दिले नाही. माझ्या पदाधिकऱ्यांनी माझ्या विजयासाठी जीवाचं रान केलं. त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून दिलं. आज काही आमदार गुवाहाटीमध्ये गेले आहेत. कोणी दुसऱ्यांदा तर कोणी तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. माझी त्यांना एक विनंती आहे. तुम्ही आमदार झाले आहेत. तुम्ही स्वबळावर आमदार झाले नाही आहात. आपल्या मागे बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा आशीर्वाद होता. शिवसैनिकांनी आपल्यासाठी जीवाचं रान केलं. ज्या मतदारांनी तुम्हाला शिवसैनिक म्हणून निवडून दिलं त्यांचा आदर करा. या सर्व गोष्टीचां विचार करुन परत या. आज तुम्ही गेलात उद्या संपून जाल असेही ते म्हणाले.

शिंदे यांच्यासोबत आमदार जातील, शिवसैनिक जाणार नाहीत. मतदारही जाणार नाहीत. आमदार गेला म्हणून पक्ष संपत नसतो. पक्ष हा पदाधिकाऱ्यांवर, कार्यकर्त्यांवर अवलंबून असतो. माझी शिंदे यांनादेखील परत येण्याची विनंती असल्याचे ते म्हणाले.

ज्या बाळासाहेबांच्या नावावर मोठे झाले, त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत. हे सर्व भाजपाचे षड्यंत्र आहे. काही आमदार ईडीच्या दबावाला बळी पडले आहेत. बऱ्याच नेत्यांवर ईडीचा दबाव टाकून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपाचा आहे. भाजपात धमक असेल तर निवडणुका लावून दाखवा. जनतेसमोर या. जनतेची ताकद तुम्हाला कळेल. माझी इच्छा आहे की निवडणुका लागायला पाहिजेत. तेव्हाच कोणाची ताकद कळेल असे आव्हानही त्यांनी भाजपाला दिले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची आशा, नागपूर, विदर्भ आणि मध्यभारताच्या विकासाचे इंजिन म्हणून नागपूर विमानतळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नागरी विमान वाहतूक मंत्री नायडू यांच्या उपस्थितीत नागपूर विमानतळ विकास हस्तांतरण

नागपूर व परिसरात मेन्टेनन्स कमांड, ऑटो एव्हिएशन आणि डिफेन्स एव्हिएशन मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *