विरोधकांच्या आरोपांना आणि टीकेला आरोपाने नाही तर कामातून उत्तर दिले, त्यामुळेच राज्याचा मुख्यमंत्री बनू शकलो, असे प्रतिपादन शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. नाशिकचे माजी आमदार नरेंद्र दराडे तसेच मुंबईतील उबाठा नगरसेविका सुजाता सानप यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, उपमुख्यमंत्री अजित पवार या टोळीचे आका आहेत का? एकनाथ शिंदे लुटारुंच्या टोळीचे मुखिया! आ. अर्जुन खोतकर व त्यांच्या पीएला तात्काळ अटक करण्याची मागणी
भाजपा महायुतीच्या सत्ताकाळात राज्यात गुन्हेगारीने नवा उच्चांक गाठला आहे. बहुतांश गुन्हेगारी घटनांतील आरोपी हे सत्ताधारी पक्षाशी संबंधित असून त्यांना सरकारचे अभय असल्याचे वारंवार दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात घडलेल्या विविध गुन्हेगारी कृत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पक्षाशी संबंधित लोकांचा मोठा सहभाग दिसून आला आहे, हे अत्यंत गंभीर …
Read More »१२ वर्षानंतर बार्टी संस्थेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची माहिती
डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण अर्थात बार्टी संस्थेत मागील १२ वर्षांपासून मानधनावर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यानुसार ४६ टक्के वाढ करण्यात आली आहे. हे कर्मचारी अनेक वर्षापासून मानधनावर काम करत आहे. यावाढीमुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले. मंत्री संजय शिरसाट म्हणाले, …
Read More »ठाण्यातील राष्ट्रवादीच्या सहा नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत केला प्रवेश ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील अनेकजणांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश
कल्याण-डोंबिवली लोकसभा क्षेत्रातील कळवा, खारेगाव, विटावा परिसरातील सहा माजी नगरसेवकांनी आज शिवसेनेचे मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी शिवसेना खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव राम रेपाळे उपस्थित होते. नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाने पालिका निवडणुकीपूर्वी ठाण्यात शिवसेना आणखी भक्कम झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाला खिंडार …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला, महायुतीने १०० दिवसात आका, खोके शब्द दिले काँग्रेसची उद्या रविवारी ४ मे रोजी परभणीत सद्भावना यात्रा व सोमवारी ५ मे रोजी संविधान बचाव यात्रा
महाराष्ट्राला महान संस्कृती व परंपरा लाभलेली आहे पण मागील काही वर्षात काही शक्ती जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या थोर परंपरेला कलंक लावत आहेत. राज्यात जातीपातीच्या वादास खतपाणी घालून सामाजिक वातावरण बिघडवले जात आहे. बीड जिल्ह्यातील काही घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्याची बदनामी होत आहे. दुधात खडा टाकण्याचे पातक झाले आहे पण आता हे चित्र बदलले …
Read More »विनायक राऊत यांची मागणी, एकनाथ शिंदे, उदय सामंत, निलेश राणे यांच्यावर कारवाई करा न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी करण्याची केली मागणी
न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री १० वाजल्यानंतर ध्वनीक्षेपक लावून जाहिर कार्यक्रम, जाहिर सभा घेऊ नये घेता येत नसताना कुडाळ येथे रात्री १० नंतर जाहिर सभा घेतली. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला असून या अवमानप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उबाठाचे नेते विनायक राऊत यांनी …
Read More »पर्यटकांचा बचाव करताना जीव गमावलेल्या काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला एकनाथ शिंदेकडून मदत पाच लाख रुपयांची मदत कुटुंबियांकडे सुपूर्द
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पर्यटकांच्या रक्षणासाठी धावून जाणारा सय्यद आदिल हुसैन शाह या अवघ्या २० वर्षांच्या स्थानिक युवकाचा देखील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. माणुसकी दाखवत धाडसाने दहशतवाद्यांना सामोरे जाणाऱ्या सय्यदच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या सय्यदच्या …
Read More »राज यांच्या आवाहनावर उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती, महाराष्ट्राच्या हिताआड येणाऱ्यांच्या पंगतीला नको आड येणाऱ्यांच्या घरी मी जाणार नाही, कोणाचे आगत स्वागत करणार नाही
नुकतेच राज ठाकरे यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पॉडकास्टला मुलाखत देताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आमच्यातील वाद क्षुल्लक आहेत, पण महाराष्ट्र मोठा असल्याचे सांगत ते वाद, भांडणे महाराष्ट्रासाठी मिटवायला माझी तरी इच्छा आहे. पण माझ्या एकट्याच्या इच्छेचे काय समोरच्याची पण इच्छा असायला हवी असे सांगत शिवसेना उबाठाचे प्रमुख …
Read More »वर्षा गायकवाड यांचा सवाल, रहिवाशांना अपात्र ठरवण्याचा अधिकार डीआरपीए- अदानीला कोणी दिला? धारावी पुनर्विकास प्रकल्प नाही तर मुंबईच्या मध्यभागी अदानीचे रिअल इस्टेट साम्राज्य उभारण्याचा प्रकल्प
धारावी हा पुनर्विकास प्रकल्प नाही तर मुंबईच्या मध्यभागी अदानीचे साम्राज्य उभारण्यासाठीचा रिअल इस्टेट प्रकल्प आहे. या प्रकल्पातून धारावीकरांचे हित साधले जाणार नाही तर फक्त आणि फक्त अदानीचे टॉवर उभे राहणार आहेत. पण अदानी सरकार व अदानीचे दलाल जाणीवपूर्वक दिशाभूल करत आहेत. काँग्रेस व धारावीकरांचा अदानी विनाश प्रकल्पाला विरोध आहे. या …
Read More »संजय निरूपम यांची स्पष्टोक्ती, वक्फ आणि मंदीराबाबत सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न चुकीचा विचारांपासून दूर गेलाला उबाठा पक्षच कृत्रिम झालाय
बाळसाहेबांच्या विचारांपासून दूर गेलेला आणि सत्तेसाठी हिंदुत्व सोडणारा उबाठा पक्षच कृत्रिम झालाय, अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संजय निरुपम पुढे म्हणाले की, उबाठा गटाने बाळासाहेबांचे भाषण आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (कृत्रिम बुद्धीमत्ता) वापर करुन दाखवले. पण खरतर उबाठा …
Read More »
Marathi e-Batmya