Tag Archives: varsha gaikwad

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबरः मागासवर्गीयांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा मंत्री वर्षा गायकवाड यांची ट्विटरद्वारे माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सरकारी सेवेत असलेल्या मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला असून २०१७ सालापासून रखडलेल्या या पदोन्नत्या लवकरच मिळणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे दिली. मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पदोन्नत्याबाबत निर्णय घेण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीगटाची स्थापना करण्यात आली होती. या मंत्रिगटाची उपमुख्यमंत्री …

Read More »

राज्यातील शिक्षण अव्वल दर्जाचे करणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी जागतिक स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना मिळाला याबद्दल अभिमान असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काढले यांनी काढत डिसले यांच्यासारखे नाविन्यपुर्ण उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग राबविणाऱ्या राज्यातील शिक्षकांना सोबत घेऊन शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत अव्वल दर्जाचे शिक्षण पोहचविण्यासाठी आराखडा तयार करावा असे …

Read More »

या तारखेपासून रखडलेली अकरावी प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरु शिक्षण विभागाकडून वेळापत्रक जाहीर

मुंबईः प्रतिनिधी ११वी ची रखडलेली प्रवेश प्रक्रिया आता सुरु करण्यात येत असून त्याविषयीचे वेळापत्रक लवकरच शिक्षण विभागाकडून नुकतेच जारी करण्यात आली. मात्र ही प्रवेश प्रक्रिया पार पाडताना मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित जागा देवून प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे न्यायालयात जरी याचिका प्रलंबित असली तरी मराठा समाजातील मुलांना आरक्षणाचा लाभ मिळणार …

Read More »

९ हजार शाळांमध्ये ३ लाख विद्यार्थ्यांनी लावली उपस्थिती राज्यातील १ लाख ८६ हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी १६४३ कोरोना पॉझिटीव्ह

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील ९ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर कोरोनाची बाधा विद्यार्थ्यांना होवू नये या उद्देशाने या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार राज्यातील १ लाख ८६ हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी १६४३ जणांचे अहवाल …

Read More »

आता शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेणार ! शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तथापि, शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातील शाळा सुरू करत असताना स्थानिक जिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करूनच विद्यार्थ्यांचे …

Read More »

खुषखबर : शाळा सुरु होणार, वाचा मुख्यमंत्री काय म्हणाले योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा आदी उपस्थित …

Read More »

२३ नोव्हेंबर नंतर नववी – बारावीचे वर्ग सुरू मात्र उद्यापासून दिवाळी सुट्टी शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने अनलॉकनंतर वाहतुक, प्रवास व्यवस्था, नाट्यगृहे, सिनेमागृह, बाजारपेठा सुरळीतपणे सुरू केलेल्या आहेत. याच पार्श्‍वभूमीवर माध्यमिक शाळेतील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा मानस असल्याचे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे बंद असले तरी शिक्षण ऑनलाईन सुरु आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहूनच २३ नोव्हेंबर …

Read More »

परंपरागत दरवर्षीची शिक्षक व विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी मिळणार! शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार असल्याची अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशात ऑनलाईन शिक्षण पध्दती अवलंब करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकही अव्याहतपणे अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत गुंतले आहेत व त्यांनी शाळा बंद असल्या तरी …

Read More »

११ वीचे ऑनलाईन क्लासेस सुरु: जॉंईनींगसाठी या संकेतस्थळावर नाव नोंदवा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या प्रादुर्भावात घट होताना दिसत असले तरी शाळा, कॉलेज सुरु करण्याबाबत राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. यापार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस सुरु करण्यात आले. त्याचधर्तीवर आता ११ वीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लासेसच्या मार्फत शिक्षण सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या …

Read More »

पदोन्नतीतील आरक्षण प्रकरणी अॅड.प्रकाश आंबेडकरांनी केला श्रीमंत मराठ्यांवर आरोप राज्य सरकारचाही केला निषेध

मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षणसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. या याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने मागासवर्गीयांच्या पदोन्नतीत किती जागा भरल्या, किती रिक्त आहेत याची माहिती मागविलेली असतानाही ती जाणीवपूर्वक सादर केली जात नसल्याप्रकरणी यासाठी श्रीमंत मराठे जबाबदार असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी करत राज्य …

Read More »