उध्दव ठाकरेंना राज्यपाल नियुक्त सदस्य करण्याचा अजित पवारांचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत प्रस्ताव पाठविण्यावर शिक्कामोर्तब

मुंबई: विशेष प्रतिनिधी

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विधान परिषद किंवा विधानसभेवर निवडूण येणे आवश्यक आहे. मात्र कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वच निवडणूका निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्याने अखेर मुख्यमंत्र्यांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

राजकिय संकेतानुसार स्वत: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे स्वत:च्याच अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक घेवून स्वत:च्या निवडीचा प्रस्ताव तयार करण्यास मंजूरी देणे वैधानिकदृष्ट्या योग्य होत नव्हते. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेण्याचे तात्पुरते अधिकार देण्यात आले . त्यात याविषयावर शिक्कामोर्तब करण्यात आला असून याविषयीचा प्रस्ताव  तातडीने राज्यपालांकडे पाठविण्यात येणार आहे.

About Editor

Check Also

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ शेवटची तीन महिन्यांची मुदतवाढ

२०२६-२७ या शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आरक्षित प्रवर्गातून प्रवेश निश्चित झालेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *