केंद्र सरकारच्या या निर्णयाचे काँग्रेस मंत्री वडेट्टीवारांकडून स्वागत ओबीसी विद्यार्थ्यांनाही आता मिळणार सैनिकी शाळेत आरक्षण मिळणार

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी

देशातील सैनिक शाळांमध्ये ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षण मिळावी अशी मागणी देशभरातून करण्यात येत होती. अखेर या मागणीचा समावेश केंद्र सरकारने केला असून सैनिक शाळांसाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश पूर्व परिक्षेच्या आदेशात ओबीसी समाजालाही २७ टक्के आरक्षण देण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली असून केंद्राच्या निर्णयाचे काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्वागत ट्विटरद्वारे केले.

केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशात सैनिक शाळांमध्ये एस.सी., एसटी मागास प्रवर्ग, सर्वसाधारण प्रवर्ग, संरक्षण विभागात कार्यरत असलेल्या पाल्यांच्या मुलांना आणि खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी यापूर्वी आरक्षित जागा ठेवण्यात आले होत्या. मात्र आता यात ओबीसी समाजाचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या ओबीसी विद्यार्थ्यांना सैनिकी शाळेत प्रवेश मिळणे सोपे होणार आहे.

दरम्यान, ओबीसी विद्यार्थ्यांना एस.सी., एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात यावी अशी मागणीही ट्विटरच्या माध्यमातून मंत्री वडेट्टीवार यांनी केली.

 

 

About Editor

Check Also

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश, महिन्यात अंमलबजावणी अहवाल सादर करा चित्रपट व करमणूक क्षेत्रातील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर बैठक

मुंबईतील गोरेगाव येथील चित्रनगरीसह राज्यातील चित्रपट व करमणूक क्षेत्रातील कंत्राटी फिल्म कामगार आणि ज्युनिअर कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *