Tag Archives: maharashtra

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी अणुऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र नेतृत्वासाठी सज्ज

कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सेंटर, सेमीकंडक्टर, हरित हायड्रोजन, इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि प्रगत उत्पादन क्षेत्रामुळे आगामी काळात स्थिर व अखंड वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. केवळ सौर आणि पवन उर्जेवर दीर्घकालीन औद्योगिक विकास शक्य नसून अणुऊर्जा (न्यूक्लिअर पॉवर)  ही भविष्यातील औद्योगिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची ठरणार आहे. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाचे नेतृत्व करण्यास तयार असून अमेरिकन कंपन्यांनी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, उद्योगस्नेही धोरणामुळे ‘ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब’ म्हणून महाराष्ट्राची ओळख डेन्मार्कच्या राजदूत यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट

महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असून परदेशी गुंतवणूकदारांसाठी सर्वाधिक पसंतीचे राज्य आहे. राज्य शासनाच्या उद्योगस्नेही धोरणांमुळे जगभरातील कंपन्यांसाठी महाराष्ट्र ‘ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब’ म्हणून उदयास येत असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. भारतातील डेन्मार्कचे राजदूत रास्मुस अबिलगार्ड क्रिस्टेन्सेन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट …

Read More »

२०-२२ एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज

पश्चिम महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये २० ते २२ एप्रिल दरम्यान दुपारनंतर काही प्रमाणात आभाळी हवामान आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत विजांचा कडकडाट, पाऊस तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्याच्या हवामान अंदाजानुसार १९ एप्रिल रोजी पश्चिम …

Read More »

राज्यात नऊ नवीन कारागृहे प्रस्तावित; बंदी क्षमतेत वाढ कैद्यांच्या क्षमतेते १२ हजार २५८ ने वाढ होणार

राज्यात पालघर, अहिल्यानगर, बारामती, येरवडा क्र.०२ व क्र. ०३ जि. पुणे, गोंदिया, हिंगोली, भुसावळ (जि. जळगाव) व अंबाजोगाई (जि. बीड) अशा एकूण नऊ ठिकाणी नवीन मध्यवर्ती व जिल्हा कारागृहे बांधणे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यानुसार एकूण १२ हजार २५८ ने बंदी क्षमतेत वाढ होणार आहे. त्यापैकी पालघर, नारायणडोह (अहिल्यानगर) व बारामती (पुणे) येथे अनुक्रमे १८, ३५ व ६० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित …

Read More »

जयकुमार रावल यांची माहिती, व्हिएतनामशी द्विपक्षीय सहकार्य आणि सबंध वृद्धिंगत करणार व्हिएतनामचे महावाणिज्यदूत ले क्वांग बिएन यांनी मंत्री जयकुमार रावल यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली

महाराष्ट्र हा व्हिएतनामी उद्योगांसाठी पसंतीचे गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येत असल्याने आर्थिक भागीदारी वाढत आहे. येणाऱ्या काळात गुंतवणूक, व्यापार आणि द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाईल, असे राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. व्हिएतनामचे महावाणिज्यदूत ले क्वांग बिएन यांनी मंत्री जयकुमार रावल यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. …

Read More »

दत्तात्रय भरणे यांची माहिती, महाराष्ट्र–कॅनडा दरम्यान कृषी तंत्रज्ञान, एआय व अन्नप्रक्रिया क्षेत्रातील सहकार्याला गती देणार कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर भर

“महाराष्ट्रात कृषी क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर राज्य सरकार भर देत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), कृषी शिक्षण, कृषी अन्नप्रक्रिया उद्योग आणि तंत्रज्ञानाधारित स्टार्टअप्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि कॅनडा यांच्यातील सहकार्य अधिक बळकट झाल्यास कृषी व कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रात आधुनिक ‘बसपोर्ट’ एसटी डेपोच्या विकासाला गती मिळणार असल्याचा केला दावा

गुजरातच्या धर्तीवर राज्यात आधुनिक ‘बसपोर्ट’ उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून  एसटी महामंडळाच्या डेपो आणि बसस्थानकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नवीन धोरण आखण्यात आले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत दिली. नियम ९२ अन्वये विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांनी  याविषयी विधान परिषदेत अर्धा तास चर्चा उपस्थित केली. परिवहन मंत्री …

Read More »

उद्धव ठाकरे यांची भावना, अजित दादा सारखा उत्तम, दिलदार मित्र गमावला अर्थसंकल्पिय अधिवेशाच्या पहिल्या दिवशी अजित पवार यांना वाहिली श्रध्दांजली

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. मात्र आजही अजित पवार गेले याचे वास्तव अद्यापही वाटत नाही. परंतु निसर्ग नियमानुसार अजित पवार यांच्या मृत्यू झाला हे कटू सत्य स्विकारण्याशिवाय पर्याय नाही. आज पासून अर्थसंकल्पिय अधिवेशऩाला सुरूवात झाली. प्रथे प्रमाणे विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषदेत अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, कृषीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद घेणारे महाराष्ट्र पहिले राज्य कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ॲप्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचे लोकार्पण

शेतकऱ्याने डिजिटल सेवांचा आत्मविश्वासाने वापर केला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या विविध डिजिटल ॲपमुळे शेतकरी त्यांच्या भाषेत संवाद साधून शेती विषयक प्रश्नांचे उत्तर त्वरित मिळवू शकतात. महा-एआय इनोव्हेशन सेंटरद्वारे विद्यापीठे, संशोधन संस्था, उद्योग यांना एकत्र आणून एका डिजिटल सक्षम परिसंस्थेद्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान सुकर करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कॅनडाची भागीदारी गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल

महाराष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी कॅनडा उत्सुक आहे.कॅनडियन इन्फ्रास्ट्रक्चर बँकेच्या सहभागातून गृहनिर्माण व पायाभूत क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीद्वारे या सहकार्याची सुरुवात केली जाईल. कॅनडाच्या वित्तीय व तांत्रिक सहकार्यामुळे महाराष्ट्रातील पायाभूत विकासाला नवी दिशा मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी कॅनडा इन्फ्रास्ट्रक्चर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सेबास्टियन यांच्याशी …

Read More »