Tag Archives: ShivsenaOFC

कुणाल कामरा प्रकरणी उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय…तर अटकेपासून संरक्षण एफआयआर रद्द करण्याच्या याचिकेवर निर्णय़ होत नाही तोपर्यंत संरक्षण

मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (१६ एप्रिल) विनोदी अभिनेता कुणाल कामराला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केलेल्या उपहासात्मक व्हिडिओ आणि “गद्दर” टिप्पणीनंतर त्याच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याच्या याचिकेत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले. कामरा यांना अटकेपासून संरक्षण देताना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने …

Read More »

संजना- सजंय घाडी यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश महापालिका निवडणुकीपूर्वी उबाठा गटाला जोरदार धक्का

उबाठा गटाचे माजी नगरसेवक संजय घाडी आणि उबाठाच्या उपनेत्या प्रवक्त्या संजना घाडी, व मागाठाणे विधानसभेतील अनेक उप शाखाप्रमुख, गट प्रमुख, शाखाध्यक्ष आणि युवा सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. या प्रवेशासाठी माजी नगरसेवक राम रेपाळे यांनी मेहनत घेऊन यशस्वी प्रयत्न …

Read More »

आशिष शेलार यांची घोषणा, पुनर्विकासित कामाठीपुराला नामदेव ढसाळ नगर नाव सार काही समष्टीसाठी कार्यक्रमात केली घोषणा

ज्या कामाठी पुरातील व्यथा वेदना कवी नामदेव ढसाळ यांनी मांडल्या त्या कामाठी पुराच्या पुनर्विकास प्रस्तावित आहे. ज्यावेळी ही एक नवी मुंबई या भागात उभी राहिल तेव्हा या भागाला महान कवी नामदेव ढसाळ नगर असे यांचे नाव दिले पाहिजे, त्यासाठी आपण सगळ्यांनी पाठपुरावा करू या, अशी कल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. …

Read More »

एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका, काहींचा चेहरा एफबी, भानगडी सोळा… सांगोल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

सर्वसामान्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस यावेत, यासाठी मुख्यमंत्री असताना पायाला भिंगरी लावून अडीच वर्ष काम केले, मात्र काहींनी बंगल्यात राहून ‘एफबी’वर सरकार चालवले. घरात बसून ‘फुकट बाबुराव’प्रमाणे सरकार चालत नाही, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उबाठावर केली. सांगोला विद्या मंदिर प्रशाळेच्या मैदानात आयोजित जाहीर आभार सभेत ते बोलत होते. तत्पूर्वी …

Read More »

संजय निरूपम यांची काँग्रेसवर टीका, ओबीसी मतांसाठी केलेला ठराव निंदनीय काँग्रेस अधिवेशनात केलेल्या ठरावावरून निरूपम यांची टीका

ओबीसी मतांसाठी काँग्रेसने केलेला ठराव निंदनीय असल्याची टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांची आज केली. अहमदाबादमधील अधिवेशनात काँग्रेसने त्यांच्या मूळ भूमिकेशी पूर्णपणे युटर्न घेतला. जाती धर्माच्या आडून समाजात द्वेष पसरवणाऱ्यांविरोधात ठराव न करता, काँग्रेस नेतृत्वाने ओबीसींच्या मतांसाठी ठराव केला, यातून समाजाला जातीपातींमध्ये विभागण्याची काँग्रेसची भूमिका आहे, त्याचा तीव्र …

Read More »

अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्ष पदी प्रताप सरनाईक यांची नियुक्ती आयएएस अधिकाऱ्याकडून एसटी महामंडळाचे अध्यक्ष पद काढून मंत्र्यांकडे सुपुर्द

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपामध्ये कुरबुरी वाढल्या होत्या. त्यामुळे एसटी महामंडळाचे अध्यक्ष पद राज्याच्या परिवहन मंत्र्यांकडे राहत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्ष पदी स्वतंत्र आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. त्यामुळे विविध तर्क-वितर्कांना उधाण आले होते. …

Read More »

संजय निरूपम यांची टीका, काँग्रेस मानसिक दिवाळखोर झालीय निवडणूक निकालांवर टीका करण्यापेक्षा पराभवाचे विश्लेषण करा

एकामागून एक निवडणुकांमध्ये पराभव होत असल्याने काँग्रेस मानसिकदृष्ट्या दिवाळखोर झालीय अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केली. महाराष्ट्रातील निवडणूक निकालांवर काँग्रेस नेत्यांनी संशय व्यक्त केला, त्यावर निरुपम यांनी सडकून टीका केली. संजय निरुपम पुढे म्हणाले की, भारतीय मतदारांचा विश्वास संपादन करण्यात काँग्रेस सपशेल अपयशी ठरली …

Read More »

दीपक केसरकर यांची टीका, कोकणी माणसावर उबाठाचे बेगडी प्रेम कोकणी जनता मूळ शिवसेनेसोबतच असल्याचे निवडणुकीतून शिक्कामोर्तब

मुख्यमंत्री असताना कोकणच्या भल्याचा एकही निर्णय न घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांचे कोकणी माणसावर बेगडी प्रेम असल्याची खरमरीत टीका शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज केली.  बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नुकताच उबाठा नेतृत्वाने पुन्हा एकदा कोकण पादाक्रांत करण्याचे जाहीर केले. या वक्तव्याचा केसरकर यांनी खरपूस …

Read More »

बिग बॉसची ऑफर, कुणाला कामरा म्हणाला, मानसिक रूग्णालयात जाणे पसंत करेन बिग बॉसच्या ऑफरवर कुणाल कामराची उपरोधिक टीका

सध्या कायदेशीर अडचणीत सापडलेला विनोदी कलाकार कुणाल कामरा हा बिग बॉसचा सर्वात मोठा चाहता नाही; त्याने सलमान खानने आयोजित केलेल्या रिअॅलिटी शोमध्ये सामील होण्याची कथित ऑफर नाकारली. त्याने इंस्टाग्राम स्टोरीजवर जाऊन त्याच्या आणि रिअॅलिटी शोच्या कास्टिंग विभागात सहभागी असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीमधील चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला. ‘कास्टिंग एजंट’ने विनोदी कलाकाराला …

Read More »

कुणाल कामरा प्रकरणी उच्च न्यायालयाची शिवसेना शिंदे गटाला नोटीस एकनाथ शिंदेविरोधातील विडंबनात्मक गाण्याचे प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात विडंबनात्मक गाणे केल्याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी हास्यकलाकार कुणाल कामराने दाखल केलेल्या याचिकेची उच्च न्यायालयाने दखल घेतली. पोलीस, तक्रारकर्ते तथा शिवसेना आमदार मुरजी पटेल यांना न्यायालयाने नोटीस बजावली आणि भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. कुणाल कामराच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्या. सारंग कोतवाल आणि न्या. एम. एस. …

Read More »