यंदाच्या वर्षात फक्त २५ दिवस सुट्ट्या, ८ दिवसांचा सरकारी कर्मचाऱ्यांचा तोटा राज्य सरकारकडून सुट्यांचे वेळापत्रक जाहीर-शनिवार-रविवारमुळे ८ दिवस अतिरिक्त काम करावे लागणार

मराठी ई-बातम्या टीम

यंदाच्या वर्षभरात राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक-शाळा-महाविद्यालये, यासह निमसरकारी संस्थांना २०२२ या आगामी वर्षात जवळपास विविध सणांच्या २५ दिवसांच्या सुट्या मिळत आहेत. तर त्यातील ८ सणवार हे शनिवार, रविवारी येत असल्याने अतिरिक्त मिळणारे ८ दिवस सुट्यांचे या सर्वांना मिळणार नाहीत. आगामी वर्षात सर्वात कमी सुट्या आल्याने आपसूच कर्मचाऱ्यांना जास्त दिवस काम करावे लागणार आहे.

राज्य सरकारने यासंदर्भात जारी केलेल्या आदेशानुसार २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन, १ मार्च- महाशिवरात्री, १८ मार्च- होळी, १४ एप्रिल-महावीर जयंती, १५ एप्रिल-गुड फ्रायडे, ३ मे- रमझान ईद, १६ मे-बुध्द पौर्णिमा, ९ ऑगस्ट –मोहरम, १५ ऑगस्ट-स्वातंत्र्य दिन, १६ ऑगस्ट-पारशी नववर्ष, ३१ ऑगस्ट-गणेश चर्तुर्थी, ५ ऑक्टोंबर-दसरा, २४ ऑक्टोंबर-दिवाळी अमावस्या (लक्ष्मी पूजन), २६ ऑक्टोंबर दिवाळी (बलिप्रतिपदा)-भाऊबीज, ८ नोव्हेंबर –गुरू नानक जयंती,१ एप्रिल-बँक व्यवहारांना सुट्टी आदी सुट्टीचे दिवस कार्यालयीन कामकाजाच्या दिवसात येत आहेत. त्यातील दिवाळीच्या सुट्या या सोमवारपासून मिळणार आहेत. त्यामुळे ऑक्टोंबर महिन्यात जवळपास ५ दिवस हे कर्मचाऱ्यांना सुट्यांचे मिळणार आहेत.

याशिवाय १९ फेब्रुवारी-छत्रपती शिवाजी महाराज जयंती, २ एप्रिल-गुढी पाडवा, १० एप्रिल-राम नवमी, १ मे- महाराष्ट्र दिन, १० जुलै- बकरी ईद, २ ऑक्टोंबर-महात्मा गांधी जयंती, ९ ऑक्टोंबर- ईद-ए-मिलाद, २५ डिसेंबर- ख्रिसमस हे सुट्टीचे दिवस शनिवार-रविवारी आल्याने सरकारी कर्मचाऱ्यांसह निमसरकारी संस्थांना ८ दिवस सुट्ट्यांचा तोटा झाला आहे. मात्र दुसऱ्या बाजूला सरकारी कर्मचाऱ्यांना हे ८ दिवस अतिरिक्त काम करावे लागणार आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या सुट्यांचे परिपत्रक-

About Editor

Check Also

प्रशांत किशोर यांच्या भेटीवर सुनिल तटकरे यांची स्पष्टोक्ती, मला रणनीतीकाराची गरज नाही’ मी प्रॅक्टीकल राजकारणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही गटबाजी किंवा मतभेद नसून पक्षाचे सर्व निर्णय सामूहिक चर्चेने व एकमताने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *