विद्यमान संजय पांडे निवृत्त होण्याआधीच मुंबई पोलीस आयुक्तपदी विवेक फणसळकर राज्य सरकारकडून एक दिवस आधीच नियुक्ती जाहिर

मुंबईचे विद्यमान पोलिस आयुक्त संजय पांडे हे अधिकृतरित्या उद्या ३० जून रोजी सेवानिवृत्ती होत आहेत. त्यामुळे रिक्त होत असलेल्या मुंबई पोलीस आयुक्तपदी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक फणसळकर यांची नियुक्ती मुंबई पोलीस आयुक्तपदी करण्यात आली आहे. गृह विभागाने बुधवारी फणसळकर यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत फणसळकर यांच्या नियुक्तीला मान्यता दिली.

संजय पांडे हे उद्या गुरुवारी नियत वयोमानानुसार मुंबई पोलीस आयुक्त पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी फणसळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विवेक फणसळकर हे १९८९ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी फणसळकर हे ठाणे पोलिस आयुक्तपदी कार्यरत राहिले आहेत.

फणसळकर यांच्या नियुक्तीचे आदेश

About Editor

Check Also

आयआयटी बॉम्बे मधील विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन IIT Bombay मधील जाति-आधारित छळाच्या आरोपांची सखोल चौकशी करा, प्रा. सुर्यनारायण डुल्लांना बरखास्त करा: झीनत शबरीन

आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्ये प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत आयआयटी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *