दहा बँका देत आहेत स्वस्त गृहकर्ज, तपासा यादी स्वप्नातील घर आकारास येऊ शकेल, फक्त तुम्ही स्वस्त गृहकर्ज...

स्वतःचे घर बांधणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. अनेक वेळा घर बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी गृहकर्जाची मदत घ्यावी लागते. गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या बँकांमध्ये गृहकर्जाच्या व्याजदरात चढ-उतार पाहायला मिळत होते. गृहकर्जाच्या व्याजदरातील चढ-उतार हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या निर्णयांवर अवलंबून असतात.

रिझर्व्ह बँक (RBI) ने मे २०२२ पासून रेपो दरात वाढ करण्यास सुरुवात केली. या वर्षी फेब्रुवारीपर्यंत आरबीआयने रेपो दरात सातत्याने वाढ केली होती. त्यामुळे जवळपास सर्व प्रकारचे कर्ज महाग झाले आहे. याशिवाय गृहकर्जाचे व्याजदर सिबील स्कोअर, पगार, नोकरी आणि नोकरीचा कालावधी यानुसारही ठरवले जातात. वेगवेगळ्या बँकांमध्ये किती व्याजदराने गृहकर्ज मिळत आहे ते जाणून घेऊया.

विविध बँका गृहकर्ज व्याजदर

अॅक्सिस बँक आपल्या ग्राहकांना किमान १०.५ आणि कमाल १०.९ टक्के दराने गृहकर्ज देत आहे. तर बँक ऑफ बडोदा किमान ९.१५ आणि कमाल १३.३२ टक्के दराने गृहकर्ज देत आहे. बँक ऑफ इंडिया किमान ८.५ आणि कमाल १०.६ टक्के, बँक ऑफ महाराष्ट्र किमान ८.६ आणि कमाल १०.३ टक्के दराने आपल्या ग्राहकांना गृहकर्ज देत आहे. एचडीएफसी बँकेचा गृहकर्जाचा किमान दर ८.५ आणि कमाल ९.४ टक्के आहे.

आयसीआयसीआय बँक आपल्या ग्राहकांना किमान ९.२५ आणि कमाल ९.९ टक्के आणि युनियन बँक ऑफ इंडिया किमान ८.७ आणि कमाल १०.८ टक्के दराने गृहकर्ज देत आहे. आयडीबीआय बँक किमान ८.५५ टक्के आणि कमाल १०.७५ टक्के, कोटक महिंद्रा बँक किमान ८.७५ टक्के आणि कमाल ९.३५ टक्के दराने गृहकर्ज देत आहे. पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना किमान ८.५ टक्के आणि कमाल १०.१ दराने टक्के गृहकर्ज देत आहे.

About Editor

Check Also

आंतराष्ट्रीय नाणेनिधीचा अहवाल, भारताने सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेमधील पाचवे स्थान गमावले भारतीय चलनातील कमकुवत पणामुळे स्थान गमावले

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) ताज्या जागतिक आर्थिक दृष्टिकोनाच्या (World Economic Outlook) अंदाजानुसार, नाममात्र जीडीपीच्या (nominal GDP) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *