नुकतेच राज ठाकरे यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पॉडकास्टला मुलाखत देताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आमच्यातील वाद क्षुल्लक आहेत, पण महाराष्ट्र मोठा असल्याचे सांगत ते वाद, भांडणे महाराष्ट्रासाठी मिटवायला माझी तरी इच्छा आहे. पण माझ्या एकट्याच्या इच्छेचे काय समोरच्याची पण इच्छा असायला हवी असे सांगत शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात बॉल टोलवला.
महाराष्ट्राच्या मातीचा स्वाभिमान रक्तात आहे आमच्या.
कोणतीही सत्ताकारणं महाराष्ट्राच्या अस्मितेपेक्षा मोठी नाहीत!एक दिलखुलास संवाद, #राजठाकरे यांचा सोबत. https://t.co/LaSrJZxh9T@mnsadhikrut #RajThackeraySpeaks #RajThackeray #MaheshManjrekar #Marathi #मराठी #Maharashtra
— Mahesh Manjrekar (@manjrekarmahesh) April 19, 2025
राज ठाकरे यांच्या या आवाहनावर उद्धव ठाकरे यांनी लगेच प्रत्युत्तर देत म्हणाले की, मी ही किरकोळ वाद भांडणे मिटवायला तयार आहे. तसे बघायला गेले तर माझ्याकडून कोणतेच वाद किंवा भांडणे नाहीत, जर असतील ते इथेच मिटवले असे जाहिर करत महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱ्यांना घरी बोलावणार नाही की मी त्यांच्या घरी जाणार नाही, अशांचे आगत- स्वागत करणार नाही, अशांच्या पंक्तीलाही बसणार नाही असे जर असेल तरच मी ज्यांची शिवसेनेसोबत अर्थात एसंशी (एकनाथ संभाजी शिंदे) नव्हे महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याची इच्छा असेल अशा सर्वांना सोबत घेऊन चालण्याची आमचीही इच्छा असल्याचे सांगत राज ठाकरे यांच्या आवाहनाला उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला.
शिवसेना उबाठाच्या कामगार सेनेच्यावतीने दादरच्या शिवाजी मंदिरात आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. त्यावेळी शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे बोलत होते.
मुंबई – #LIVE | भारतीय कामगार सेना ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा | प्रमुख मार्गदर्शक – पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे | श्री छत्रपती महाराज शिवाजी मंदिर स्मारक मंडळ, दादर (प.) https://t.co/3WV27YzBHc
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) April 19, 2025
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी यापूर्वीच सांगत होतो की, महाराष्ट्राच्या अस्मितेवर फौज चालून येत आहे. महाराष्ट्रात येऊ घातलेले प्रकल्प गुजरातला पळवून नेले जात आहेत, इथल्या मराठी भाषेवर महाराष्ट्राचं मीठ खाणाऱ्यांकडून मध्यंतरी कोण ते जोशी की वाशी येथे आले होते, ते म्हणत होते की, घाटकोपरची भाषा अमूक आहे, तमूक आहे म्हणून त्यांनीच जाहिर केलेल्या घाटकोपरमध्ये हिंदी भाषा सक्तीची करा असे आव्हान भाजपाचे नाव न घेता देत लोकसभा विधानसभा निवडणूकीत आपण एकत्र येण्याचे आवाहन करत होतो, त्यावेळी दिल्लीत आपल्या विचाराचे सरकार बसविले असते तर महाराष्ट्रातही आपले सरकार बसले असते. पण काही जणांना ते त्यावेळी मान्य नव्हते अशी उपरोधिक टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे नाव न घेता केली.
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, त्या लोकसभा विधानसभा निवडणूकीच्या काळात हे जे हिताच्या बाजूने आज बोलत होते, त्यावेळी कधी त्यांना पाठिंबा देत होते, तर कधी त्यांना समर्थन देत होते आणि परत जमले नाही म्हणून त्यांच्या विरोधात भूमिका घेत विरोध करत आहेत, असे चालणार नाही, त्यामुळे माझ्याही काही अटी असून महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱ्यांशी मैत्री कधी नको, त्यांचे आगत-स्वागत नको, की त्यांच्या पंगतीला बसणे नको असेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya