शाळांमध्ये मोदींचा लघुपट दाखवणे म्हणजे मोदींची लोकप्रियता ढळली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी

शाळांमध्ये मोदींचा लघुपट दाखवणे म्हणजे मोदींची देशातील लोकप्रियता ढळू लागली असल्याचे संकेत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.

मोदींचा लघुपट शाळांमध्ये दाखवण्याचा आदेश शाळांना सरकारने काढला आहे त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतला आहे अशी माहिती नवाब मलिक यांनी मिडियाशी बोलताना दिली.

महाराष्ट्र सरकारने प्रत्येक शाळांमध्ये मोदी यांचा लघुपट दाखवण्याचा आदेश काढला आहे हे चुकीचे आहे. सरकारी शाळांच्या साहित्यांचा गैरवापर करुन भाजप यातून आपला प्रचार करणार आहे. मुलांना लघुपट दाखवणे आणि तेसुध्दा जबरदस्तीने दाखवणे म्हणजे कुठे ना कुठे मोदींची लोकप्रियता देशात कमी होत आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

भाजप प्रचारासाठी शाळांचा वापर करत आहे हे योग्य नाही. शिक्षकांनी आणि शाळा चालवणाऱ्या संस्थांनी सरकारच्या या मनमानी आदेशाला आणि त्यांच्या दबावाला बळी न पडता अशा बेकायदेशीर आदेशांना विरोध करावा असे आवाहन राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले आहे.

About Editor

Check Also

राहुल गांधींना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसचा रास्ता रोको वांद्रे रिक्लेमेशन येथे रात्री ११ वाजता आंदोलन; मोदी सरकार व मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

दिल्ली येथे निवडणूक आयोगाच्या कार्यालयात भेटीसाठी निघालेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि अन्य विरोधी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *