आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिळे अन्न दिल्याप्रकरणी मारहाण करणाऱ्या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडक शब्दांत समज दिली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ आमदार गायकवाड यांना समज दिली. लोकप्रतिनिधी या नात्याने रितसर तक्रार करता आली असती, पण …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, आमदार संजय गायकवाडला पक्ष तरी कसा पाठीशी घालतो? मराठीच्या नावे राज्यात सुरू असलेली गुंडागर्दी अयोग्य, मराठी माणसाने महाराष्ट्र धर्म जागवावा
आमदार निवासातील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण करणारे आमदार संजय गायकवाड यांचा हा काही पहिल्याच प्रकार नाही. हे महाशय वारंवार दादागिरी करतात, महापुरुषांचा अपमान करणे, शिविगाळ करणे, धमकी देणे असे प्रताप ते सतत करत असतात. अशा गुंड प्रवृत्तीच्या आमदाराला पक्ष तरी कसा पाठीशी घालतो, असा प्रश्न विचारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ आमदार संजय गायकवाड यांच्यावर …
Read More »प्रताप सरनाईक यांची घोषणा, एसटीतील त्या १५ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार विधानसभेत एसटी महामंडळाच्या भांडार खरेदीत घोटाळा प्रकरणी चर्चेत दिली माहिती
राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) पुणे जिल्ह्यातील दापोडी येथील मध्यवर्ती कार्यशाळेत भांडार खरेदीत मोठा आर्थिक अपहार उघडकीस आला आहे. विशेष लेखापरीक्षण पथकाने केलेल्या तपासणीत २२ कर्मचारी आणि अधिकारी दोषी आढळले आहेत. यापैकी १५ कर्मचारी आणि अधिकारी सध्या कार्यरत असून, उर्वरित ७ निवृत्त झाले आहेत. निवृत्त कर्मचाऱ्यांवर चौकशी करणे शक्य न झाल्याने …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, ‘जय गुजरात’ म्हणणारे एकनाथ शिंदे गुजरात व अमित शाहंचे गुलाम महाराष्ट्राला लागलेला गद्दारी व लाचारीचा कलंक
महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभीमानाचा प्रदेश आहे. स्वराज्यासाठी शिवरायांनी सुरतेवर स्वारी केली होती पण आज छत्रपती शिवरायांच्या राज्यात एकनाथ शिंदेंसारख्या गुलामांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातकडे गहाण ठेवला आहे. सत्तेसाठी लाचार झालेला माणूसच महाराष्ट्रातील कार्यक्रमात जय गुजरात ची घोषणा देऊ शकतो. पण स्वाभिमानी मराठी माणूस हे कदापी सहन करणार नाही, असा …
Read More »प्रकाश आबिटकर यांचे आश्वासन, अंधेरी येथील ईएसआयसी हॉस्पिटल लवकरच आरोग्य सेवेत राज्य व केंद्र कामगार विमा मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली
राज्यातील जनतेला उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी शासनाने प्राधान्य दिले आहे. अंधेरी येथील ईएसआयसी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे दुरुस्ती व नूतनीकरण काम प्रगतीपथावर आहे. हे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होऊन हे हॉस्पिटल सर्व सुविधांसह जनतेच्या सेवेसाठी सज्ज करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली. या …
Read More »डॉ दीपक सावंत यांना मंत्री पदाचा दर्जा कुपोषित माता व बालकांचा मृत्यू दर कमी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या कृती दलाचे प्रमुख
राज्यातील आदिवासी क्षेत्रातील कुपोषण, माता व बालकांचा मृत्यू दर कमी करण्यासाठी तसेच विविध संसर्गजन्य रोग नियंत्रणासाठी शासनाच्या माध्यमातून एक कृती दल (टास्कफोर्स) तयार करण्यात आला आहे. या कृती दलाचे अध्यक्ष डॉ दीपक सावंत यांना शासनाकडून मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ दिपक सावंत …
Read More »खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची मागणी, दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करा पाचवी आणि सहावी मार्गिका ‘सीएसएमटी’पर्यंत लवकर कार्यान्वित करा
लोकलमधील गर्दीचा भार कमी व्हावा आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरु करण्याची मागणी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी झालेल्या लोकल अपघातातील जखमींची खासदार डॉ. शिंदे यांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन विचारपूस …
Read More »एकनाथ शिंदे यांचा टोला, पूर्वीचे स्थगिती सरकार आताचे प्रगती सरकार ! अहिल्यानगर आणि ठाणे जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार
एखाद्याला शब्द दिला तर तो पूर्ण करतो, हे मुख्यमंत्री असताना मागील अडीच वर्षात महाराष्ट्रातील जनतेने पाहिलं आणि अनुभवलं. पूर्वीचे स्थगिती सरकार होते तर महायुतीचे प्रगतीचे आणि समृद्धीचे सरकार आहे, असा टोला शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठाला लगावला. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यासह अहिल्यानगरमधील श्रीरामपूरच्या शेकडो …
Read More »महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून रूपाली चाकणकर यांना हटवण्याची मागणी महिला नेत्यांमुळे राज्यातले राजकारण तापले
राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांवरून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या विरोधात विरोधी पक्ष तसेच सत्ताधारी पक्षाच्या महिला नेत्यांनी मोर्चा उघडला. महिला नेत्यांनी चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना आयोगाच्या पदावरून हटवण्याची मागणी केली. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या त्यांच्या कार्य पद्धतीवरून नाराजी वाढली असून विरोधी पक्ष आणि …
Read More »अमोल मातेले यांची सरनाईक यांच्यावर टीका, ते विधान दुर्दैवी आणि अपमानजनक हिंदी ही आता मुंबईची बोलीभाषा झाल्याचे विधानावरून केली टीका
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी “हिंदी ही आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे” असे विधान करून केवळ मराठी भाषेचा नव्हे, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि इतिहासाचा अपमान केला आहे. हे विधान निषेधार्ह, दिशाभूल करणारे आणि संपूर्ण मराठी समाजाच्या भावना दुखावणारे आहे, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष …
Read More »
Marathi e-Batmya