कुष्ठरोगींना अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच त्यांना सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षणही द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे विधानसभेत केली. राज्यात एकाही कुष्ठरुग्णाला सरकारी नोकरी मिळालेली नाही हेसुध्दा त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. कुष्ठरोग झालेल्या व्यक्तींची बोटे झडतात. त्यांना अपंगत्व येते. त्यानंतरही त्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र …
Read More »राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ‘यांच्या’ अध्यक्षतेखाली समिती शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समिती करणार अंमलबजावणी
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी संदर्भातील शैक्षणिक व प्रशासकीय बाबींवर कार्यवाही करण्यासाठी राज्य शासनाने शालेय शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीसाठी टप्या-टप्प्याने कार्यवाही सुरू असून याअंतर्गत राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा …
Read More »विद्यार्थ्यांसाठी खुषखबरः १०० टक्के पाठ्यक्रम लागू कोरोना कालावधी संपुष्टात आल्यानंतर शिक्षण विभागाचा निर्णय
मागील दोन वर्षात कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये पुरेशा क्षमतेने सुरु नव्हती. तसेच कोरोनामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवाला एकप्रकारे धोका निर्माण झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने शिक्षण देण्यात येते. परंतु या ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षकांनाही अभ्यासक्रम पूर्ण करता येत नव्हते. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला …
Read More »पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आता सानुग्रह अनुदान सुधारित राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना लागू
इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुधारित राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना लागू करण्यास शासनाने मान्यता दिल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली. वाढलेली महागाई व विद्यार्थ्यांचे अपघाताचे वेगवेगळे स्वरूप या अनुषंगाने सर्व बाबींचा विचार करून शासनाने सुधारित योजना लागू करण्याचा निर्णय घेतला असून …
Read More »दहावीचा निकाल ९६.९४ टक्के; उत्तीर्णमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आवड आणि कल यानुसार पुढील मार्ग निश्चित करा- शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा एकनाथ गायकवाड
“कोरोनामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीतही आपल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या जिद्दीने, धैर्याने, संयमाने व परिश्रमाने अभ्यास पूर्ण करत दहावीची परीक्षा दिली. शिक्षणाप्रती त्यांच्या या समर्पणभावाला सलाम,” अशा भावना शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या संदेशामध्ये व्यक्त केल्या. या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी हताश न होता पुन्हा नव्या …
Read More »RTE कायदा असतानाही महाराष्ट्रात ५५ हजार मुलं शिक्षणापासून वंचित शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार-शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड
‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क’ अधिकार अधिनियमाच्या अनुषंगाने शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली. नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे स्वागत करताना शाळेच्या परिसरातील ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याची खात्री करून शाळापूर्व तयारीच्या काळात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध …
Read More »शाळा सुरु होणार का? शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले “हे” महत्वाचे वक्तव्य १५ जूनला शाळा सुरु होणार पण तत्पूर्वी एसओपी जाहिर करणार
मुंबईसह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली आहे. आता तर राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने हजाराची संख्याही पार केली. त्यातच राज्यातील शाळा १५ जूनपासून सुरु होणार असल्याची घोषणा यापूर्वी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. त्याअनुषंगाने एकाबाजूला शाळा सुरु होण्याची तारीख जवळ येत असतानाच दुसऱ्याबाजूला कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या …
Read More »शालेय शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा, शाळा सुरु होण्याआधी पाठ्यपुस्तके मिळणार समग्र शिक्षा अभियानातंर्गत वितरणास प्रारंभ
शाळा सुरु होण्याच्या आधी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पोहचवण्याचे नियोजन केले असून यावर्षी देखील सर्व विद्यार्थ्यांना वेळेत पाठ्यपुस्तके मिळणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. समग्र शिक्षा अभियानातंर्गत पाठ्यपुस्तकाच्या वितरणाचा प्रारंभ आज त्यांच्या हस्ते बालभारतीच्या गोरेगाव भांडारात करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शिक्षण विभागातील संचालक कैलास पगारे, …
Read More »शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनो अडचणी आहेत का? मग ही बातमी वाचाच अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर संवाद दिनाचे आयोजन
मान्यताप्राप्त शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर ‘संवाद दिन’ आयोजित करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या माध्यमातून त्यांच्या अडचणी स्थानिक पातळीवर आणि तातडीने सोडविणे शक्य होणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. शालेय शिक्षण विभागाअंतर्गत मान्यताप्राप्त खासगी अनुदानित/ विनाअनुदानित/ अंशत: अनुदानित शाळेतील …
Read More »कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळा सुट्टी नाहीच, एप्रिलमध्येही सुरु राहणार शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांची माहिती
कोरोना काळात शाळा बंद राहील्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान शैक्षणिक नुकसान झाले. हे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी यंदा शाळांना मिळणारी उन्हाळा सुट्टी जवळपास रद्द करण्यात आली असून एप्रिल महिन्यातही शाळा पूर्णवेळ सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळांची यंदाची उन्हाळी सुट्टी रद्द …
Read More »
Marathi e-Batmya