ठाण्यातील राष्ट्रवादीच्या सहा नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत केला प्रवेश ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील अनेकजणांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश

कल्याण-डोंबिवली लोकसभा क्षेत्रातील कळवा, खारेगाव, विटावा परिसरातील सहा माजी नगरसेवकांनी आज शिवसेनेचे मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी शिवसेना खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव राम रेपाळे उपस्थित होते. नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाने पालिका निवडणुकीपूर्वी ठाण्यात शिवसेना आणखी भक्कम झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाला खिंडार पडले असून कळवा मुंब्रा विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी मोठा धक्का आहे.

आज ठाणे मनपाचे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, माजी नगरसेविका  मनाली पाटील, माजी नगरसेवक महेश साळवी, माजी नगरसेविका मनिषा साळवी, माजी नगरसेविका व ठाणे महिला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, माजी नगरसेवक सचिन म्हात्रे यांनी भगवा झेंडा हाती घेऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतून दररोज शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे आणि शिवसेनेचा गड आहे. ठाणे महानगरपालिकेतील ७८ नगरसेवक शिवसेने सोबत आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना कधी काम करत नाही. शिवसेनेचे काम वर्षाचे बारा महिने ३६५ दिवस सुरु असते याचा अनुभव जनतेने घेतलाय. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षातील लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

आमदार जितेंद्र आव्हाड यांना एकच दिवशी दुसरा धक्का 

माजी नगरसेविका प्रमिला मुकुंद केणी आणि युवनेते मंदार मुकुंद केणी यांचाही शिवसेनेत पक्षप्रवेश

ठाणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या माजी नगरसेविका प्रमिला मुकुंद केणी आणि  राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते मंदार मुकुंद केणी यांनीही आज शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कला, वारसा आणि आधुनिक सुविधांचा काळा घोडा परिसरात संगम काळा घोडा आर्ट एवेन्यू सुशोभीकरण कामांचे लोकार्पण

मुंबईचे वैभव असलेल्या काळाघोडा परिसरातील रस्त्यांचे अत्यंत उत्तमरित्या सुशोभीकरण करण्यात आले आहे. सुशोभीकरण कामातून कलात्मक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *