राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची सत्तार यांच्या घरावर निदर्शने

औरंगाबाद येथे राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अश्लिल शिवी देत आक्षेपार्ह विधान केले. शिर्डी येथील राष्ट्रवादीच्या शिबिरात खोक्यावरून सुळे यांनी डिवचल्याबाबत प्रसार माध्यमांनी विचारले असता अब्दुल सत्तार यांनी शिवी देत विधान केले. सत्तार यांच्या या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या शासकीय निवासस्थानी धडक देत दगडफेक केली. तसेच राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी फोर्ट येथील माता रमाबाई आंबेडकर पोलिस स्थानकात सत्तार यांच्याविरोधात तक्रार दिली.

सत्तार यांचा २४ तासांत राजीनामा न घेतल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंत्रालयात बसू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी दिला.

या प्रकारावरून राज्यातील राष्ट्रवाजी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून राज्यात विविध ठिकाणी मुंबई ठाणे, पुणे, औरंगाबाद आदी ठिकाणी तीव्र निदर्शने केली. मुंबईतील सत्तार यांच्या निवासस्थानी महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संतप्त कार्यकर्त्यानी सत्तार यांच्या शासकिय निवासस्थानावर चाल करून खिडक्यांच्या काचा फोडल्या. यावेळी विद्या चव्हाण यांनी मंत्री अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, रविंद्र चव्हाण या तिन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबुब शेख यांनी मंत्री सत्तारांचा एकेरी शब्दांत उल्लेख करून आपला संताप व्यक्त केला आहे. शेख यांनी सत्तारांवर निशाणा साधताना म्हटले, दहा पक्ष आणि दहा बाप बदलणारी ही सरड्याची औलाद अत्यंत खालच्या भाषेत सुप्रिया सुळें बद्दल बोलत आहे.” अशा शब्दांत शेख यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर सडकून टीका केली.

सत्तारांच्या विधानाचा निषेध करताना शेख यांनी सत्तारांचा चांगलाच समाचार घेतला. “तुझ्या सत्तेची मस्ती राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिरवल्याशिवाय राहणार नाही”, असे शेख यांनी इशारा दिला.

दरम्यान, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रभर सत्तार यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदवण्याचे आवाहन करताच राज्यात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. “संपूर्ण महाराष्ट्रभर अब्दुल सत्तारच्या पुतळ्याला जोडे मारुन त्याच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच सत्तारच्या दौऱ्यामध्ये सत्तेची मस्ती उतरवण्याची तयारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने करावी. याला धडा शिकवल्याशिवाय राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शांत बसू नये”, असे आवाहन शेख यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, २००२ च्या गुजरात दंगलीप्रमाणे देशभर दंगली घडवण्याचे भाजपाचे षडयंत्र पश्चिम बंगालमधील दंगली या त्याची सुरुवात, डिलिमिटेशन कमिटीत कोणत्या निवृत्त न्यायाधिशाला घ्यायचे त्यांचे नावही सुनिश्चित

भारतभरात दंगली घडवून आणण्याचे कारस्थान भारतीय जनता पक्षाकडून सुरु आहे, त्यासाठी प्रशिक्षण हाती घेतल्याची माहिती आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *