खाजगी आस्थापनांनो कोरोना टेस्ट करा नाहीतर कारवाईला सामोरे जा आरोग्य विभागाकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे असून अशी टेस्ट न खाजगी आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व खाजगी आस्थापनांच्या प्रमुखांना दिला आहे.
कोरोनाबाधितांचे संख्या नियंत्रणात आणण्यासाठी ट्रेसिंग आणि ट्रॅकिंग करण्यास केंद्र सरकारने भर दिला आहे. त्यानुसार राज्य सरकारने काम करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे खाजगी आस्थापनात काम करणारे कर्मचारीही अनेक भागातून कार्यालयात पोहोचत असतात. त्यामुळे त्यातील कोणाला कोरोनाची लागण झाली कोणाला नाही याची उशीरा माहिती उपल्बध होते. यामुळे कोरोनाबाधीतांची संख्याही वाढण्यास मदत असल्याने राज्यातील सर्व खाजगी आस्थापनात काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांची कोविड-१९ चाचणी करण्याचा निर्णय घेत तो सर्वांवर बंधनकारक करण्यात आला आहे.
या आदेशान्वये प्रत्येक खाजगी आस्थापनांनी यासंदर्भातील अर्ज जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांकडे करायचा आहे. त्यानंतर ही चाचणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा आणि शहरस्तरावर यासंदर्भात एक समिती स्थापन करण्याचे निर्देशही आरोग्य विभागाने जिल्हाधिकारी आणि महापालिकांना दिले आहेत. ज्या खाजगी आस्थापना अशी चाचणी करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही आरोग्य विभागाने दिला.

About Editor

Check Also

प्रकाश आबिटकर यांची माहिती, ईएसआय रुग्णालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर भर आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासनाचे प्रयत्न

राज्यातील कामगार विमा रुग्णालयांमध्ये (ईएसआय) आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून आरोग्यसेवा सक्षम, जलद आणि सुलभ करण्यासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *