पुणे हवामान वेधशाळेचा अंदाज, राज्यात दोन-तीन दिवसात मान्सून ७ तारखेला बहुंताष भआगात मान्मसून कोसळणार

काही दिवसांपूर्वी मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात कधी दाखल होणार अशी विचारणा सातत्याने करण्यात येत होती. यापार्श्वभूमीवर पुणे हवामान वेधशाळेने अंदाज व्यक्त केला असून आगामी दोन दिवसात मान्सून दाखल होण्यास वातावरणीय परिस्थिती अनुकूल आहे. तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील ३ ते ४ तासात पावसाचे आमगन होणार असल्याचा इशारा पुणे वेधशाळेने अंदाज व्यक्त केला आहे.

पुढील ते तीन ते चार तासात रायगड, रत्नागिरी, सिंधूदूर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर आणि आजूबाजूच्या परिसरात आणि मराठवाडा व इतर काही ठिकाणी विजेच्या कडकडटासह पाऊस कोसळणार असल्याचा अंदाजही हवामान वेधशाळेने व्यक्त केला आहे.

त्याचबरोबर दक्षिण भारताता आणि गोव्यातही पाऊसाचे आगमण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर कोकण आणि गोव्यात उद्या किंवा परवा पावसाची शक्यता असून ७ जूनला देशाच्या बहुतांश भागात मान्सूनचा पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

https://x.com/Hosalikar_KS/status/1798215669227696321

मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात ८ आणि ९ तारखेला मान्सूनचा पाऊस पडणार आहे. तर मराठवाड्यात आणि विदर्भात ८ तारखेपासून पुढील चार दिवस सतत पाऊस कोसळणार आहे. कोकण व गोव्यात ८ आणि ९ जून रोजी मुसळधार पाऊस कोळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर मध्य महाराष्ट्रात ८ आणि ९ जूनला मुसळधार पाऊस पडणार आहे.

५ व ६ जूनला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह काही तुरळक भागात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी लागणार आहे. त्यासाठी या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. ८ आणि ९ तारखेनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यताही हवामान वेधशाळेने अंदाज व्यक्त केला.

https://x.com/ClimateImd/status/1798309613915566494

About Editor

Check Also

३० मार्च ते ४ एप्रिल दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचे नवीन सत्र शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस, गारपीट आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे

३० मार्चपासून राज्यात आभाळी हवामान आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *